Aadhar Card News | आधार कार्डवरील फोटो नाही आवडला, मग फॉलो करा या सोप्या स्टेप्स आणि बदला तुमचा फोटो

Aadhar Card Photo Change | आधार कार्डवरील फोटो हा एक संशोधनाचा विषय आहे. किती चांगला माणूस असू द्या तो ओळखूच येणार नाही, असा काहीसा प्रकार होतो. त्यामुळे तुमचा फोटो बदलायचा असेल तर या सोप्या पद्धतीने तो बदलता येतो.

Aadhar Card News | आधार कार्डवरील फोटो नाही आवडला, मग फॉलो करा या सोप्या स्टेप्स आणि बदला तुमचा फोटो
फोटो असा बदला Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 25, 2022 | 9:00 AM

Aadhar Card Update | आधार कार्डवरील (Aadhar Card) फोटो (Photo) हा एक संशोधनाचा विषय आहे. किती चांगला माणूस असू द्या तो ओळखूच येणार नाही, असा काहीसा प्रकार होतो. अनेक जण आधार कार्डवरील या फोटोमुळे नाराज असतात. त्यांना हा फोटो बदलून हवा असतो. आधार कार्ड हे महत्वपूर्ण ओळखपत्र (Identity Card) असल्याने त्यावरील तुमचा फोटो चांगला आलेला नसेल तर नाखूश असण्याचे कारण नाही. कारण तुमचे छायाचित्र काही सोप्या पद्धतीने बदलता येते. त्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) एक सोपी प्रक्रिया ठरवली आहे. आधार कार्डमधील फोटो बदलण्यासाठी साधारण 90 दिवसांचा कालावधी लागू शकतो. आधार कार्डमधील बदलासाठी तुम्हाला आधार केंद्रावर जावे लागेल. सर्वसामान्य नागरिकांना आधार कार्डमध्ये सहज दुरुस्ती करता यावी यासाठी UIDAIने देशभरातील 53 शहरात 114 आधार सेवा केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्रावर बदला फोटो

तुम्ही आधारावरील तुमच्या छायाचित्रामुळे नाखूश असाल आणि हा फोटो बदलायचा असेल तर तुम्हाला जवळच्या अधिकृत आधार केंद्रावर जावे लागेल. याठिकाणी तुम्हाला रितसर अर्ज भरुन फोटो बदलता येईल.

या आहेत सोप्या स्टेप्स

1 जवळच्या आधार सेवा केंद्रावर जा. 2. यूआयडीएआयच्या संकेतस्थळावरुन आधार नोंदणी फॉर्म डाऊनलोड करा. 3. फॉर्ममध्ये कोणते बदल करावेत ते भरा. 4. फॉर्म संबंधित अधिकाऱ्याकडे जमा करा आणि त्यासोबत बायोमेट्रिक तपशीलही द्या. 5. यानंतर संबंधित अधिकारी आपला नवा फोटो काढेल. 6. कार्डधारकाला बायोमेट्रिक देऊन संबंधित माहितीची खात्री करावी लागेल 7. या प्रक्रियेसाठी 50 रुपये आणि जीएसटी आकारला जातो. 8. नोंदणी आणि प्रक्रियेनंतर पावती दिली जाईल. 9. संकेस्थळावरुन तुम्हील केलेल्या बदलाची स्थिती तपासता येते. 10.युआयडीएआयच्या संकेतस्थळावरुन अपडेटेड आधार कार्ड डाऊनलोड करता येणार आहे.

हे सुद्धा वाचा

या गोष्टीही जाणून घ्या

आधार कार्डमधील फोटो बदलण्यासाठी साधारण 90 दिवसांचा कालावधी लागू शकतो. आधार सेवा केंद्रातील संबंधित अधिकारी हा फोटो काढतात. त्याची नोंद होते. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला अद्ययावत आधार कार्ड डाऊनलोड करता येते.

53 शहरात 114 केंद्र

सर्वसामान्य नागरिकांना आधार कार्डमध्ये सहज दुरुस्ती करता यावी यासाठी UIDAIने देशभरातील 53 शहरात 114 आधार सेवा केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. आधार सेवा केंद्राची ही सेवा देशातील मेट्रो सिटी, राज्यांची राजधानी, केंद्र शासीत प्रदेशात सुरु करण्यात येणार आहे. सध्या UIDAI कडून देशभरात केवळ 88 केंद्र सुरु आहेत. ही सेवा केंद्र अत्यंत तोकडी असून त्यावर कामाचा अत्यंत भार आहे. या आधार केंद्रांव्यतिरिक्त देशभरात संलग्नीत 35,000 हून अधिक सेवा केंद्रही कार्यरत आहेत. ही सेवा केंद्र बँका, टपाल कार्यालये आणि राज्य सरकारमार्फत चालविण्यात येतात.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.