Gold Loan : पर्सनल लोनपेक्षा भरा अर्धाच ईएमआय! जाणून घ्या कर्ज घेण्याचा सर्वात स्वस्त पर्याय

Gold Loan : गरजा पूर्ण करण्यासाठी अनेकदा कर्ज घेण्याशिवाय पर्याय नसतो. पण वैयक्तिक कर्जाचे व्याजदर आणि प्रक्रिया शुल्काचा अंदाज घेतल्यावर आपण पायावर धोंडा पाडून घेतोय, असे वाटते. तर वैयक्तिक कर्जाला दुसरा ही चांगला पर्याय आहे.

Gold Loan : पर्सनल लोनपेक्षा भरा अर्धाच ईएमआय! जाणून घ्या कर्ज घेण्याचा सर्वात स्वस्त पर्याय
Follow us
| Updated on: Mar 10, 2023 | 8:13 PM

नवी दिल्ली : गरजा पूर्ण करण्यासाठी अनेकदा कर्ज (Loan) घेण्याशिवाय पर्याय नसतो. पण वैयक्तिक कर्जाचे व्याजदर (Interest Rate) आणि प्रक्रिया शुल्काचा अंदाज घेतल्यावर आपण पायावर धोंडा पाडून घेतोय, असे वाटते. तर वैयक्तिक कर्जाला दुसरा ही चांगला पर्याय आहे. भारतीयांचं सुवर्णप्रेम आणि सुवर्णवेड सर्वश्रूत आहे. कठिण काळात सोने हा चांगला पर्याय मानण्यात येतो. घरात पडून असलेले सोने अडचणीच्या वेळी उपयोगी पडते. भारतात प्रत्येकाकडे थोडेफार सोने असतेच. सोने हा गुंतवणुकीसाठी आणि अडचणीच्या वेळी योग्य ठरते. सोने हे क्रेडिट कार्ड आणि पर्सनल लोनपेक्षा (Personal Loan) अधिक स्वस्तात कर्ज मिळू शकते. यामागचं गणित समजून घ्या.

गेल्या एका वर्षात रिझर्व्ह बँक सातत्याने रेपो दरात वृद्धी करत आहे. यामुळे वैयक्तिक कर्जाचा (Personal Loan) दर 18 ते 25 टक्क्यांवर पोहचला आहे. क्रेडिट कार्डवरील कर्जाचा विचार करता व्याज दरात (Interest Rates) कधी कधी 50 टक्क्यांपर्यंत पोहचतो. जर तुम्ही नोकरदार असाल आणि तुमची नियमीत कमाई असेल तर हा व्याजदर तुमच्यावर भारी पडेल. कठिण परिस्थिती ज्यावेळी कर्जाची गरज असते. त्यावेळी सोने उपयोगी पडू शकते.

स्वस्तात कर्ज उपलब्ध करुन देऊ शकते. देशातील अनेक बँका जवळपास 15 वर्षांपासून सोन्यावर कर्ज देत आहेत. घरात साठवलेले अथवा पडून असलेले सोने अशावेळी उपयोगी पडते. तुम्हाला वैयक्तिक कर्ज घेण्याऐवजी सोन्यावर कर्ज घेणे फायदेशीर ठरेल. कारण यावर व्याजदर कमी आकारण्यात येतो. साधारणपणे गोल्ड लोन सर्वात किफायतशीर पर्याय ठरतो. त्याचे कारणही तसेच आहे. या कर्जावर तुम्हाला अधिक व्याज द्यावे लागत नाही. व्याजदरातील तफावत पाहिली तर तुम्हाला हे स्वस्ताईचे गणित समजून येईल.

हे सुद्धा वाचा

गोल्ड लोन स्वस्त असण्यामागील कारण काय आहे, असा सवाल प्रत्येकाला पडतो. त्यामागची कारणे शोधण्याचा प्रयत्न केल्यास, सोन्यावरील कर्ज सुरक्षित मानण्यात येते. सोने दागिने अशावेळी तुमच्या उपयोगी येतात. बँकेकडे सोने तारण ठेवल्याने तुमच्याकडून वेळेत परतफेड न झाल्यास बँकांकडे तुमचे सोने गहाण असल्याने कुठलाही ताप नसतो. उलट सोने सोडवून घेण्याची तुम्हाला चिंता असते. या कर्जासाठी तुम्हाला कागदी घोडे नाचवायची गरज नाही. या कर्जाची प्रक्रिया ही अत्यंत सोपी आहे. ही प्रक्रिया किचकट नाही. प्रत्येक बँकेचे व्याजदर कमी अधिक आहेत.

विविध बँका आणि एनबीएफसी सोन्यावर कर्ज देतात. प्रत्येक बँकेची या कर्जासंबंधीच्या अटी आणि शर्तीत फरक आहे. तारण ठेवण्यात येणाऱ्या सोन्याची बँका अगोदर तपासणी करतात. त्याची शुद्धता आणि वजन तपासण्यात येते. सोन्याच्या कॅरेटनुसार, त्याचे मूल्य ठरते. त्यानुसार, कर्ज देण्यात येते. बँका सोन्याच्या किंमतींच्या तुलनेत 65 ते 75 टक्के कर्ज देतात. गोल्ड लोनसाठी बँकांचे नियम आणि शर्तींचे पालन करणे आवश्यक आहे. बँका या कर्जासाठी प्रक्रिया शुल्कही आकारते. काही बँका शुल्क माफीही देतात.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.