Gold Rate today: आज सोने खात आहे भाव !, 10 ग्रॅम सोन्यासाठी एवढा रिकामा होईल खिसा

1 फेब्रुवारी रोजी दहा ग्रॅम सोन्यासाठी 48,980 रुपये मोजावे लागत होते. तर 28 फेब्रुवारी रोजी हेच 10 ग्रॅम सोन्यासाठी 51,280 रुपये झाले. गुडरिर्टन संकेतस्थळानुसार गेल्या चार दिवसांपासून 52,590 रुपये प्रति 10 ग्रॅमवर स्थिर आहे. चला तर जाणून घेऊयात सोन्याचे भाव आज काय आहे ते..

Gold Rate today: आज सोने खात आहे भाव !, 10 ग्रॅम सोन्यासाठी एवढा रिकामा होईल खिसा
10 ग्रॅम सोन्यासाठी एवढा रिकामा होईल खिसा Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 29, 2022 | 9:34 AM

सोने (Gold) पुन्हा एकदा भाव खात आहे. मध्यंतरी महागाई, युक्रेन-रशिया युद्धाचे पडसाद आणि रुपयाचे अवमुल्यन याचा सर्वच स्तरावर परिणाम दिसून आला होता. 1 फेब्रुवारी रोजी दहा ग्रॅम सोन्यासाठी 48,980 रुपये मोजावे लागत होते. तर 28 फेब्रुवारी रोजी हेच 10 ग्रॅम सोन्यासाठी 51,280 रुपये झाले. गुडरिर्टन संकेतस्थळानुसार (goodreturns.in) गेल्या चार दिवसांपासून 52,590 रुपये प्रति 10 ग्रॅमवर स्थिर आहे. सोन्यात एका दिवशी 280 रुपयांची घसरण दिसत असली तरी सध्या फेब्रुवारी महिन्यापेक्षा मार्च महिन्यात सोन्याला झळाळी मिळाली आहे. दहा ग्रॅममागे जवळपास 3,610 रुपयांची दरवाढ (Rate Hike) दिसून येत आहे. असे असले तरी भारतीयांचे सोन्यावरील प्रेम अफाट आहे, त्यात तसू भर ही फरक पडत नाही. चला तर जाणून घेऊयात राज्यातील काही प्रमुख शहरातील सोन्याचे भाव आज काय आहे ते..

  1. मुंबईत 22 कॅरेट सोन्यासाठी ग्राहकांना प्रति दहा ग्रॅम 47,950 रुपये तर 24 कॅरेटसाठी प्रति दहा ग्रॅम 52,310 रुपये मोजावे लागतील.
  2. पुण्यात 22 कॅरेट सोन्यासाठी ग्राहकांना प्रति दहा ग्रॅम 48,050 रुपये तर 24 कॅरेटसाठी प्रति दहा ग्रॅम 52,400 रुपये आकार पडेल.
  3. नागपूरमध्ये 22 कॅरेट सोन्यासाठी ग्राहकांना प्रति दहा ग्रॅम 47,980 रुपये तर 24 कॅरेटसाठी प्रति दहा ग्रॅम 52,340 रुपये मोजावे लागतील रे भौ
  4. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्यासाठी ग्राहकांना प्रति दहा ग्रॅम 48,050 रुपये तर 24 कॅरेटसाठी प्रति दहा ग्रॅम 52,400 रुपये द्यावे लागतील.
  5. तर फ्रेशर्सलाईव्ह या संकेतस्थळानुसार, जळगावमध्ये 22 कॅरेट सोन्यासाठी ग्राहकांना प्रति दहा ग्रॅम 48,790 रुपये आणि 24 कॅरेटसाठी सोन्यासाठी प्रति दहा ग्रॅम 51,230 रुपये पडतील बुवा
  6. HDFC Securities च्या माहितीनुसार, मागील व्यापारी सत्रात सोने 51,803 रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झाले होते. तर किंमतीत 561 रुपयांच्या घसरणीसह चांदी प्रति किलो 68,182 रुपयांवर आली होती. मागील व्यापारी सत्रात चांदीच्या किंमती प्रति किलो 68,743 रुपये इतकी होती. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यात घसरण होऊन ते 1,933 डॉलर प्रति औंसवर पोहचले. तर चांदी 25.10 डॉलर प्रति औसवर होते.
  7. एचडीएफसी सिक्युरिटीज् संशोधन विभागाचे तपन पटेल यांनी सांगितले की, सोमवारी न्यूयॉर्क येथील जिंस एक्सचेंज कॉमेक्समध्ये सोन्याचे भाव घसरले. एक टक्क्यांची घसरण नोंदवत भाव 1,933 डॉलर प्रति औसवर स्थिरावले. अमेरिकेतील आर्थिक घडामोडी आणि डॉलरच्या मजबूत स्थितीमुळे सोन्यावर दबाव होता.

Beed : धमक असेल तर गावात रस्ता आणाच, नाईकवाडेंचं संदीप क्षीरसागरांना आव्हान, जयदत्त क्षीरसागरांची शेरोशायरीतून टीका

Sangli Crime | भावकीतील वाद, जंगलात दबा धरुन तलवार हल्ला, तिघे गंभीर जखमी

Lady Conductor Murder | नागपुरातील महिला कंडक्टरच्या हत्येचं गूढ उकललं, दाम्पत्याला अटक

Delhi Election Result : आपसाठी मोठा धक्का, अरविंद केजरीवाल पराभूत
Delhi Election Result : आपसाठी मोठा धक्का, अरविंद केजरीवाल पराभूत.
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?.
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग.
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले.
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर.
दिल्लीत कांटे की टक्कर, आपचे तीन मोठे चेहरे पिछाडीवर
दिल्लीत कांटे की टक्कर, आपचे तीन मोठे चेहरे पिछाडीवर.
बीडचे SP कॉवत ॲक्शन मोडवर, पोलीस अधीक्षकांची 80 जणांना तंबी, कारण काय?
बीडचे SP कॉवत ॲक्शन मोडवर, पोलीस अधीक्षकांची 80 जणांना तंबी, कारण काय?.
तब्बल 'इतक्या' लाख लाडक्या बहिणी अपात्र, आदिती तटकरेंनी थेट दिला आकडा
तब्बल 'इतक्या' लाख लाडक्या बहिणी अपात्र, आदिती तटकरेंनी थेट दिला आकडा.
कोर्टाचा निर्णय येताच दमानियांची मोठी मागणी, करूणा शर्मांना तातडीने...
कोर्टाचा निर्णय येताच दमानियांची मोठी मागणी, करूणा शर्मांना तातडीने....
लोकलमधून उतरताना ओढणी दुसऱ्याच्या बॅगेत अडकली अन्..., बघा CCTV फुटेज
लोकलमधून उतरताना ओढणी दुसऱ्याच्या बॅगेत अडकली अन्..., बघा CCTV फुटेज.