AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CWG 2026: पुन्हा एकदा पाकिस्तानचं नाक कापलं, टीम हॉटेलमधून हा खेळाडू पळाला; नेमकं काय घडलं?

Glasgow Commonwealth Games 2026: कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धेतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या स्पर्धेत पाकिस्तानच्या एका खेळाडूने नको ती करामत केली आहे. सुरक्षा आणि व्यवस्थापनला चकवा देऊन पळ काढला आहे. त्यामुळे पाकिस्तानची पुन्हा एकदा नाचक्की झाली आहे.

CWG 2026: पुन्हा एकदा पाकिस्तानचं नाक कापलं, टीम हॉटेलमधून हा खेळाडू पळाला; नेमकं काय घडलं?
CWG 2026: पुन्हा एकदा पाकिस्तानचं नाक कापलं, टीम हॉटेलमधून हा खेळाडू पळाला; नेमकं काय घडलं?Image Credit source: Getty Images
| Updated on: Aug 04, 2026 | 7:53 PM
Share

Pakistani Boxer Qudratullah: ग्लासगो कॉमनवेल्थ स्पर्धा संपली असून पाकिस्तान पदकतालिकेत 36व्या स्थानावर राहिला. या स्पर्धेत पाकिस्तानने फक्त एकच कांस्य पदक पटकावलं. तेही महिला बॉक्सर फातिमा जहराने मिळवलं आहे. त्यामुळे आधीच स्पर्धेत नाक कापलं असताना त्यात आणखी एक भर पडली. पाकिस्तानची जगासमोर पुन्हा एकदा नाचक्की झाली आहे. पाकिस्तानचा बॉक्सर कुदरतुल्लाह संघाच्या हॉटेलमधून अचानक गायब झाल्याने पाकिस्तान बॉक्सिंग फेडरेशन पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. ही घटना पहिल्यांदा घडली असं नाही. यापूर्वी असे प्रकार घडले आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धांनंतर पाकिस्तानी स्पर्धक परदेशात न सांगता बाहेर पडले आहेत. जवळपास सर्वच मोठ्या स्पर्धांनंतर पाकिस्तानी बॉक्सर परदेशात गायब होण्याच्या किंवा पळण्याच्या घटना समोर येत आहेत.

कुदरतुल्लाह चकवा देऊन फरार

पाकिस्तान ऑलिम्पिक असोसिएशनच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुदरतुल्लाह कॉमनवेल्थ गेम्समध्ये आपला सामना खेळल्यानंतर टीमच्या हॉटेलमधून रहस्यमयरित्या गायब झाला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे कुदरतुल्लाहचा पासपोर्ट टीम मॅनेजरकडे जमा आहे. यानंतरही सुरक्षा रक्षक आणि व्यवस्थापनाला चकवा देऊन फरार होण्यात यशस्वी ठरला आहे. खरं तर रविवारीच घरी परतणं भाग होतं. पण टीम स्कॉटलँडमधून निघण्याच्या सहा तासांपूर्वी कुदरतुल्लाह गायब झाला. बॉक्सिंग स्पर्धेत कुदरतुल्लाहची कामगिरी निराशाजनक झाली. या स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातूनच आऊट झाला होता. पण नॅशनल संघाच्या उर्वरित सदस्यांसोबर ग्लासगोमध्ये थांबला होता. 2 ऑगस्टला अर्थात रविवारी रात्री 2 वाजता हॉटेलच्या रुममध्ये शेवटचा दिसला होता. मात्र सकाळी हॉटेलच्या लॉबीमध्ये संघासोबत कुठेच दिसला नाही. त्यानंतर व्यवस्थापनाने पोलिसांना सूचना दिली आहे.

यापूर्वी पाकिस्तानी खेळाडूंनी अशीच नाचक्की केली

पाकिस्तानी खेळाडूंचं विदेशात गेल्यानंतर असं गायब होणं आता नित्याचं झालं आहे. बर्मिंघममध्ये आयोजित कॉमनवेल्थ 2022 स्पर्धेदरम्यानही दोन बॉक्सर गायब झाले होते. सुलमान बलोच आणि नजीरुल्लाह खान यांची शोधाशोध झाली होती. त्यावेळेसही पासपोर्ट मॅनेजरकडे होते. तर इटलीच्या बुस्टो आरसिजियो शहरात आयोजित केलेल्या वर्ल्ड ऑलिम्पिक क्वॉलिफायरस् 2024 दरम्यान बॉक्सर जोहैब रशीद गायब झाला होता. त्याने सहकाऱ्याच्या विदेशी नोटा आणि किंमती सामना घेऊन पळ काढला होता.

Follow Us
मोठी बातमी! त्रिषावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत...
मोठी बातमी! अभिनेत्री त्रिशावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत कोर्टाचे तातडीचे निर्देश
सुरज चव्हाणांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
NCP Rada | सुरज चव्हाण यांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात दोन्ही बाजुने युक्तीवाद अखेर...
बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण...
Devendra Fadnavis | बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण; काँग्रेसला मुख्यमंत्री फडणवीसांचं जशास तसं उत्तर
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... शिंदे थेट म्हणाले
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... सुनेत्रा पवारांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी सुनावलं
विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर...
Sada Sarvankar | विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर सदा सरवणकरांचा स्फोटक दावा
दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला,
Amit Shah | दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला, काय घडलं?
काँग्रेस कार्यालयात घुसलेल्या NCP कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
Congress | काँग्रेस कार्यालयात घुसलेल्या NCP कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीची थेट घुसखोरी; आधी माफी मागा म्हणत...
NCP Vs Congress | गुंगी गुडिया पोस्टवरून काँग्रेसला घेरलं; काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीची थेट घुसखोरी; आधी माफी मागा म्हणत...
विमान हवेत असतानाच छताला तडा...प्रवाशांचा जीव मुठीत; एअर इंडियाच्या...
विमान हवेत असतानाच छताला तडा... प्रवाशांचा जीव मुठीत; एअर इंडियाच्या विमानाची पुन्हा भयानक दुर्घटना