Stock market : शेअर मार्केटची दिशा कशी ओळखाल? ब्लॉक आणि बल्क डील म्हणजे नेमके काय

| Updated on: Apr 28, 2022 | 5:30 AM

शेअर्समधील चढ-उताराची कल्पना बल्क डीलचा आधार घेऊन करता येते. शेअर बाजारात अनेकदा ब्लॉक आणि बल्क डील होतात. त्याचा डेटा एक्सचेंजमधून मिळतो. ब्लॉक डील पारदर्शक पद्धतीने केली जाते. ट्रेडिंग सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या 35 मिनिटांमध्ये हा व्यवहार होतो.

Stock market : शेअर मार्केटची दिशा कशी ओळखाल? ब्लॉक आणि बल्क डील म्हणजे नेमके काय
Follow us on

मुंबई : हेमंत शेअर मार्केटमध्ये (Stock market) बऱ्याच वर्षांपासून गुंतवणूक (Investment) करतोय. मात्र, शेअर मार्केटची दिशा कशी राहणार? म्हणजेच एखाद्या शेअर्समध्ये चढ किंवा उतार कसे येतात याची त्याला अद्याप कल्पना आली नाही. शेअर मार्केटची दिशा कळण्यासाठी एखादा मार्ग असता तर बरं झालं असतं असं त्याला नेहमी वाटतं. म्हणजेच शेअर्सचे भाव वधारणार की खाली जाणार याची कल्पना येईल. हेमंत सारख्या गुंतवणूकदारांना (Investors) शेअर्समधील चढ-उताराची कल्पना बल्क डीलचा आधार घेऊन करता येते. शेअर बाजारात अनेकदा ब्लॉक आणि बल्क डील होतात. त्याचा डेटा एक्सचेंजमधून मिळतो. ब्लॉक डील पारदर्शक पद्धतीने केली जाते. ट्रेडिंग सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या 35 मिनिटांमध्ये हा व्यवहार होतो. त्यामुळे याचा डेटा लगेच मिळतो. दुसरीकडे, बल्क डीलमध्ये खरेदी- विक्री अनेक भागांत होते. त्यामुळे बल्क डीलबद्दल माहिती घेणं शेअरधारकांसाठी जास्त गरजेचं आहे.

परदेशी गुंतवणूकदारांवर लक्ष ठेवा

हेमंत विचार करतोय कोणत्या शेअरवर बल्क डील कसा परिणाम करते आणि त्यातून काय अंदाज लावला जाऊ शकतो ? कोणत्या शेअरमध्ये गुंतवणूकदार गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत याची माहिती कशी मिळते. हेमंतनं NSE आणि BSE वरील व्यवहारांवर लक्ष ठेवल्यास परदेशी गुंतवणूकदार कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक करत आहेत याचा अंदाज लावता येतो. तसेच व्यवहारांचा शेअर्सवर सकारात्मक परिणाम होतोय की नकारात्मक परिणाम याचीही माहिती मिळते. इंट्राडे ट्रेड डेटा आणि शॉर्ट टर्म ट्रेड डेटा वेगळे ठेवल्यास बल्क डीलचा ट्रेंड समजतो शार्ट टर्म ट्रेड डेटातून कोणताही संकेत मिळत नाही. उर्वरित डेटातून परदेशी संस्थागत गुंतवणूकदार म्हणजेच FII, म्युचअल फंड, मोठे गुंतवणूकदार आणि प्रमोटर्सच्या खरेदी -विक्रीची माहिती मिळते.

ऑर्बिट्राज फंडातून बल्क डीलची माहिती घ्या

मुळात आर्बिट्राज फंड रोख आणि डेरिव्हेटिव्ह मार्केटमधील अंतराचा फायदा घेण्यात गुंतलेले असतात. ऑर्बिट्राज फंडातून बल्क डील होत असल्यास फ्युचर्स मार्केटमध्ये एखाद्या शेअर्सची विक्री किंवा खरेदीचे सौदे होऊ शकतात. म्हणजेच तुम्हाला योग्य अंदाज लावता येणार नाही. अशा परिस्थितीत बल्क डीलमधून आर्बिट्राज फंडाचा डेटा वेगळा करावा लागतो. त्यानंतर मिळणारा डेटाचा वापर करून हेमंत शेअर्सची निवड करू शकतो. बल्क डीलमधून प्रत्येक वेळी एखादा शेअर्स वर जाईल की खाली जाईल याची माहिती मिळत नाही. मात्र,एखाद्या शेअर्समध्ये वारंवार बल्क डील होत असेल तर त्या शेअर्सचा खरेदीचा ट्रेंड सुरू आहे की विक्रीचा याची माहिती मिळते,अशी माहिती मारवाडी शेअर्स अॅंड फायनान्सचे उपाध्यक्ष अखिल राठी यांनी दिलीये. गुंतवणूकदार बल्क डीलच्या डेटाचा वापर रणनीती करण्यासाठी एका पॅरामिटर प्रमाणे करू शकतात. पण त्याचा वापर काळजीपूर्वक केला पाहिजे असेही राठी यांनी म्हटले आहे.