रेशन कार्ड हरवलंय किंवा खराब झालंय? चिंता नको, घरबसल्या 2 मिनिटात डाऊनलोड करा ‘डिजिटल कॉपी’!
रेशन कार्ड हा सर्वसामान्य नागरिकांचं महत्त्वाचं दस्ताऐवज आहे. या कुटुंबातील सर्व सदस्यांची नावं अधिकृतपणे नोंदवलेली असतात. तसेच गरीब आणि गरजू कुटुंबांना अत्यंत कमी दरात अन्नधान्य मिळतं. पण तुमचं रेशनकार्ड हरवलं किंवा खराब झालं असेल तर आता चिंता नसावी. तुम्ही घरबसल्या ते डाउनलोड करू शकता.

शिधापत्रिका अर्थात रेशन कार्ड भारत सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागातर्फे दिलं जाणारं एक अधिकृत ओळखपत्र आहे. याचा मुख्य उद्देश गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना सवलतीच्या दरात किंवा मोफत अन्न धान्य देणं आहे. वन नेशन वन रेशन’या राष्ट्रीय योजनेमुळे आता देशातील नागरिक कोणत्याही राज्यातील सरकारी रेशन दुकानातून आपले धान्य घेऊ शकतात.कुटुंबाच्या आर्थिक स्थितीनुसार तीन प्रकारात रेशन कार्ड दिलं जातं. यात पिवळं, केसरी आणि पांढरं रेशनकार्ड असे तीन प्रकार आहेत. अत्यंत गरीब असलेल्या कुटुंबाला पिवळं रेशन कार्ड दिलं जातं. या रेशनकार्डवर सर्वाधिक सवलत असते. दुसरीकडे, ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त आहे, त्यांना पांढरे रेशन कार्ड दिले जाते. पण त्यांना सवलतीच्या दरात किंवा मोफत रेशन मिळत नाही. असं असलं तरी रेशन कार्ड हे महत्त्वाचं दस्ताऐवज आहे. त्यामुळे ते खराब झालं किंवा हरवलं तर अडचणीत वाढ होऊ शकते. पण आता असं काही झालं तर चिंता करण्याचं कारण नाही.
आता तुम्हाला नवं रेशन कार्ड तयार करण्यासाठी सरकारी कार्यालयाच्या चकरा मारण्याची गरज नाही. आता तुम्हाला घरबसल्या स्मार्टफोनच्या मदतीने डिजिटल रेशन कार्ड डाऊनलोड करता येऊ शकते. तुम्ही अगदी सहजरित्या रेशन कार्डची ई कॉपी मिळवू शकता.
Mera Ration App वरून मिळवा डिजिटल कॉपी
- गुगल प्ले स्टोअरवरून Mera Ration App इंस्टॉल करा
- तुमची भाषा निवडा. आधार नंबर आणि ओटीपी टाकून लॉगिन करा.
- आपल्या रेशन कार्डच्या सुरक्षेसाठी MPIN सेट करा.
- लॉगिन केल्यानंतर रेशन कार्डचा माहिती दिसेल.
- डाउनलोड ऑप्शनवर क्लिक करा आणि पीडीएफ फाईल मोबाईलवर सेव्ह करा.
DigiLocker असं डाउनलोड करा
- सर्वात आधी गुगल प्ले स्टोअरवरून DigiLocker ऐप डाउनलोड करा.
- आधारशी निगडीत मोबाईल नंबर आणि ओटीपीच्या मदतीने लॉगिन करा.
- ऐपमध्ये Ration Card सर्च करा
- आपल्या राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाचा पर्याय निवडा.
- रेशन कार्ड क्रमांक किंवा आधार क्रमांक टाका.
- ‘Get Document’ वर क्लिक करताच तुम्हाला डिजिटल प्रत मिळेल.
राज्य PDS पोर्टलवरूनही डाउनलोड करू शकता
- राज्याच्या अन्न व पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
- रेशन कार्डच्या तपशिलाशी संबंधित लिंकवर क्लिक करा.
- जिल्हा, तालुका, पंचायत किंवा तुमच्या प्रभागाचा तपशील भरा.
- रेशन कार्ड क्रमांकाने किंवा कुटुंबप्रमुखाच्या नावाने शोधा.
- स्क्रीनवर रेशन कार्ड दिसल्यानंतर तुम्ही ते डाउनलोड किंवा प्रिंट करू शकता
