AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्या कर्जावरही मिळू शकते क्रेडिट कार्ड, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Credit Card | काही बँकांकडून शैक्षणिक कर्ज घेतलेल्या विद्यार्थ्यांना क्रेडिट कार्ड दिले जाते. स्टुडंट क्रेडिट कार्डचे तीन प्रकार असतात. एक ज्या विद्यार्थ्यांनी कर्ज घेतले आहे त्यांना क्रेडिट कार्ड दिले जाते. दुसरा प्रकार म्हणजे Add On Card

तुमच्या कर्जावरही मिळू शकते क्रेडिट कार्ड, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
क्रेडिट कार्ड
| Edited By: | Updated on: Aug 29, 2021 | 11:31 AM
Share

मुंबई: अनेकांना क्रेडिट कार्ड घ्यायची इच्छा असूनही बँकेचे नियम आणि अटींमुळे ते मिळत नाही. अशा लोकांसाठी आता एक पर्याय उपलब्ध झाला आहे. तुम्ही एखाद्या बँकेतून कर्ज घेतल्यानंतर त्याच बँकेतून तुम्हाला क्रेडिट कार्ड मिळू शकते. क्रेडिट कार्ड हे फक्त उधारीवर खरेदी करण्यासाठी उपयोग पडत नाही. तर त्यामुळे क्रेडिट स्कोअर वाढून तुम्हाला भविष्यात मोठे कर्ज मिळू शकते.

काही बँकांकडून शैक्षणिक कर्ज घेतलेल्या विद्यार्थ्यांना क्रेडिट कार्ड दिले जाते. स्टुडंट क्रेडिट कार्डचे तीन प्रकार असतात. एक ज्या विद्यार्थ्यांनी कर्ज घेतले आहे त्यांना क्रेडिट कार्ड दिले जाते. दुसरा प्रकार म्हणजे Add On Card, यामध्ये संबंधित विद्यार्थ्याच्या कुटुंबातील सदस्याला क्रेडिट कार्ड मिळते. तर तिसरा प्रकार म्हणजे तुम्हाला बँकेतील मुदत ठेवीवर (Fixed Deposite) क्रेडिट कार्ड दिले जाते.

कोणत्या कागदपत्रांची गरज लागते?

नेहमीच्या क्रेडिट कार्डापेक्षा स्टुडंट क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी तुलनेत कमी धावपळ करावी लागते. फार कागदपत्रंही जमा करावी लागत नाहीत. विद्यार्थ्यांकडे कोणताही रोजगार नसल्यामुळे त्यांना उत्पन्नाचा दाखला द्यावा लागत नाही. केवळ शैक्षणिक कर्जाच्या आधारे क्रेडिट कार्ड इश्यू केले जाते.

क्रेडिट कार्डाची लिमीट किती?

बहुतांश स्टुडंट क्रेडिट कार्डाची लिमीट 15 हजारापर्यंत असते. हे क्रेडिट कार्ड पाच वर्षांसाठी वैध असते. मुलाचे शिक्षण पूर्ण होऊन तो नोकरीला लागला की रेग्युलर क्रेडिट कार्ड वापरेल, या हिशेबाने कार्डाची वैधता कमी ठेवली जाते. या कार्डावरून ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने शॉपिंग करता येते.

फिक्स डिपॉझिटवर क्रेडिट कार्ड

तुम्ही फिक्स्ड डिपॉझिटमध्ये जेवढे पैसे गुंतवले असतील त्या रक्कमेच्या 75 ते 80 टक्क्यांची क्रेडिट लिमीट असलेले कार्ड तुम्हाला मिळू शकते. अशाप्रकारे क्रेडिट कार्ड मिळवल्यास ते सिक्योर्ड कार्ड असते. याचा अर्थ बँकेने तुमच्या नावे क्रेडिट कार्ड जारी केल्यानंतर तुमच्या मुदत ठेवीचे पैसे त्यासाठी तारण किंवा हमीच्या स्वरुपात राहतील. त्यामुळे तुमच्या फिक्स्ड डिपॉझिटमध्ये जितके जास्त पैसे असतील तेवढी तुमची क्रेडिट लिमीट असेल.

Axis बँकेत ही मर्यादा 80 टक्के इतकी आहे. तसेच बँकांकडून क्रेडिट कार्ड देताना तुमच्या मुदत ठेवीचा कालावधी कधी संपुष्टात येतो, हेदेखील पाहिजे जाते. तुम्ही क्रेडिट कार्डाचे पैसे फेडले नाहीत तर बँक ती रक्कम मुदत ठेवीच्या पैशातून कापून घेते. तसेच तुम्हाला एखाद्या अडचणीच्यावेळी मुदत ठेवीतील पैसे काढायचे झाले तर त्यापूर्वी तुम्हाला क्रेडिट कार्ड कॅन्सल करावे लागेल. त्यानंतरच तुम्हाला फिक्स्ड डिपॉझिटमधील सर्व पैसे मिळतील.

फिक्स्ड डिपॉझिटवर घेतलेल्या सिक्योर्ड क्रेडिट कार्डासाठी तुम्हाला उत्पन्नाचा दाखल देण्याची गरज नसते. गृहिणी, विद्यार्थी आणि असंघटित क्षेत्रातील कामगारही हे क्रेडिट कार्ड मिळवू शकतात. या कार्डावर 48 ते 55 दिवसांचा इंटरेस्ट फ्री पीरियड असतो. या काळात ग्राहकांनी बिल भरल्यास त्यावर व्याज भरावे लागत नाही. तसेच यावर रिवॉर्ड पॉईंटस आणि कॅशबॅकचीही सुविधा मिळते. क्रेडिट कार्डाचे पैसे वेळेवर भरले तर तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारत जाईल. त्याचा भविष्यात तुम्हाला फायदा होईल

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.