PPF | पीपीएफ खात्यातून सहज मिळवा रक्कम..पण या गोष्टींचं ठेवा भान..

PPF | पीपीएफ खाते 15 वर्षानंतर मॅच्युअर होते. पण त्यापूर्वी तुम्हाला खात्यातून मुदतपूर्व रक्कम काढते येते. आता तर हा प्रकार आणखी सोपा झाला आहे..

PPF | पीपीएफ खात्यातून सहज मिळवा रक्कम..पण या गोष्टींचं ठेवा भान..
पीपीएफ खात्यातून अशी काढा रक्कमImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 20, 2022 | 7:17 PM

मुंबई : पीपीएफ (PPF) खाते 15 वर्षानंतर मॅच्युअर होते. पण त्यापूर्वी तुम्हाला खात्यातून मुदतपूर्व रक्कम (Advance amount) काढता येते. ही रक्कम कधी काढता येते. त्यासाठी काय करावे लागेल याविषयीची माहिती घेऊयात..

तर पीपीएफमध्ये गुंतवणुकीला 7 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला या खात्यातून रक्कम काढता येते. एका आर्थिक वर्षातही रक्कम काढता येते. पण त्याचे प्रमाण ठराविक (partial withdrawal)असते. त्यावर तुम्हाला रक्कम काढता येत नाही. अत्यंत अडचणीच्या काळात हा उपाय तुम्हाला करता येतो.

एका आर्थिक वर्षात गुंतवणूकदाराला एकदाच रक्कम काढण्याचे स्वातंत्र्य आहे. तर पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर ठोस कारण देऊन हे खाते तुम्हाला कायमचे बंद करता येते. जर तुम्हाला एक ठराविक रक्कम या खात्यातून काढायची असेल तर बँक अथवा पोस्ट खात्यात फॉर्म सी (Form C) जमा करावा लागतो.

हे सुद्धा वाचा

तुम्हाला अंशतः रक्कम काढण्यासाठी अगोदर बँक अथवा पोस्टातून अर्ज आणावा लागेल. अथवा या संस्थांच्या संकेतस्थळावरुन तो डाऊनलोड करावा लागेल. हा संपूर्ण अर्ज वाचून काढावा लागेल. त्यात योग्य माहिती जमा करावी लागेल .

या फॉर्मचा पहिला भाग हा डिक्लरेशनचा असतो. त्यात पीपीएफ खाते क्रमांक द्यावा लागतो. किती रक्कम काढायची आहे त्याची माहिती द्यावी लागते. तसेच खात्याला किती वर्षे पूर्ण झाली याची माहिती द्यावी लागते. अल्पवयीन व्यक्तीच्या नावे खाते असेल तर त्याची माहिती द्यावी लागते.

त्यानंतर दुसऱ्या पानावर तुमचे नाव, पत्ता, खाते क्रमांक, खाते सुरु करण्याची तारीख, रक्कमेची माहिती, एकूण रक्कम, स्वाक्षरी आणि तारीख आदी माहिती कार्यालय भरते.

या अर्जासोबत तुम्हाला पीपीएफ पासबूक द्यावे लागते. या अर्जावर रेव्हेन्यू स्टॅम चिटकावून त्यावर स्वाक्षरी करावी लागते. मंजूर राशी तुमच्या खात्यात जमा होते. अद्याप पीपीएफ खाते ऑनलाईन प्रक्रियेत न आल्याने यासंबंधीची प्रक्रिया संबंधित बँक शाखा अथवा पोस्ट कार्यालयात जाऊन करावी लागते.

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.