Demat Account : डिमॅट खात्यात नॉमिनेशन करा वर्षभरात, सेबीने दिली मुदत वाढ

डिमॅट खात्यात वारस नेमण्यासाठी, नॉमिनेशनसाठी सेबीने ग्राहकांना मोठा अवधी दिला आहे. आता ग्राहक वर्षभरात केव्हाही नॉमिनेशन प्रक्रिया ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने पूर्ण करु शकतात.

Demat Account : डिमॅट खात्यात नॉमिनेशन करा वर्षभरात, सेबीने दिली मुदत वाढ
डिमॅट खात्यात नॉमिनेशन करा वर्षभरातImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 29, 2022 | 9:45 AM

मुंबई : 31 मार्च जवळ आली की सरकारी कार्यालयात जणू उत्सवापूर्वीच्या तयारीची गडबड असते. ऊर फाटेस्तोवर कामाची कोण लगबग असते, सर्वच सरकारी कार्यालयात लगीनघाई असते. तर ग्राहक आणि नागरिकांची धांदल उडालेली असते. कोणत्या तरी योजना, सवलतीची मुदत संपत येणार असते आणि मुदत असताना झोपलेले लोक अचानक जागे होत काम करण्यासाठी तुटून पडतात. आर्थिक वर्षाची (Fiscal Year) शेवटची तारीख असल्याने या कामांचा निपटारा करणे अत्यावश्यक असते, कारण त्यासाठी मुदत दिलेली असते. सध्या पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक (Pan Card-Aadhar Card Link) करण्यापासून ते डिमॅट खात्यात (Demat Account) वारस जोडण्यापर्यंतच्या अनेक कामांची अंतिम मुदत संपत आली आहे. ईपीएफओ मध्ये ई-नॉमिनेशनची (EPFO e-Nomination) अंतिम तारीख 31 मार्च आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात या कामांचा निपटारा करणे अत्यावश्यक आहे. नाहीतर तुम्ही मिळणा-या खास सवलतींना मुकाल. आता डिमॅट खाते धारकांना दिलासा देणारी बातमी, त्यांना खात्यात वारस जोडण्याच्या प्रक्रियेला एक वर्षांची मुदत वाढ देण्यात आली आहे.

31 मार्च अंतिम तारीख

शेअर बाजारातील उलाढालीत सक्रिय असणा-या डिमॅट खातेधारकांनी त्यांच्या वारसदाराचे नाव खात्याशी जोडावे यासाठी भारतीय प्रतिभूती आणि विनियमन बोर्डाने अर्थात सेबीने 31 मार्च ही अंतिम तारीख जाहीर केली होती. या कालावधीतच खातेधारकांना ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने नॉमिनेशनची प्रक्रिया पूर्ण करायची होती. परंतू सेबीने खातेधारकांना ऐन दोन दिवसांपूर्वी मोठा दिलासा दिला आहे. खातेधारकांना नॉमिनेशन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एक वर्षांचा कालावधी दिला आहे. याचा अर्थ जे ग्राहक नॉमिनेशन प्रक्रिया पूर्ण करु शकले नाहीत. त्यांना 31 मार्च 2023 पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करता येईल. यापूर्वी ही तारीख 31 मार्च 2022 होती.

अशी करा प्रक्रिया

  1. खातेधारक वारसदारचे नाव जोडण्यासाठी अर्ज भरु शकतात.
  2. माहिती भरून, स्वाक्षरी करुन ब्रोकरेज कंपनीच्या कार्यालयात ते टपालाने अथवा कुरियरने पाठवू शकतात.
  3. नॉमिनेशन अर्जासोबत खातेधारकाला वारसाचे ओळखपत्र सत्यप्रत पाठवावी लागेल.
  4. यामध्ये आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र आणि वाहन परवाना यांचा समावेश आहे.
  5. तुम्ही डिमॅट खाते उघडले असेल, नॉमिनीची प्रक्रिया ही केली असेल आणि आता वारस बदलायचा असेल तर तुम्हाला 25+18 टक्के
  6. जीएसटी शुल्कासह ही प्रक्रिया पूर्ण करता येईल.
  7. खाते सुधारीत अर्जासह यापूर्वीच्या वारस जोडण्याची मुळ प्रत जोडावी लागेल.

इतर बातम्या

Beed : धमक असेल तर गावात रस्ता आणाच, नाईकवाडेंचं संदीप क्षीरसागरांना आव्हान, जयदत्त क्षीरसागरांची शेरोशायरीतून टीका

भाजपमध्ये विखेंना मान मिळतो की नाही याबाबत मला माहीत नाही – Chhagan Bhujbal

Nashik | सासूचा अंत्यसंस्कार करून आलेल्या नवविवाहितेला विजेचा शॉक; अर्ध्यावरती डाव मोडिला…!

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.