स्वस्तात कर्ज हवे आहे?, मग ‘या’ गोष्टींची काळजी घ्याच

एकच बँक (bank) एकाच प्रकारचं कर्ज वेगवेगळ्या ग्राहकांना विविध प्रकारच्या व्याज दरानं (Interest) देते. मग एका ग्राहकाला कमी व्याज दर तर दुसऱ्या ग्राहकाला जास्त व्याज दरानं लोन (Loan) का मिळतं? तसेच स्वस्त कर्ज मिळवण्यासाठी काय करावे हे आज आपण जाणून घेणार आहोत.

स्वस्तात कर्ज हवे आहे?, मग 'या' गोष्टींची काळजी घ्याच
स्वस्त लोन
Follow us
| Updated on: Feb 21, 2022 | 5:30 AM

एकच बँक (bank)एकाच प्रकारचं कर्ज वेगवेगळ्या ग्राहकांना विविध प्रकारच्या व्याज दरानं देते. मग एका ग्राहकाला कमी व्याज (Interest) दर तर दुसऱ्या ग्राहकाला जास्त व्याज दरानं लोन (Loan) का मिळतं? याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? याचे उत्तर अगदी सोपे आहे. बँकेत कर्ज हे क्रेडिट स्कोअर पाहून दिले जाते. क्रेडिट स्कोअर म्हणजेच CIBIL रेटिंगच्या आधारे तुमच्या घर, कार आणि इतर पर्सनल लोनसाठीचा व्याजदर निश्चित होतो. खराब क्रेडिट स्कोअर असल्यास महाग लोन मिळते. तर अनेकवेळा लोन देखील मिळत नाही. याऊलट चांगला क्रेडिट स्कोअर असल्यास बँक स्वस्त कर्ज उपलब्ध करून देतात. चांगल्या क्रेडिट स्कोअर असलेल्या ग्राहकाला सात टक्के व्याजदरानं कर्ज मिळतं. तर खराब क्रेडिट स्कोअर असलेल्या ग्राहकाला 12 ते 15 टक्के व्याजदरानं कर्ज देण्यात येते. त्यामुळेच तुम्हाला जर स्वस्तात होम लोन किंवा इतर कुठलेही लोन हवे असेल तर तज्ज्ञांकडून तुम्हाला तुमचा सीआबीआयएल स्कोर वाढवण्याचा सल्ला दिला जातो. तो कसा वाढवावा हे आपण जाणून घेऊयात.

क्रेडिट स्कोअर पाहून ठरतात कर्जाचे व्याज दर

6.5 टक्क्याच्या होम कर्जाची जाहिरात पाहून अजय बँकेत गेला. मात्र, मॅनेजरनं अजयला 8.5 टक्के दरानं कर्ज मिळेल असं सांगितलं. बँकांच्या मोठ मोठ्या जाहिरातीनंतरही अजयला कमी व्याज दरात कर्ज का मिळालं नाही. साधी गोष्ट आहे. बँकेत कर्ज क्रेडिट स्कोअर पाहून दिलं जातं. क्रेडिट स्कोअर म्हणजेच CIBIL रेटिंगच्या आधारे तुमच्या घर, कार आणि इतर पर्सनल लोनचा व्याजदर निश्चित होतो. खराब क्रेडिट स्कोअर असल्यास महाग लोन मिळते आणि बऱ्याचदा लोनसुद्धा मिळत नाही. याऊलट चांगला क्रेडिट स्कोअर असल्यास बँक स्वस्त कर्ज देतात.

तज्ज्ञ काय म्हणतात?

क्रेडिट स्कोअर पाहूनच पर्सनल लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यात येतात, असं rectifycredit.comच्या फाउंडर अपर्णा रामचंद्रा यांनी सांगितलंय. खराब क्रेडिट स्कोअर असल्यास बँका अर्ज रद्द करतात. घर किंवा कार यासारखे लोन घेताना तुम्ही तुमची संपत्ती गहान ठेवता. त्यामुळे बँका लोन द्यायला तयार होतात. मात्र, व्याजदरात तफावत असू शकते. चांगल्या क्रेडिट स्कोअर असलेल्या ग्राहकाला सात टक्के व्याजदरानं कर्ज मिळतं. तर खराब क्रेडिट स्कोअर असलेल्या ग्राहकाला 12 ते 15 टक्के व्याजदरानं कर्ज मिळू शकतं. अनसिक्युरर्ड कर्जाच्या संदर्भात क्रेडिट स्कोअर खूप महत्वाचा आहे . खराब क्रेडिट स्कोअर असल्यास अर्ज रद्द केल्या जातो. याऊलट, कमी क्रेडिट स्कोअर असतानाही सिक्युर्ड कर्ज देताना जास्त व्याज दर द्यावा लागतो. असे अपर्णा रामचंद्रा यांनी म्हटले आहे.

या गोष्टींची काळजी घ्या

तुम्हाला जर कुठल्याही प्रकारचे कर्ज स्वस्तात हवे असेल तर तुम्हाला सर्व प्रथम तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारावा लागेल. कर्ज देण्याच्या अगोदर बँका ग्राहकाच्या कर्ज देण्या घेण्याच्या सवयी आणि परतफेडीच्या बाबीकडे लक्ष ठेवतात. तुमच्यावर किती प्रकारचे कर्ज आहे ?, कर्जाचा हप्ता वेळेवर भरत आहात का?, क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरत आहात का? की फक्त मिनिमम ड्यू भरत आहात. तुम्ही दिलेला चेक बाउंस झाला का?, तुमच्या नावानं एखादा इनएक्टिव्ह अकाऊंट तर नाही ना ? तुम्ही गॅरेंटर असलेल्या कर्जप्रकरण डिफॉल्ट झाले आहे का अशा सर्व गोष्टी बँका तपासत असतात. या सर्वांवरून तुमचा क्रेडिट स्कोअर ठरतो. तेव्हा कुठलाही व्यवहार कताना तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होणार नाही याची काळजी घ्या. क्रेडिट स्कोअर सुधारण्यासाठी प्रयत्न करा, निश्चितच तुम्हाला स्वस्त कर्ज मिळेल.

संबंधित बातम्या

आयपीओनंतर ‘एलआयसी’ व्यावसायिक धोरणांमध्ये बदल करणार, खासगी विमा कंपन्यांना मोठा फटका!

अवघ्या 6 हजारात 1 एकर, ती पण डायरेक्ट चंद्रावर! प्रोफेसरनं कशी केली चंद्रावरील जमिनीची डील?

महागाईची तिसरी लाट येणार?; उत्पादन, सेवा क्षेत्रात दरवाढ अटळ

Non Stop LIVE Update
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले....
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले.....
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?.
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं.
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली.
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?.
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?.
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्...
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्....
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप.
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम.
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?.