
गेल्या काही आठवड्यापासून सोन्यावर (Gold price today) दबाव असल्याचे पहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चालू आठवड्यात सोने 2000 डॉलरवर पोहोचले. मात्र त्यानंतर सातत्याने सोन्याच्या दरात घसरण होताना दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारत सोन्याच्या दरात घसरण होऊन सोने 1932 डॉलरवर पोहोचले तर भारताबाबत बोलायचे झाल्यास सोन्याचा भाव प्रति तोळा 53600 रुपयांवर पोहोचला होता. मात्र त्यानंतर सोन्याच्या दरात घसरण सुरू आहे. सध्या सोन्याचे दर 52200 रुपये आहेत. येत्या काळात जागतिक राजकारणासह चीनमधील कोरोना स्थितीचा परिणाम हा सोन्याच्या दरावर होणार आहेत. चला तर जाणून घेऊया सोन्याचे दर प्रभावित करणाऱ्या घटकांबद्दल

जीडीपी डेटा : 28 एप्रिलला अमेरिकेचा जीडीपी डेटा समोर येणार आहे. जर आर्थिक विकास दर हा अपेक्षेप्रमाणे नसेल तर फेडरल रिझर्व्ह अमेरिकेपुढे वाढत्या महागाईला थोपवने हे मोठे आव्हान असणार आहे. महागाई वाढल्यास सोन्याच्या मागणीत वाढ होऊ शकते, अशा परिस्थितीमध्ये सोन्याचे दर वाढू शकतात.

फ्रान्समध्ये राष्ट्रपतीपदाची निवडणूक : फ्रान्समध्ये सध्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची तयारी सुरू आहे, सध्याचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रोन हे अमेरिकेच्या बाजूने झुकलेले दिसत आहेत. अशा परिस्थितीमध्ये जर फ्रान्समध्ये राष्ट्रपती म्हणून इमॅन्युएल मॅक्रोन यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी निवडणूक जिंकल्यास त्याचा मोठा परिणाम हा जागतिक घडामोडीवर होऊ शकतो. परिणामी आंतरराष्ट्रीय पातळीवर काही काळ सोन्याचे दर वाढण्याची शक्यता आहे.

रशिया आणि युक्रेन युद्ध : गेल्या दीड महिन्यापासून रशिया आणि युक्रेमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धाचा मोठा परिणाम हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर होताना दिसून येत आहे. सोन्यासह सर्वच वस्तूंचे भाव वाढले आहेत. जर हे युद्ध असेच सुरू राहिल्यास पुढील काळात सोन्याच्या दरात आणखी तेजी दिसून येऊ शकते.

भारतात लग्नसराईचा हंगाम