Maharashtra News Live Update : संजय राऊत-वरुण गांधी यांच्यात राजकीय चर्चा

| Updated on: Mar 29, 2022 | 10:42 PM

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra News Live Update : संजय राऊत-वरुण गांधी यांच्यात राजकीय चर्चा
बातम्यांचे सर्वात वेगवान अपडेट्सImage Credit source: tv9

मुंबई : आज मंगळवार 29 मार्च 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. अनैतिक संबधाच्या संशयातून पतीकडून पत्नीच्या खूनाचा प्रयत्न, आरोपी स्वत: पोलीस ठाण्यात हजर, किवळे परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपी पती विरोधात देहुरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल थोरात असे आरोपीचे नाव आहे. संशयातून आरोपी अमोल थोरात याने आपल्या पत्नीचा खून करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो स्वत: चिंचवड पोलीस ठाण्यात हजर झाला. चिंचवड पोलिसांनी आरोपीला देहुरोड पोलिसांच्या ताब्यात दिले व तिथे त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 29 Mar 2022 10:10 PM (IST)

    संजय राऊत-वरुण गांधी यांनी केली राजकीय चर्चा

    भाजप खासदार वरुण गांधी यांनी घेतली शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांची भेट

    संजय राऊत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी सायंकाळी घेतली भेट

    संजय राऊत-वरुण गांधी यांनी केली राजकीय चर्चा

    राऊत-गांधी यांच्यात जवळपास तीन तास चर्चा

    राऊत- गांधी यांच्यात ‘डिनर डिप्लोमसी’ सुद्धा झाली

    अलीकडच्या काळात वरुण गांधी यांनी स्वतःला भाजपपासून जरा अलिप्त ठेवलंय.

  • 29 Mar 2022 09:55 PM (IST)

    जगातील तिसऱ्या उष्ण शहरात चंद्रपूरचा समावेश

    चंद्रपुरात सूर्य कोपला, जगातील तिसऱ्या उष्ण शहरात चंद्रपूरचा समावेश,

    मंगळवारी झाली 43.4 अंश सेल्सियस तापमानाची नोंद,

    उत्तरेकडून येणारे उष्ण वारे अचानक तापमानवाढीस ठरले कारण राज्यातील हवामान अति उष्णतेकडे जाण्याची शक्यता,

    एकीकडे उष्ण वारे आणि वाढते तापमान तर दुसरीकडे बचाव करण्यासाठी नागरिकांचे विविध उपाय

    चंद्रपुरात सलग पाचव्या दिवशी पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांची तगमग

  • 29 Mar 2022 09:53 PM (IST)

    जातीवाचक शिवीगाळीचं प्रकरण

    अंबरनाथ तालुक्यातील राहाटोली ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचांनी आदिवासी महिला सदस्याला केलेल्या जातीवाचक शिवीगाळीचं प्रकरण

    गुन्हा दाखल होऊन 22 दिवस उलटूनही सरपंचांना अटक न झाल्यानं पीडित आदिवासी महिला सदस्याचा आत्मदहनाचा इशारा

    आज अल्टीमेटम संपल्यानं पोलिसांनी सरपंचाच्या अटकेचं आश्वासन देत आदिवासी महिला सदस्याच्या घराबाहेर लावला बंदोबस्त

  • 29 Mar 2022 09:33 PM (IST)

    मुरबाडमध्ये कारमधून गोवंशाची चोरी

    गावकऱ्यांनी पाठलाग करत चोरांना पकडून दिलं पोलिसांच्या ताब्यात

    पाठलाग करताना गोवंश चोरणाऱ्या कारचा अपघात

  • 29 Mar 2022 08:26 PM (IST)

    दोन्ही कुटुंबातील महिलामध्ये तुंबळ हाणामारी

    कल्याण पश्चिमेतील बारावे येथील घटना

    शेजाऱ्याच्या घराच्या बाल्कनी वरून दोन कुटुंबियात वाद

    या वादातून दोन्ही कुटुंबातील महिलामध्ये तुंबळ हाणामारी

    खडकपाडा पोलिसांनी सुरू केला तपास

  • 29 Mar 2022 07:36 PM (IST)

    मोहन शर्मा, वीज कर्मचारी संघर्ष समिती

    - संपाबाबत उर्जामंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा - संप आतापासून मागे घेण्याचा निर्णय. - 7 मागण्यांवर चर्चा झाली - खाजगीकरण होणार नाही - लेखी स्वरूपात संघटनेला कळवलं - संपकाळातील कोणत्याही कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार नाही मागण्या,चर्चा आणि निर्णय - खाजगीकरण करणार नाही,ती अफवा - हायड्रोपॉवर स्टेशन खाजगीकरण चर्चा करणार - जलसंपदा खात्यासोबत चर्चा करणार - याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जलसंधारण मंत्री यासोबत ऊर्जामंत्री चर्चा करणार - बदली धोरण रिव्ह्यू करणार - कंत्राटी कामगारांना नौकरी संरक्षण - नौकरभरतीत कंत्राटी कामगारांना प्राधान्य - केंद्राच्या भांडवलशाही धोरणाला आमचा विरोध - राज्य सरकार आपला लेखी विरोध केंद्राला कलावणार संजय ठाकूर - - सध्या खाजगीकरण प्रस्ताव नाही - मात्र,राज्य सरकार खाजगीकरण विरोधात - 2003 चं केंद्र धोरण खाजगी भांडवलदारांना फायद्याचं - या बिलाला आमचा विरोध - कारण वीज बिल दरआकारणी,खाजगी कंपन्या काहीही करू शकतील म्हणून विरोध - मेस्मा कारवाई मागे घेऊ असं उर्जाममंत्र्यांचं आश्वासन - थकबाकी वसुली साठी कर्मचारी संघटनेची मदत उर्जाममंत्र्यांनी मागितली

  • 29 Mar 2022 06:47 PM (IST)

    ट्रकच्या धडकेत दुचाकी स्वारांचा मृत्यू

    अहमदनगर

    शहरातील पत्रकार चौकात ट्रकच्या धडकेत दुचाकी स्वारांचा मृत्यू

    हे दोन्ही युवक पाथर्डी तालुक्यातील कोल्हार काळूबाईचे येथील रहिवासी होते

    बाळकृष्ण तेलोरे आणि उद्धव तेलोरे असं मयत युवकांची नावं

    हे युवक पत्रकार चौकाकडून डीएसपी चौकाकडे जात असताना त्यांना मालवाहू ट्रकने त्यांना जोराची धडक

    हा अपघात एवढा भीषण होता की यात दोघांचाही जागेवर मृत्यू झाला

  • 29 Mar 2022 06:18 PM (IST)

    विवाह समारंभात वादळ वारा शिरला मंडपात

    यवतमाळ-यवतमाळ तालुक्यातील भांब राजा येथे विवाह समारंभात वादळ वारा शिरला मंडपात

    आकाशात उडाला लग्न मंडप

    3 वर्हाडी झाले जखमी

    वऱ्हाडाला उपाशापोटीच परतावे लागले घरी

    लग्नातील आनंदावर विरजण

  • 29 Mar 2022 05:33 PM (IST)

    गंधर्व लॉन्स जवळ गॅस सिलेंडरचे स्फोट

    कात्रज, गंधर्व लॉन्स जवळ गॅस सिलेंडरचे स्फोट होत असून अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत.

  • 29 Mar 2022 05:01 PM (IST)

    नितीन राऊत आणि वीज कर्मचारी संघटना यांच्यात बैठक

    ऊर्जा मंत्री यांच्या बंगल्यावर बैठक सुरू...

    ऊर्जा मंत्री नितीन राऊत आणि वीज कर्मचारी संघटना यांच्यात बैठक

    महानिर्मिती,महापरेशान,महावितरण कंपन्यांचे खासगीकरण करू नका ही वीज कामगार संघटनांची मागणी...

  • 29 Mar 2022 05:01 PM (IST)

    अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई

    अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई..

    4 कोटी 51 लाख 50 हजार रुपयांचे ड्रग्स जप्त..

    3 किलो एमडी ड्रग्स जप्त, वरळी युनिटची कारवाई..

    2 आरोपीना अटक करण्यात आलीय..

  • 29 Mar 2022 04:36 PM (IST)

    विठ्ठल रुक्मिणीमातेच्या पदस्पर्श दर्शनाचा मुहूर्त अखेर ठरला

    पंढरपूर .... श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या पदस्पर्श दर्शनाचा मुहूर्त अखेर ठरला ..... श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने दोन दिवसापूर्वी शासना कडे दिला होता पदस्पर्श दर्शनाचा प्रस्ताव ... आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेतअंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि मंदिर समितीचे सदस्य यांच्यात झालेल्या बैठकीत घेण्यात आला निर्णय ... गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भाविकाना मिळणार श्री विठ्व रुक्मिणीमातेचे पदस्पर्श दर्शन ...गेल्या दोन वर्षा पासून बंद होते पदस्पर्श दर्शन ....

  • 29 Mar 2022 04:21 PM (IST)

    उल्हासनगर महापालिका अंधारात

    महावितरणच्या संपामुळे उल्हासनगर महापालिका अंधारात

    उल्हासनगर महापालिकेच्या महापौर बसल्या अंधारात

    लाईट गेल्यानं महापौर दालनासह संपूर्ण महापालिकेत अंधार

    जनरेटर सुरू करून चालतंय महापालिकेचं कामकाज

  • 29 Mar 2022 04:21 PM (IST)

    मुंबईत महत्वाची बैठक

    भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल रोजी चैत्यभूमी येथे आयोजित कार्यक्रमाच्या तयारीसंदर्भात आज सहयाद्री अतिथीगृह बैठकीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्यमंत्री संजय बनसोड, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव,पोलीस महासंचालक रजनीश सेठ, पोलीस आयुक्त संजय पांडे, मा. खा. भालचंद्र मुणगेकर, समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, आनंदराज आंबेडकर, भंतेजी राहुल बोधी, समन्वय समितीचे पदाधिकारी उपस्थित.

  • 29 Mar 2022 03:36 PM (IST)

    उल्हासनगरात 4 महिन्यांपासून बेपत्ता मुलीची सुटका

    हिललाईन पोलिसांनी अहमदनगरहून मुलीला सुखरूप आणलं

    मुलीला पळवून नेणाऱ्या आरोपीला ठोकल्या बेड्या

  • 29 Mar 2022 03:36 PM (IST)

    महागाईच्या विरोधात काँग्रेसचा राज्यव्यापी महागाई विरोध सप्ताह

    राज्यात वाढत्या पेट्रोल डीझेल, वाढत्या गँस किमती आणि महागाईच्या विरोधात काँग्रेसचा राज्यव्यापी महागाई विरोध सप्ताह

    31 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान राज्यभरात ठिकठिकाणी काँग्रेसची आंदोलन

    प्रदेश स्तरावरून पक्षाला सूचना झाल्या प्राप्त

    नाना पटोलेंनी दिले आदेश

  • 29 Mar 2022 03:35 PM (IST)

    एक दिवसाचा नाना पटोलेंचा पुणे दौरा

    पुण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या डीजीटल सभासद नोंदणीचा घेणार आढावा.

  • 29 Mar 2022 03:35 PM (IST)

    अधीक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात

    नाशिकच्या नांदगांव तालुक्यातील भूमी अभिलेख विभागातील अधीक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात..

    विलास दाणी असे या लाचखोर अधिकाऱ्याचे आहे नाव असून 40 हजार रुपयांची लाच घेताना या अधिकाऱ्याला एसीबीने पकडले रंगेहात...

    जागा एन.ए. करण्यासाठी तक्रारदारा कडून मागितली होती लाच..

  • 29 Mar 2022 01:41 PM (IST)

    मागण्या पूर्ण न झाल्यास बेमुदात संप करणार - लीलेश्वर बनसोड

    महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी ,अधिकारी ,अभियंता ,संघर्ष समिती आणि महाराष्ट्र राज्य वीज कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती च्या 37 संघटनांचा केंद्र व राज्य सरकारच्या वीज उद्योगाचे खाजगीकरण करण्याच्या धोरणावितोधात संप ठाण्यातील वागळे महावितरण कार्यालय बाहेर सुरू...

    1-विधुत संशोधन बिल 2021 या केंद्र सरकारच्या धोरणाला विरोध महावितरण महानिर्मिती महापारेषण कंपन्या सुरू करण्यात येत असलेले खाजगीकरणाच्या विरोधक

    2- महावितरण महानिर्मिती महापारेषण कंपनीत सुरू करण्यात येत असलेले खाजगीकरण विरुद्ध

    3- महानिर्मिती कंपनीच्या अधिकार क्षेत्रातील जलविद्युत केंद्र खाजगी उद्योजकांना देण्याचे धोरण विरुद्ध

    4- तिन्ही वीज कंपनीतील कंत्राटी व आऊटसोर्सिंग कामगार यांना वयाच्या साठ वर्षापर्यंत नोकरीचे संरक्षण देणेबाबत.

    5- तीन कंपनीतील रिक्त पदे भरण्यास होत असलेली दिरंगाई

    6- तिने कंपनीतील कर्मचारी अभियंते व अधिकाऱ्यांच्या बदली बाबत एकतर्फी निर्णय..

    7- तिनी कंपनीतील वरिष्ठ पदावरील अनावश्यक भरती बदल्या यातील राजकीय हस्तक्षेप.

    यावेळी आंदोलकांकडून राज्य सरकार च्या विरोधात घोषणा बाजी..

    मागण्या पूर्ण न झाल्यास बेमुदात संप करणार ..

  • 29 Mar 2022 01:14 PM (IST)

    दिल्ली विधानसभा पेपरलेस होणार, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची घोषणा

    दिल्ली विधानसभा पेपरलेस होणार

    संपूर्ण कामकाज ई पेपर स्वरुपात चालणार

    उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची घोषणा

    प्रत्येक अधिवेशनात फक्त सॉफ्ट कॉपी वापरली जाणार

    अनेक कागदपत्रांचा वापर कमी केला जाणार

  • 29 Mar 2022 01:13 PM (IST)

    राज्यातील आंदोलक वीज कर्मचारी,अभियंते आक्रमक

    नाशिक - राज्यातील आंदोलक वीज कर्मचारी,अभियंते आक्रमक

    एकलहरे वीज निर्मिती केंद्रातील कर्मचारी संतप्त

    गेटबाहेरील क्रांती सुरू आहे आंदोलन

    पॉवर स्टेशन चालवायला आलेल्या खाजगी वीज कंपनी कर्मचाऱ्यांची गाडी अडवली

    पोलीस संरक्षणात,खाजगी ऑपरेटर गेले केंद्रात

    वेल्फेअर अधिकाऱ्यांच्या नावानं, आंदोलक कर्मचाऱ्यांचा शिमगा

    सरकारनं मेस्मा लावल्यानं, हा 2 दिवस संप वाढण्याची शक्यता

  • 29 Mar 2022 01:12 PM (IST)

    नाशिकमध्ये बर्निंग कारचा थरार

    नाशिक - नाशिकमध्ये बर्निंग कार चा थरार

    पेट्रोल पम्पा समोरच चालत्या कार ला लागली अचानक आग

    ओढा गावाजवळ घडली घटना

    आगीचे कारण मात्र अस्पष्ट

    सुदैवाने चालकाने तात्काळ गाडी बाहेर उडी घेल्याने जीवित हानी टळली

  • 29 Mar 2022 12:55 PM (IST)

    कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा आणि राज्य सरकारला सहकार्य करावे - ऊर्जा मंत्री नितीन राऊत

    राज्यांमध्ये बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे

    खेळत भांडवल आमच्याकडे नसतं

    सकाळी पैसे येतात आणि संध्याकाळी जातात

    दहावी बारावीच्या परीक्षा सुरू आहेत, विद्यार्थ्यांना वीजेची गरज आहे

    आज वीजेची मागणी २८ मेगावॉट पर्यंत पोहोचली आहे

    दीड हजार मेगावॅट ते अडिच मेगावॉट खरेदी करतो

    कोळसा खरेदी करायचा याबाबत आमची चर्चा झाली

    आमचा गॅसचा सुध्दा प्लॉट सुरू आहे

    काहीही झालं वीज पुरवठा खंडीत होणार नाही

    माझी दारं सगळ्यांसाठी सुरू राहतील

    आज आम्ही राज्याला समजून घेण्याचा प्रयत्न करू

    हरताळ सुरू असताना कर्मचारी कामावर आले त्यांना माझा सलाम आहे

    महाविकास आघाडीसरकार म्हणून आम्ही त्यांच्याशी कधीही संवाद साधायला तयार आहे

    त्यांनी संप मागे घ्यावा आणि राज्य सरकारला सहकार्य करावे

    सर्व संघटनांना विनंती केली संप मागे घ्या

    संवादासाठी बैठक आयोजित केली होती.

    चर्चेसाठी मी कधीही उपलब्ध आहे

    कर्मचारी संघटेनेची बोलणी करण्याची तयारी आहे

    ते कधीही माझ्याशी संपर्क साधू शकतात

    कामावर उपस्थित न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवरती कारवाई होणार

    कोळशाचा साठा जसा उपलब्ध होतो, तसा वीज पुरवठा उपलब्ध केला जातो

    बाळासाहेब थोरातांना सगळी माहिती पाठवली आहे

    हा संप केवळ आपल्या राज्यात नव्हता

    हा नॅशनल कॉल होता

    मी उर्जा खात्याचा मंत्री आहे त्यामुळे ते माझ्याशी चर्चा करतील

    दोन दिवसाचा संप आहे

    मेस्मा अंतर्गत कारवाई करणार

  • 29 Mar 2022 12:37 PM (IST)

    राज ठाकरेंच्या पुण्यातील वर्धापन दिन मेळाव्यानंतर आदित्य ठाकरे पुण्यात

    राज ठाकरेंच्या पुण्यातील वर्धापन दिन मेळाव्यानंतर आदित्य ठाकरे पुण्यात

    2 तारखेला पुण्यात आदित्य ठाकरेंची बैठक

    आदित्य ठाकरे पुण्यातून राज्यव्यापी दौऱ्याला करणार सुरुवात

    सूत्रांची टीव्ही 9 मराठीला माहिती

    शिवसेना पक्षसंघटन बांधणीसाठी पुण्यात 2 तारखेला बैठक

    राज ठाकरेंनंतर आदित्य ठाकरेंच मिशन पुणे !

  • 29 Mar 2022 12:32 PM (IST)

    मातीची रॉयल्टी बंद असल्यामुळे हजारो वीट कामगारांचा जिल्हा काचेरीवर मोर्चा

    मातीची रॉयल्टी बंद असल्यामुळे हजारो वीट कामगारांचा जिल्हा काचेरीवर मोर्चा ,

    जिल्हाप्रशासनाने बंद केला माती उत्खनन ,

    माती नसल्याने जिल्ह्यातील बहुतांश वीट भट्ट्या बंद होण्याच्या मार्गावर ,

    एमआयएमच्या नेतृत्वात सुरू आहे आंदोलन ,

    हजारो वीटभट्टी मजूर-मालक आंदोलनात सहभागी .

  • 29 Mar 2022 12:31 PM (IST)

    सदाभाऊ खोत यांची आमदारकी जात आहे, त्यामुळे आमदारकी टिकवण्यासाठी त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न आहे - अमोल मिटकरी

    - सदाभाऊ खोत यांची आमदारकी जात आहे, त्यामुळे आमदारकी टिकवण्यासाठी त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न आहे.

    - महाराष्ट्रात घरा घरात आग लावण्याचं काम भाजप कसं करतंय, हे अवघ्या देशाला माहित आहे

    - कश्मिर फाईल च्या माध्यमातून दोन धर्मात आह लावण्याचा प्रयत्न केलाय

    - सदाभाऊची गत पाण्याविना मासोळी असं झालंय.

    - पवार साहेबांनी काय केलं, यापेक्षा सदाभाऊंच्या बुडाला का आग लागली? हे शोधणं महत्त्वाचं

    - राज्यातील सर्व ऐतिहासिक पुतळ्याचं उद्घाटनं पवार साहेबांनी केलं. अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचं उद्घाटन करुन सदाभाऊ यांनी पाप केलंय

    - तीन पक्षाचं सरकार आहे. भाजप एका पक्षाचं सरकार असतानाही कुजबुज होत होती. आता तानाजी सावंत यांच्या मतदारसंघात काही निधी कमी मजला असेल. म्हणून त्यांनी बोलून दाखवलं.

    - एखाद्याच्या बोलण्याने महाविकास आघाडीत गोंधळ आहे असं होत नाही

    - ईडी पक्षप्रमुखांच्या घरांपर्यंत गेलीय. त्यामुळे ते भाजपसोबत जाणार नाही. आम्हाला भाजपची लायकी दाखवायची आहे

    - अनिल देशमुख बाहेर येतील. आम्ही ते पुन्हा गृहमंत्री होणार

    - वळसे पाटील पण सिनिअर आहे. राज्य उत्पादन शुल्क त्यांच्याकडे

    - टायगर अभि जिंदा है!

    - आजचा काटोलचा दौरा आधीच ठरलेला

    - पक्षाचं काम आहे.

  • 29 Mar 2022 12:17 PM (IST)

    जिल्हाधिकाऱ्यांनी सायकल स्वारांसोबत केला डान्स

    भंडाराचे जिल्हाधिकारी पाय थिरकले गाण्यावर..

    चक्क आयोजकांन सोबत व सायकल स्वारांन सोबत गाण्यावर नाचण्या मनसोक्त आनंद घेतला आहे.

    त्यांच्या साथीला भंडारा नगर परिषदेचे मुख्य अधिकारी विनोद जाधव सुध्दा होते.

  • 29 Mar 2022 12:16 PM (IST)

    पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतली रिफायनरी समर्थकांची भेट

    पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतली रिफायनरी समर्थकांची भेट

    राजापूर रेस्ट हाऊस इथे मोठ्या संख्येने जमले होते रिफायनरी समर्थक

    सर्वपक्षीय कार्यकर्ते देखील होते उपस्थित

    लोकांच्या मनात जे आहे ते डावलून पुढे जाणार नाही - आदित्य ठाकरे

    विरोधकांपेक्षा समर्थक आपले लक्ष द्या

    समृद्धी मांजरेकर आणि संगीता बाणे या दोन महिलांनी रिफायनरी समर्थनाची बाजू मांडली थेट आदिती ठाकरेंकडे

    सर्वांना सोबत घेऊन हा प्रश्न सोडवू चांगले काही होत असेल तर नक्की आपण करू

    तुम्ही सर्व लोकं हो बोलला तरच आपण पुढे जाऊ- आदित्य ठाकरे

  • 29 Mar 2022 12:14 PM (IST)

    भाजपपासून महाराष्ट्राला धोका निर्माण झाला आहे - अमोल मिटकरी

    भाजपपासून महाराष्ट्राला धोका निर्माण झाला आहे

    तानाजी सावंत बोलले म्हणजे ते कोण आहेत

    उद्धवजी कोणतीही टिका गांभीर्याने घेत नाही

    तानाजी सावंत पक्षप्रमुख योग्य सल्ला देतील

    अनिल देशमुख प्रकरण सगळ्यांना माहित आहे

    संजय राऊतांनी सांगितलं की राजीनामा घेऊन चुकचं झाली

    महाराष्ट्राच्या राजकारणात तुम्हाला पुन्हा अनिल देखमुख दिसतील

  • 29 Mar 2022 12:03 PM (IST)

    अनिल देशमुख यांच्या घरी झाली राष्ट्रवादीची बैठक

    - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घराबाहेर कार्यकर्यांची ये जा वाढली

    - ‘पुढच्या १० दिवसांत अनील देशमुख बाहेर येतील’

    - नागपूरातील राष्ट्रवादीच्या नेत्यांचा दावा

    - अनिल देशमुख यांच्या विरोधात काहीही पुरावे नाही’

    - अनिल देशमुख यांच्या घरी झाली राष्ट्रवादीची बैठक

    - आगामी निवडणूकीसाठी राष्ट्रवादीचं नियोजन

    - अनिल देशमुख यांच्या घरी पुन्हा वर्दळ वाढायला सुरुवात

  • 29 Mar 2022 12:02 PM (IST)

    भाजप विरोधात सर्वांनी एकवटलं पाहिजे

    ममता बॅनर्जी यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

    देशातील भाजप विरहित मुख्यमंत्र्यांना पत्र

    देशातील लोकशाही धोक्यात आहे

    सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला जातोय

    भाजप विरोधात सर्वांनी एकवटलं पाहिजे

    ममता बॅनर्जी यांनी भाजप विरहित राज्यातील मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र

  • 29 Mar 2022 11:40 AM (IST)

    पीएमपी कर्मचारी वाहकाविरोधात गुन्हा दाखल

    पुण्यात बंडगार्डन पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

    पीएमपी कर्मचारी वाहकाविरोधात गुन्हा दाखल

    तर त्याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार मित्रांनी एकत्र येत विनयभंग केल्याची घटना

    या घटनेमध्ये गुन्हा दाखल करून कारवाई केल्याची गुन्हे शाखा अधिकारी अश्विनी सातपुते यांची माहिती..

  • 29 Mar 2022 11:40 AM (IST)

    खोटं बोलायला यांची जीप कशी धास्तावते हा मोठा प्रश्न आहे - नाना पटोले

    भाजपच्या केंद्रातील सरकारने या देशातील गरीब आणि सामान्य माणसाचा जगणं मुश्किल करण्याचे ठरवले आहे

    निवडणुकीच्या काळात किमती वाढला नाही भाजपवाल्यांनी खोटं किती बोलायचं याच्या सीमा गाठल्या आहे

    काँग्रेसमुळे पेट्रोलचे दर वाढले असं ते म्हणायचे

    खोटं बोलायला यांची जीप कशी धास्तावते हा मोठा प्रश्न आहे

  • 29 Mar 2022 11:38 AM (IST)

    आदित्य ठाकरे रिफायनरी समर्थकांच्या भेटीला

    एकतर हा प्रकल्प मोठा आहे

    पहिल्यांदा स्थानिकांशी चर्चा व्हायला हवा

    स्थानिकांना नोकऱ्या कशा मिळतील

    महिलांना कशी नोकरी मिळतील

    सत्य परिस्थिती कळू द्या, त्यानंतर निर्णय घेऊ

    आदित्य ठाकरे रिफायनरी समर्थकांच्या भेटीला

    चिंता करू द्या, तुम्ही पुढे बोलला तर

    आपण सगळ्यांना सोबत घेऊ

    विरोधकांचं मत विचारात घेऊ

    रिफायनरी प्रकल्प राजापूरात झाला पाहिजे

  • 29 Mar 2022 11:24 AM (IST)

    एप्रिल अखेर शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार

    एप्रिल अखेर शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार

    उन्हाळी सुट्टी रद्द करण्यात आली नाही

    मे आणि जूनचा महिना सुट्टीसाठी असेल

    ज्या शाळांचा अभ्यासक्रम पुर्ण झाला नाही त्याच शाळा सुरू राहतील

    राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांची माहिती

  • 29 Mar 2022 11:23 AM (IST)

    महाविकास आघाडीतील निधी वाटपावरील खदखदीवर सदाभाऊ खोतांची मार्मिक टीका

    - महाविकास आघाडीतील निधी वाटपावरील खदखदीवर सदाभाऊ खोतांची मार्मिक टीका

    - म्हणजे पवारांच्या जवळ गेले आणि पवारांनी कधी गिळले हे शिवसेनेलाही नाही कळले.

    - तानाजी सावंत जे बोलले ती त्यांच्या मनातली खदखद होती.

    - कारण या अर्थसंकल्पातील 60 टक्के निधी हा राष्ट्रवादीला गेलाय. तीस टक्के निधी कॉंग्रेसला तर केवळ 15 टक्के निधी शिवसेनेला दिलाय

    - त्यामुळे राज्यात नेमकी राज्यात सत्ता कोणाची आहे हा प्रश्न शिवसैनिकांच्या मनात पडलेला आहे

    - राष्ट्रवादीचा पंचायत समिती, जिल्हा परिषदेचा सदस्य पंचवीस पंधराच्या माध्यमातून पाच पाच कोटी निधी आणतो

    - मात्र सेनेचा जिल्हाप्रमुख असलेला पदाधिकारी झुणका भाकर केंद्र, शिवभोजन थाळीसाठी मुंबईला हेलपाटे घालतो. ही परिस्थिती महाराष्ट्रात शिवसेनेची झालीय.

    - म्हणजे पवारांच्या जवळ गेले आणि पवारांनी कधी गिळले हे शिवसेनेलाही नाही कळले.

  • 29 Mar 2022 10:54 AM (IST)

    राज्यात विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात तापमानात वाढ होणार

    राज्यात विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात तापमानात वाढ होणार

    उष्णतेची लाट येतीये मात्र ही शुभचिन्ह

    मान्सून वेळेत होणार दाखल

    मात्र नागरिकांनी काळजी घ्या भरपूर पाणी प्या जनावरांना पाणी वेळेत द्या

    हवामानतज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांच आवाहन

    विदर्भात तापमान 44 अंशावर जाण्याचा व्यक्त केला अंदाज

    काल अकोल्यात 42 अंश सेल्सिअस तापमानाची झाली होती नोंद..

  • 29 Mar 2022 10:53 AM (IST)

    शरद पवारांचे आडनाव आता आगलावे करावे - सदाभाऊ खोत

    शरद पवारांचे आडनाव आता आगलावे करावे

    - रयतक्रांतीच्या सदाभाऊ खोत यांची शरद पवारांवर सडकून टीका

    - शरद पवार साहेब हे महान नेते आहेत. त्यांनी राज्यात काड्या करण्याशिवाय काहीही केले नाही.

    - त्यांनी जाईल तिथे लाग लावायची आणि पुढच्या घरात आग लावायला निघून जायचे.

    - आयुष्यभर त्यांनी आगलावायचे काम केले. मला वाटते त्यांचे आडनाव आता पवार ऐवजी आगलावे असे करावे.

    - हे राज्य एवढे होरपळून निघाले ते आता थांबले पाहिजे

    - सदाभाऊ खोत सोलापूर दौऱ्यावर असून ते आज शेतकरी मेळाव्याला हजर राहणार आहेत

  • 29 Mar 2022 10:52 AM (IST)

    गेल्या आठवड्यात याचिका दाखल केली, आज सुनावणी होणार, न्यायालय चौकशीचे आदेश देणार - किरीट सोमय्या

    - गेल्या आठवड्यात याचिका दाखल केली, आज सुनावणी होणार, न्यायालय चौकशीचे आदेश देणार हा विश्वास…

    - संजय राऊत यांचे पार्टनर सुजित पाटकर यांनी कोवीड काळात लोकांचा जीवाशी खेळ केला, ही कंपनी ब्लॅकलिस्टेड होती, फर्जी होती, मी सुप्रिम कोर्टापर्यंतही लढणार…

    - नवाब मलिक यांच्या प्रकरणात टेरर फंडींगचा एंगल, सीबीआय, एनआयए, सगळे येणार, हसिना पारकरचं. नाव, नवाब मलिकांना माहीत नव्हतं, नवाब मलिक काही वर्ष बाहेर येणार नाहीत…दहशतवाद्यांना माफी नाही…

    - ठाकरे मातोश्रीहून गंमत जंमत करत आहे, स्वताला वाचवण्यासाठी आईला साधन बनवतं… दोन कोटी रोख आईला दिले मग जीएसटी कुठे आहे, पैसे कसे दिले… यशवंत जाधव म्हणतील की १० टक्के माझ्याकडे ९० टक्के वर जातात…

    - हा पैसा नालेसफाईतून आलेला आहे… सगळे घोटाळेबाज आहेत, सगळ्यांवर कारवाएी होणार, ३७ बिल्डींग घेतली त्याचीही चौकशी होणार, कुणाला किती टक्के दिले तेयाचीही चौकशी होणार…जीएसटीवालेही चौकशी करणार…imp

    - सरकार पन्नास वर्ष चालू दे, आम्हाला जनतेची सेवा करायची आहे, ५० दिवसांत डर्टी डजन हे जेल किंवा बेल किंवा धक्के खात असणार…

    - दौरे सांगायचे नसतात, एप्रिल महिन्यात दौरा होणार, पुण्यात जाणार हसन मुश्रीफ यांचा पाठपुरावा करणार

  • 29 Mar 2022 10:30 AM (IST)

    कुठेही प्रदुषण होणार याची काळजी घेऊन परवानगी देणार - आदित्य ठाकरे

    स्थानिक लोकांची विचार केला जाईल

    मागण्या मुख्यमंत्र्यांना सांगणार

    पर्यावरणाला हानी होणार नाही याची काळजी घेतली जाईल

    कुठेही प्रदुषण होणार याची काळजी घेऊन परवानगी देणार

    कोरोनाच्या बंदीस्त भेटी गाठी होत होत्या

    राजकीय मोर्चाबांधणी पेक्षा, महाविकास आघाडीने पर्यावरणावरती अधिक लक्ष दिलं आहे

    राजकीय गोष्टी निवडणुकीच्या काळात होत असतात

    नवीन मार्ग तयार करण्यात येणार आहे

    काही जिल्ह्यात नाराजी असल्याचे पाहायला मिळतात

    महाविकास आघाडीतील नेते नाराजी दुर करतात

    अफवांवर किती बोलायचं,

    निधी वाटपात समान आहे

    चांगला प्रकल्प होत असेल तर स्थानिकांना विश्वासात घेणार

    ज्या राज्यात भाजपाच सरकार नाही तिथं त्रास सुरू आहे

    वाढती महागाई रोकण्यासाठी हे सगळं होत आहे

  • 29 Mar 2022 10:07 AM (IST)

    पेट्रोल पाठोपाठ परभणीत डिझेलने ही गाठली शंभरी

    पेट्रोल पाठोपाठ परभणीत डिझेलने ही गाठली शंभरी ,

    73 पैसे वाढीसह परभणीत आज डिझेल 100-68 पैसे प्रति लिटर ,

    डिझेल मध्ये शंभरी गाठणारा परभणी राज्यातील पहिला जिल्हा ,

    तर 84 पैसे वाढीसह पेट्रोलचा दर आज 118-68 पैसे प्रतिलितर .

    सहा दिवसात पेट्रोल-डिझेलच्या दरात 4 रुपयांनी वाढ झालीये

  • 29 Mar 2022 10:06 AM (IST)

    रत्नागिरी-रिफायनरीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर 

    रत्नागिरी- रिफायनरीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर

    सर्वपक्षीय रिफायनरी समर्थक पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना भेटणार

    आदित्य ठाकरे यांच्या भेटीसाठी राजापूर विश्रामगृहावर आले समर्थक

    समर्थकांमध्ये मोठ्या संख्येने शिवसैनिक, शिवसेनेसोबत भाजपचे अनेक कार्यकर्ते

  • 29 Mar 2022 10:06 AM (IST)

    आदित्य ठाकरेंच्या भेटीसाठी समर्थक राजापूर विश्रामगृहाबेर

    आदित्य ठाकरे रत्नागिरी दौऱ्यावर

    आदित्य ठाकरेंच्या भेटीसाठी समर्थकांची राजापूर विश्रामगृहाबेर

    सर्वपक्षीय नेते आदित्य ठाकरेंची भेट घेणार

  • 29 Mar 2022 10:06 AM (IST)

    भाजपची काळी जादू चालणार नाही हि सरकार पाच वर्ष चालेल:- नाना पटोले

    भाजपची काळी जादू चालणार नाही हि सरकार पाच वर्ष चालेल:- नाना पटोले

    भाजपची नजर महाविकस आघाडी वर भाजपची काळी नजर लागणार नाही हि सरकार पाच वर्ष चालेल.असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला

  • 29 Mar 2022 10:05 AM (IST)

    40 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त

    40 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त

    दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलची कारवाई

    आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थांच्या टोळीचा पर्दाफाश

    40 कोटी रुपयांचे 10 किलो हेरॉईन जप्त

    2 प्रमुख तस्कराना अटक

    म्यानमारमधून मणिपूरमार्गे भारतात तस्करी सुरू होती

    ड्रग्ज लपविण्यासाठी आणि वाहतूक करण्यासाठी एका कारमध्ये खास जागा तयार करण्यात आली होती

  • 29 Mar 2022 09:25 AM (IST)

    मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ठाण्यात ट्रॅक पॉईटमध्ये झाला बिघाड

    मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ठाण्यात ट्रॅक पॉईटमध्ये झाला बिघाड

    ठाण्यात ट्रॅक पॉईटमध्ये झाला बिघाड

    सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक दहा ते पंधरा मिनिटे उशिराने

  • 29 Mar 2022 09:21 AM (IST)

    दाम्पत्याला मारहाण केल्याप्रकरणी शिवसैनिकांवर गुन्हा दाखल

    दाम्पत्याला मारहाण केल्याप्रकरणी शिवसैनिकांवर गुन्हा दाखल

    जळगाव- मुख्यमंत्र्यांविषयी कुठलीही आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केलेली नसतांना देखील शिवसैनिकांनी दाम्पत्याला बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत दोघांना गंभीर दुखापत झाली असून महिलेल्या गळ्यातील मंगळसूत्र गहाळ झाले. या प्रकरणी जिल्हाप्रमुख व जिल्हा संपर्कप्रमुख व प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांवर शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला

  • 29 Mar 2022 09:20 AM (IST)

    पुण्यात आतापर्यंतचा पेट्रोलनं उच्चांकी दर गाठला

    पुण्यात आतापर्यंतचा पेट्रोलनं उच्चांकी दर गाठला

    पेट्रोल तब्बल 114 रुपये 53 पैशांवर

    पुणेकर वाढत्या पेट्रोलच्या किमतीन हैराण

    तर डीझेल 97 रुपये 28 पैशांवर

  • 29 Mar 2022 09:20 AM (IST)

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर

    शरद पवार यांना स्वर्गीय सा.रे पाटील समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार

    शिरोळ येथे होणार सन्मान सोहळा

    शरद पवार शनिवारी कोल्हापूर मुक्कामी

    कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचा दौरा ठरणार महत्वाचा

    जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची सभा घेण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांचा प्रयत्न

  • 29 Mar 2022 09:19 AM (IST)

    ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी रद्द केली कर्मचारी संघटनासोबतची नियोजित बैठक

    मुंबई - संप मागे घेण्याचे आवाहन करूनही शासकीय वीज कंपन्यांच्या अधिकारी-कर्मचारी यांनी संप मागे न घेतल्याने उद्या मंगळवारी त्यांच्यासोबत होणारी बैठक रद्द करण्याचा निर्णय ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी घेतला आहे. याशिवाय मेस्माची  कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देशही तीनही कंपन्यांना देण्यात आले आहेत.

  • 29 Mar 2022 09:18 AM (IST)

    नाशिकच्या देवळा तालुक्यात विजेच्या शॉक लागून एका महिलेचा मृत्यू

    नाशिकच्या देवळा तालुक्यात विजेच्या शॉक लागून एका महिलेचा मृत्यू..

    आजेसासूच्या अंत्यसंस्कार आटोपून आल्यावर घरी कपडे वाळत घालत असताना घडला प्रकार..

    एकाच कुटुंबातील दोघांच्या मृत्यूने परिसरात हळहळ..

    वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारावर संताप व्यक्त होत आहे.

  • 29 Mar 2022 08:29 AM (IST)

    पुणे विभागात एकूण 125 बस बसेस रस्त्यावर

    31 मार्चपर्यंत कामावर या अजित पवारांच्या अल्टीमेटमनंतर एसटी कर्मचारी कामावर यायला सुरुवात

    पुण्यात 70 कर्मचारी कामावर परतले तर ग्रामीण भागातील दोन डेपो सुरळीत झाले सुरू

    हळूहळू कर्मचारी कामावर यायला सुरुवात

    पुणे विभागात एकूण 125 बस बसेस रस्त्यावर.

    अति दुर्गम भागातील एसटी सेवा अजूनही बंदच

    मात्र काही कर्मचारी अजूनही संपावर. ठाम आहेत..5 एप्रिलला ते त्यांचा निर्णय जाहीर करतील...

  • 29 Mar 2022 08:29 AM (IST)

    राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना लिहीणार पत्र

    एप्रिलमध्येही शाळा सुरू ठेवण्याच्या निर्णयाला हिंदू महासभेच्या पालक आघाडीचा विरोध

    परीक्षांनंतर शाळा सुरू ठेऊन नेमकं काय साध्य करणार ?.

    राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना लिहीणार पत्र

    शिक्षक एप्रिलमध्येही शाळाचं शिकवणार असतील तर मग पेपर कोण तपासणार

    हिंदू महासभेचा सवाल शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांना पाठवणार निवेदन..

  • 29 Mar 2022 08:28 AM (IST)

    उद्यापासून तीन दिवस जिल्ह्यातील बाजार समित्या बंद

    नाशिक - उद्यापासून तीन दिवस जिल्ह्यातील बाजार समित्या बंद

    मात्र नाशिक बाजार समिती राहणार 24 तास चालू

    पाडव्याच्या मुहूर्तावर सुरू होणार लिलाव

    शेतकऱ्यांना शेतमालाची रोख रक्कम देणे शक्य नसलेल्या बाजार समित्या बंद ठेवण्याचा निर्णय

  • 29 Mar 2022 08:28 AM (IST)

    शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांचे शिक्षण विभागाला आदेश

    अमरावती

    दहावी बारावीच्या परिक्षेवर कर्तव्यावर असलेल्या शिक्षकांना परीक्षा नसलेल्या दिवशीही शाळेवर पूर्णवेळ हजर राहावे लागणार..

    शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांचे शिक्षण विभागाला आदेश....

    शिक्षणाधीकारी यांनी दिल्या शिक्षकाना सूचना...

    परीक्षेदरम्यान ड्युटी केलेले शिक्षक शाळेवर उपस्थित राहत नसल्याच्या बच्चू कडू यांच्या कडे आल्या होत्या तक्रारी.

  • 29 Mar 2022 08:27 AM (IST)

    राजापूर, रत्नागिरी-आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वी रीफायनरी विरोधात बॅनर

    राजापूर, रत्नागिरी-आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वी रीफायनरी विरोधात बॅनर

    राजापूर तालुक्यातील पश्चिम भागात बॅनर

    राजापुरात प्रदूषणकारी रिफायनरी आणू नका, आदित्य ठाकरे यांना विनंती

    आज आदित्य रत्नागिरी जिल्ह्यात दौऱ्यावर

    रिफायनरिला विरोध आणि समर्थन देखील पुढे येत असताना शिवसेनेची भूमिका महत्वाची

  • 29 Mar 2022 08:26 AM (IST)

    एसटी कर्मचाऱ्यांचे बडतर्फ मागे घेण्यासाठी अर्ज येण्यास सुरुवात

    एसटी कर्मचाऱ्यांचे बडतर्फ मागे घेण्यासाठी अर्ज येण्यास सुरुवात

    बडतर्फ करण्यासाठी अवघे 39 अर्ज अखेरच्या तीन दिवसाचा अर्जाची प्रतीक्षा

    मंत्र्यांच्या अल्टीमेटम नंतरही एसटी कर्मचाऱ्यांचा निर्धार कायम

    31 मार्चपर्यंत कामावर परतणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची कारवाई मागे घेण्याचे आश्वासन

  • 29 Mar 2022 08:24 AM (IST)

    जीपीएस नसणाऱ्या गौण खनिज वाहनांवर होणार कारवाई

    जीपीएस नसणाऱ्या गौण खनिज वाहनांवर होणार कारवाई,

    अवैध वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष मोहीम,

    जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनिज वाहतूक जोमात,

    जीपीएस यंत्रणा बसविलेल्या वाहनावर देखरेख ठेवणे सोपे होणार,

    याची नोंद ही महाखनिज बसवलेल्या संकेतस्थळावर होणार

  • 29 Mar 2022 08:24 AM (IST)

    राज्यात पुढील काही दिवसात विदर्भात उष्णतेची लाट

    राज्यात पुढील काही दिवसात विदर्भात उष्णतेची लाट

    काल सर्वाधिक तापमानाची राज्यात अकोल्यात नोंद

    सर्वाधिक तापमान 42.3 अंश सेल्सिअस तापमानाची अकोल्यात नोंद

    तर पुण्यातही काल सर्वाधिक 39.3 अंश सेल्समन तापमानाची नोंद

    पुढील काही दिवसात उष्णतेची लाट येणार हवामान विभागाचा अंदाज !

  • 29 Mar 2022 08:23 AM (IST)

    वैद्यकीय महाविद्यालयाला महाराष्ट्र आयुर्विज्ञान विद्यापिठाची मान्यता

    पुण्यातील महापालिकेच्या अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाला मिळाल्या सगळ्या परवानग्या

    100 जागांपैकी 40 जागांवर विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षांसाठी घेतला प्रवेश

    वैद्यकीय महाविद्यालयाला महाराष्ट्र आयुर्विज्ञान विद्यापिठाची मान्यता

    केंद्र सरकारच्या निर्देशानुसारचं विद्यार्थ्यांना प्रवेश

    40 विद्यार्थ्यांनी नोंदवला प्रवेश...

  • 29 Mar 2022 08:22 AM (IST)

    पुण्यात केवळ एकच रुग्ण हा ऑक्सिजनवर उपचार घेत आहे

    तब्बल सव्वा दोन वर्षानंतर पुण्यात एक अंकी कोरोना रुग्णसंख्येची नोंद

    24 तासात अवघ्या 7 रुग्णांची झाली नोंद

    पुण्यात केवळ एकच रुग्ण हा ऑक्सिजनवर उपचार घेत आहे

    अजूनही 110 रुग्ण हे अँक्टीव्ह आहेत.

    आतापर्यंत पुण्यात 6 लाख 61 हजार जणांना कोरोनाची बाधा झालीय

  • 29 Mar 2022 07:59 AM (IST)

    अमरावती महानगरपालिकेची मालमत्ता कराची 64.69 टक्के वसूली

    अमरावती महानगरपालिकेची मालमत्ता कराची 64.69 टक्के वसूली...

    अद्यापही 18.70 कोटी रुपयांची थकबाकी कायम....

    थकबाकी वसुलीच्या 35 टक्के मनपा दूर; मार्च महिना संपायला राहले अवघे दोन दिवस....

    कोरोना काळच्या तुलनेत आता झाली आहे चांगली वसुली..

    52.96 कोटी रुपयांच्या मालमत्ता कराचे होते मनपाचे उद्धिष्ट..

    34.52 कोटी रुपये झाली मनपा ची वसुली....

  • 29 Mar 2022 07:58 AM (IST)

    चिखली येथील आडात व्यापाऱ्यांची 23 लाखाने फसवणूक

    बुलडाणा

    चिखली येथील आडात व्यापाऱ्यांची 23 लाखाने फसवणूक,

    नांदेड च्या महिलेसह तिघांविरोधात गुन्हा दाखल,

    राजेंद्र अग्रवाल आणि मयुर अग्रवाल या पिता- पुत्राला दलालाने गंडविले,

    चना खरेदी च्या व्यवहारातून झाली फसवणूक,

  • 29 Mar 2022 07:58 AM (IST)

    ऐन उन्हाळ्यात नांदगावचा पाणी पुरवठा खंडित..

    ऐन उन्हाळ्यात नांदगावचा पाणी पुरवठा खंडित..

    दहेगाव धरणाच्या पाण्यावर मदार..

    १ कोटी ९१ लाख रुपये थकबाकी असल्याने जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने गिरणा धरणातून होणारा नंदगावचा पाणी पुरवठा तोडला असून ऐन उन्हाळ्यात नंदगावकरांना याची मोठी झळ पोहचणार आहे.. गिरणा धरणातून होणारा ५६ खेड्यांचा पाणी पुरवठा खंडित झाल्याने दहेगाव पाणी पुरवठा योजनेवरच आपली तृष्णा भागवावी लागणार आहे. दहेगाव पाणी पुरवठा क्षमता कमी असल्याने नंदगावकरांसमोर पाणी संकट उभे टाकणार आहे.दरम्यान पाणीपुरवठा दरवाढ नंदगाव पालिकेला मान्य नसल्याचे सांगितले जात आहे.

  • 29 Mar 2022 07:57 AM (IST)

    टीईटी घोटाळ्याचा शिष्यवृत्ती परीक्षांना फटका

    - टीईटी घोटाळ्याचा शिष्यवृत्ती परीक्षांना फटका

    - यावर्षी शिष्यवृत्ती परीक्षांच्या नियोजनासाठी कुठलेही दिशानिर्देश नाही

    - शालेय विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची सवय लागावी यासाठी राज्य परीक्षा परिषदेतर्फे पाचवी ते आठवी च्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते शिष्यवृत्ती परीक्षा

    - शिष्यवृत्ती परिक्षेसोबत एनटीएस आणि एनएमएमएस परीक्षाही प्रलंबित

  • 29 Mar 2022 07:57 AM (IST)

    अकोल्यात आठव्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेल ची दरवाढ़.

    अकोल्यात आठव्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेल ची दरवाढ़...

    पेट्रोल 84 पैसे ने वाढ़ 114.76 पैसे

    डीझल 72 पैसे ने वाढ़ 97.53 पैसे

  • 29 Mar 2022 07:56 AM (IST)

    आदिवासी शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

    बुलडाणा

    आदिवासी शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण,

    कोणतेही दस्तावेज नसताना आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी परस्पर विकल्याचा आरोप,

    महसूल अधिकाऱ्यांसह कर्मचार्यांवर कारवाई ची मागणी,

    तर हडपलेल्या जमिनी परत देण्याची मागणी

  • 29 Mar 2022 07:55 AM (IST)

    अमरावती इंधन दर

    अमरावती इंधन दर

    कालचे दर.... डिझेल 100.01 पेट्रोल 115.68

    आजचे दर.... डिझेल 100.76 पेट्रोल 116.52

    भाव वाढ. डिझेल-75 पैशांनी वाढ.. पेट्रोल-84 पैशांनी वाढ....

  • 29 Mar 2022 07:42 AM (IST)

    विदर्भात पुन्हा उन्हाची तीव्र लाट

    नागपूर ब्रेकिंग -

    विदर्भात पुन्हा उन्हाची तीव्र लाट

    नागपूरसह सर्वच जिल्ह्यांमध्ये सूर्याचा प्रकोप

    सॊमवारी अकोल्याचा पारा ४२.९ अंशांवर गेला. येथे विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली.

    तर जगात आठव्या क्रमांकाचे हॉट शहर ठरले.

    कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव कमी होताच लाटेने डोके वर काढले .

    गडचिरोलीचा अपवाद वगळता संपूर्ण विदर्भात सध्या उन्हाची तीव्र लाट पसरली.

  • 29 Mar 2022 07:42 AM (IST)

    लक्ष्मीनगर झोन अंतर्गत 339 भूखंड जप्त

    लक्ष्मीनगर झोन अंतर्गत 339 भूखंड जप्त

    थकीत मालमत्ता कर वसुली कारवाई

    नागपूर महानगरपालिकेच्या लक्ष्मीनगर झोन अंतर्गत थकीत मालमत्ता कर वसुली मोहिमे अंतर्गत खुल्या भुखंडांवर जप्ती/वारंट कार्यवाही करण्यात आली.

    मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार लक्ष्मीनगर झोनद्वारे 339 मालमत्तांची 114.45 लक्ष रूपये थकीत कर वसुली करिता जप्ती कारवाई करण्यात आली.

    या मालमत्तेवरील 2012 पासुन ते 2022 पावेतोचा मालमत्ता कर 28.47 लक्ष रू. आहे.

    अशा एकूण 339 मालमत्तांची 114.45 लक्ष रूपये थकीत कर वसुली करिता जप्ती कार्यवाही करण्यात आली.

    सर्व मालमत्ता धारकांनी कराचा बकाया 31 मार्च 2022 पूर्वी जप्ती शुल्कासह भरणा न केल्यास सदरहू मालमत्ता जाहीर लिलावाद्वारे विक्री करून कर वसुल करण्यात येईल,

  • 29 Mar 2022 07:19 AM (IST)

    राज्यात पुन्हा एकदा उष्णतेचा पारा वाढतोय

    राज्यात पुन्हा एकदा उष्णतेचा पारा वाढतोय....

    अशातच डोंगरमाळारानावर अन्न पाण्यासाठी जंगली प्राणी ,पशु पक्षांसह पाळीव जनावरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागतेय

    अशात शिरुर, खेड आणि आंबेगाव तालुक्याच्या सिमेवर असणाऱ्या शिकोजीबाबा मंदिराचे तळे प्राणी पशु पक्षांसाठी वरदान ठरत आहे..

  • 29 Mar 2022 07:19 AM (IST)

    दोन वर्षात नव्या हॉस्पिटलसाठी 90 अर्ज दाखल

    दोन वर्षात नव्या हॉस्पिटल साठी 90 अर्ज दाखल

    नवीन हॉस्पिटल।उभारणी साठी अर्ज दाखल

    नागपूर बनत आहे मेडिकल हब

    नागपुरात लहान मोठी 650 रुग्णालय आहेत

    त्यात आणखी भर पडणार

    कोविड काळात आरोग्य क्षेत्र फुलले

    कार्पोरेट रुग्णालयांचो वाढत आहे संख्या

    मात्र नियमानुसार परवानगी साठी अर्ज येत असल्याने हॉस्पिटल साठी घालून देण्यात आलेल्या नियमानच होणार पालन

  • 29 Mar 2022 07:18 AM (IST)

    संतोष बिसुरे आणि अस्लम सय्यद या दोन इच्छुक उमेदवारांनी घेतली माघार

    कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीतून दोघांची माघार

    संतोष बिसुरे आणि अस्लम सय्यद या दोन इच्छुक उमेदवारांनी घेतली माघार

    उत्तर साठी आता पंधरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

    अस्लम सय्यद यांनी 2019 ला वंचित बहुजन आघाडी कडून लढवली होती लोकसभा निवडणूक

    हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून सय्यद यांनी घेतली होती जवळपास 90 हजार मत

    सय्यद यांनी घेतलेली मत त्यावेळी बनला होता चर्चेचा विषय

    उत्तर च्या रिंगणातून मात्र सय्यद यांनी घेतली अनपेक्षित माघार

  • 29 Mar 2022 07:17 AM (IST)

    नागपुरात गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलिसांनी राबविला होत खास ऑपरेशन

    नागपुरात फेब्रुवारी महिन्यात एकही हत्या झाली नव्हती ,मात्र मार्च महिन्यात आता पर्यंत 9 खुनाच्या घटना घडल्या

    फेब्रुवारी च्या शांततेला मार्च च्या रक्तपाताने तडा दिला

    फेब्रुवारी एकही हत्या झाली नाही म्हणून पोलिसांच्या कामगिरी ची जोरदार प्रशंसा झाली

    हत्तेची कारण मात्र वेगवेगळी ,शुल्लक कारणावरून हत्या जास्त होत असल्याचं येत आहे पुढे

    नागपुरात गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलिसांनी राबविला होत खास ऑपरेशन

  • 29 Mar 2022 06:22 AM (IST)

    जनसंवाद सभेत 135 तक्रारी; ड्रेनेज वाहिन्या, पाणीपुरवठ्याबाबत सर्वाधिक तक्रारी

    पिंपरी चिंचवड

    - जनसंवाद सभेत 135 तक्रारी; ड्रेनेज वाहिन्या, पाणीपुरवठ्याबाबत सर्वाधिक तक्रारी

    -नव्याने ड्रेनेज वाहिन्या टाकणे, सार्वजनिक शौचालये उभारणे, भुयारी मार्गांमध्ये सुरक्षारक्षक नेमणे, बेकायदेशीर वृक्षतोड थांबवून वृक्षारोपण करणे, बंद असलेले जलतरण तलाव सुरु करणे अशा सुमारे 135 नागरिकांनी सहभाग घेऊन तक्रारी आणि सूचना मांडल्या

    -यात अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयामध्ये अनुक्रमे 18 , 11, 8 , 20, 20, 12 , 27 आणि 19 नागरिकांनी जनसंवाद सभेत उपस्थित राहून आपले म्हणणे मांडले

    -नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी तसेच तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी महापालिकेच्या सर्व आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जनसंवाद सभा पार पडत आहे

    -पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत प्रशासक राज लागू झाल्यानंतर शहरातील नागरिकांना कुठली अडचण येऊ नये यासाठी ही जनसंवाद सभा सुरू

  • 29 Mar 2022 06:21 AM (IST)

    तळेगांव दाभाडे येथील पैसा फंड काच कारखान्यात उदमांजर आढळून आले

    मावळ,पुणे

    -तळेगांव दाभाडे येथील पैसा फंड काच कारखान्यात उदमांजर आढळून आले

    -पैसा फंड काच कारखान्यात येथील कामगारांना काम करत असताना उदमांजर(एशियन सिवेत कॅट) आढळुन आल्याने एकच खळबळ उडाली ते उदमांजर कारखान्यातील सामनाच्या खाच-खळग्यात लपून बसल्याची माहिती कारखान्यामधील कामगारांनी बी वाईल्ड फोरम & वन्यजीव रक्षक मावळ टीमला कळवली

    -ह्या टीमकडून तत्काळ पाळीव प्राणी वाहून नेण्याच्या पेटी मध्ये जवळपास दोन ते तीन तासाच्या अथक परिश्रमानंतर त्याला पकडून सुखरूप असे जवळच्या वनात सोडले

  • 29 Mar 2022 06:21 AM (IST)

    अनैतिक संबधाच्या संशयातून पतीकडून पत्नीच्या खूनाचा प्रयत्न, आरोपी स्वत: पोलीस ठाण्यात हजर

    पिंपरी चिंचवड

    -अनैतिक संबधाच्या संशयातून पतीकडून पत्नीच्या खूनाचा प्रयत्न, आरोपी स्वत: पोलीस ठाण्यात हजर

    -किवळे परिसरात ही घटना घडलीय याप्रकरणी आरोपी पती विरोधात देहुरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो अटक आहे.

    -अमोल थोरात असे आरोपीचे नाव आहे

    -संशयातून आरोपी अमोल थोरात याने आपल्या पत्नीचा खून करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो स्वत: चिंचवड पोलीस ठाण्यात हजर झाला. चिंचवड पोलिसांनी आरोपीला देहुरोड पोलिसांच्या ताब्यात दिले व तिथे त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केलीय

Published On - Mar 29,2022 6:18 AM

Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.