AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्र सरकारकडून पीएफ धारकांसाठी गुडन्यूज, खात्यात होणार इतकी रक्कम जमा

केंद्र सरकारने पीएफ खाते असलेल्या कर्मचाऱ्यांना मोठी गुडन्यूज दिली आहे. यामुळे वर्षाला त्यांच्या खात्यात अधिक रक्कम जमा होणार आहे.

केंद्र सरकारकडून पीएफ धारकांसाठी गुडन्यूज, खात्यात होणार इतकी रक्कम जमा
| Updated on: Jul 25, 2023 | 9:59 PM
Share

नवी दिल्ली, 25 जुलै2023 : एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन ( EPFO ) च्या ग्राहकांना सरकारने गुडन्यूज दिली आहे. केंद्र सरकारने PF खात्यातील ठेवींवर व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पीएफ खात्यात जमा रक्कमेवर आता 0.05 टक्के अधिक व्याज मिळणार आहे. 24 जुलै रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, आर्थिक वर्ष 2022-23 साठी, पीएफ खात्यातील ठेवींवरील सरकारने व्याजदर 0.05% टक्क्यांने वाढवल्याने ती आता 8.15% इतकी झाली आहे. हे पैसे ऑगस्ट 2023 पर्यंत देशातील 6.5 कोटी ईपीएफओ सदस्यांच्या खात्यात पोहोचण्यास सुरुवात होईल.

पीएफवर अधिक व्याज मिळणार

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या मंडळाने 2022-23 या आर्थिक वर्षासाठी मार्चमध्ये EPF खात्यावर 8.15 टक्के व्याजदर निश्चित केला होता आणि हा प्रस्ताव मंजुरीसाठी वित्त मंत्रालयाकडे पाठवला होता. जो मंजूर झाला असून पीएफ खात्यातील रक्कमेवर आता ०.०५ टक्के अधिक व्याज मिळणार आहे. महत्त्वाचे म्हणजे 2021-22 या आर्थिक वर्षासाठी EPFO ​​ने EPF खात्यासाठी 8.10 टक्के व्याजदर निश्चित केला होता.

हा जवळपास 40 वर्षांतील सर्वात कमी व्याजदर आहे. 1977-78 मध्ये EPFO ​​ने 8 टक्के व्याजदर निश्चित केला होता. पण तेव्हापासून ते सतत ८.२५ टक्के किंवा त्याहून अधिक आहे. आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये 8.65 टक्के, 2017-18 मध्ये 8.55 टक्के, 2016-17 मध्ये 8.65 टक्के आणि 2015-16 या आर्थिक वर्षात 8.8 टक्के व्याज मिळत होते.

किती फायदा होईल?

PF च्या गणिताबद्दल बोलायचे झाले तर जर तुमच्या PF खात्यात 31 मार्च 2023 पर्यंत एकूण 10 लाख रुपये जमा असतील तर आतापर्यंत तुम्हाला 8.10 टक्के दराने 81,000 रुपये व्याज मिळत होते. दुसरीकडे, आता सरकारने पीएफचा व्याजदर 8.15 टक्के केला आहे, त्यानुसार खात्यात जमा केलेल्या 10 लाख रुपयांवरील व्याजाची रक्कम 81,500 रुपये होईल. म्हणजेच 10 लाख रुपयांच्या ठेवीवर तुम्हाला 500 रुपये थेट नफा मिळेल.

एखाद्या कर्मचाऱ्याच्या खात्यात 5 लाख रुपये जमा केले, तर नवीन व्याजदरानुसार त्याला 40,750 रुपये व्याज मिळेल. जे पूर्वी 40,500 रुपये होते, म्हणजे 250 रुपये नफा. दुसरीकडे, 3 लाख रुपये ठेवी असलेल्या कर्मचाऱ्याला 24,450 रुपये व्याज मिळेल.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) जारी केलेल्या अधिसूचनेत असे म्हटले आहे की, भारत सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाने, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना, 1952 च्या पॅरा 60 (1) अंतर्गत EP2-2020 योजनेच्या प्रत्येक सदस्याच्या खात्यात व्याज जमा करण्यास मान्यता दिली आहे.

घरबसल्या असा तपासा PF बॅलेन्स

तुम्ही तुमच्या पीएफ खात्याची सध्याची शिल्लक घरबसल्या सोप्या पद्धतीने तपासू शकता. यासाठी अनेक पर्याय देण्यात आले आहेत. उमंग अॅप, वेबसाइट किंवा तुमच्या मोबाइल फोनवरून एसएमएस पाठवून तुम्ही हे जाणून घेऊ शकता.

ठेवी कशी तपासायची?

EPFO च्या अधिकृत वेबसाइटवर जा (www.epfindia.gov.in). यानंतर ई-पासबुक या पर्यायावर क्लिक करा. नवीन पृष्ठावर, UAN, पासवर्ड आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि लॉगिन वर क्लिक करा. लॉग इन केल्यानंतर, पासबुक पाहण्यासाठी सदस्य आयडी पर्याय निवडा. आता तुम्हाला पासबुक पीडीएफ फॉरमॅटमध्ये मिळेल, जे डाउनलोड केले जाऊ शकते. तुम्ही https://passbook.epfindia.gov.in/ वर जाऊन थेट पासबुक पाहू शकता.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.