सुरुवातीच्या सत्रात बाजाराचा वॉर्म अप, बाजार 800 अंकांनी वधरला

Share Market Open: मंदीच्या धुक्यातही बाजार दुस-या दिवशी तेजीत सुरु झाला आहे. सोमवारी एक ठराविक चढउतार बाजारात दिसून आला. बाजारा बंद होताना बीएसई निर्देशांक 237.42 अंकाच्या फायद्यासह 51,597.84 अंकावर बंद झाला. तर निफ्टी 56.65अंकांची चढाई करत 15,350.15 अंकांवर पोहचला.

सुरुवातीच्या सत्रात बाजाराचा वॉर्म अप, बाजार 800 अंकांनी वधरला
बाजारात तेजीचे सत्रImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jun 21, 2022 | 12:31 PM

महाराष्ट्रातील राजकारणात भूकंपाचे संकेत असले तरी शेअर बाजाराने (Share Market) मात्र तेजीचा योग साधला आहे. अजून बाजारात कुठलाही भूकंप आलेला नाही. मंदीचे सावट असलेला बाजार सुरुवातीच्या सत्रात आगेकूच असल्याने गुंतवणुकदारांना हायसे वाटले. जगभरात मंदीचे (Economic Recession) सावट वाढले आहे. महागाई आटोक्यात आणण्यासाठी मध्यवर्ती बँका (Central Bank) व्याज दर वाढवत आहेत. त्याचा आर्थिक विकास दरावर परिणाम होत आहे. त्याचा परिणाम शेअर बाजारावरही दिसून येत आहे. सोमवारी एक ठराविक चढउतार बाजारात दिसून आला. बाजार बंद होताना बीएसई निर्देशांक 237.42 अंकाच्या फायद्यासह 51,597.84 अंकावर बंद झाला. तर निफ्टी 56.65अंकांची चढाई करत 15,350.15 अंकांवर पोहचला होता.आज सुरुवातीच्या सत्रात रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industry) , एचडीएफसी बँक (HDFC Bank) , एचडीएफसी (HDFC) सारखे शेअरने आगेकूच केल्याने बीएसई निर्देशांक आणि एनएसई निफ्टी यांनी तेजीचा योग साधला. आता दुपारच्या सत्रात बाजाराने 800 अंकांची चढाई केली. गेल्या तीन आठवड्यानंतर बाजाराने दिमाखात दुसरे सत्र गाठले आहे. निर्देशांक 861.28 अंकांनी वाढून 52,459.12 अंकावर तर निफ्टीत 263.25 अंकांनी वाढून 15,613.40 अंकावर पोहचला.

पहिल्या सत्रापासून बाजार मजबूत

भारतीय बाजार पूर्वसत्रापासून मजबूत स्थितीत होता. सत्र सुरु झाल्यानंत निर्देशांक 300 अंकांनी मजबूत स्थिती होता आणि तो 51,900 अंकाच्या जवळपास व्यापार करत होता. तर निफ्टी ही पूर्वसत्रात 100 अंकांपेक्षा ही फायद्यात होता. सिंगापूरच्या एसजीएक्स निफ्टीने (SGX Nifty) पण हेच संकेत दिले होते, त्यानुसार भारतीय बाजारात सुरुवातीच्या काळात तेजीचे सत्र सुरु होते. सत्र सुरु होताच, बाजार दमदार स्थितीत होता. सकाळी 9:25 वाजता बीएसई निर्देशांक 430 अंकांनी वधरला आणि तो 52 हजार अंकांच्या वर गेला तर निफ्टी हा जवळपास 116 अंकांच्या पुढाकाराने 15,450 अंकाचा टप्पा पार केला.

हे सुद्धा वाचा

जागतिक बाजारात तेजीचा ट्रेंड

अमेरिकम बाजार सोमवारी जूनटींथमुळे बंद होता. त्याअगोदर शुक्रवारी डाऊ जोनस् इंडस्ट्रियल एवरेजला 0.13 टक्क्यांचे नुकसान झाले. टेक फोकस्ड इंडेक्स नॅस्डॅक कम्पोझिटमध्ये 1.43 टक्के आणि एस अंड पी 500 हा 0.22 टक्के तेजीत राहिला. आज आशियाई बाजार तेजीत राहिला. जापान शेअर बाजार निक्की 1.94 टक्के, हाँगकाँगचा हँगसँग बाजार 1.43टक्के आणि चीनचा शंघाई कम्पोझिट 0.18 टक्क्यांनी तेजीत आहे.

एचडीएफसी, अल्ट्राटेकने बाजार सांभाळला

सोमवारी, पहिल्या दिवशी बाजारात एक ठराविक चढउतार होत होता. व्यापार सत्र बंद झाल्यावर बीएसई निर्देशांक 237.42 अंकाच्या फायद्यासह 51,597.84 अंकावर बंद झाला. तर निफ्टी 56.65अंकांची चढाई करत 15,350.15 अंकांवर पोहचला होता.तर एचडीएफसी, अल्ट्राटेक सिमेंट सारख्या शेअरने बाजार सांभाळला. गेल्या हफ्त्यात बाजार सर्व सत्रात घसरला होता. गेल्या आठवड्यात निर्देशांक 1,516.12 अंकांनी (2.87 टक्के) घसरला होता. तर निफ्टीला 498.70 अंकांनी नुकसान झाले.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.