AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Railway Ticket : भावा, जनरल तिकीट खरेदीनंतर पटकन कर प्रवास, वेळेचे ठेव भान, उशीर झाल्यास फटका बसणार

Railway Ticket : जनरल तिकीटावर किती वेळेत प्रवास करावा लागतो, यासंबंधीचा नियम काय सांगतो.

Railway Ticket : भावा, जनरल तिकीट खरेदीनंतर पटकन कर प्रवास, वेळेचे ठेव भान, उशीर झाल्यास फटका बसणार
| Updated on: Jan 25, 2023 | 8:02 PM
Share

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेच्या (Indian Railway) अनेक प्रकारच्या ट्रेन दररोज धावतात. पॅसेंजर, मेल, मेल एक्सप्रेस, एक्सप्रेस आणि सुपरफास्ट रेल्वे दररोज देशाच्या कान्याकोपऱ्यात धावतात. जवळपास प्रत्येक रेल्वेला जनरल डब्बे जोडण्यात येतात. यामध्ये प्रवासासाठी जनरल तिकीट (General Train Ticket) खरेदी करावे लागते. रेल्वेचे हे सर्वात स्वस्त तिकीट असते. हे तिकीट खरेदी केल्यानंतर किती वेळेत प्रवास करता येतो, असा प्रश्न अनेकांना पडतो. अनेक लोकांची अशी भावना आहे की, जनरल तिकीट खरेदी केल्यानंतर दिवसभरात कधीही रेल्वेचा प्रवास करता येतो. परंतु, हा गैरसमज आहे. जनरल तिकीट खरेदीनंतर तुम्हाला पुढील तीन तासात प्रवास करता येतो. त्यामुळे आता जनरल तिकीट खरेदी केले असल्यास आरामात गंतव्य स्थान गाठू असा विचार झटकून टाका.

भारतीय रेल्वेच्या नियमानुसार, जर 199 किलोमीटरचा प्रवास करायचा असेल तर जनरल तिकीटावर तीन तासांच्या आता ट्रेनचा प्रवास करावा लागतो. तर 200 किलोमीटर वा त्यापेक्षा लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी तीन दिवस अगोदर तिकीट खरेदी करता येते.

199 किलोमीटरपेक्षा कमी अंतर असेल तर हा नियम बदलतो. कमी अंतरासाठी कोणी प्रवासी तिकीट खरेदी करतो तर त्याला पहिली ट्रेन पकडणे फायद्याचे ठरते. ती हुकली तर पुढील तीन तासांत येणारी रेल्वे त्याला गाठावी लागेल. त्यानंतर नियमानुसार त्याला प्रवास करता येणार नाही.

रेल्वेने जनरल तिकीटासाठीची कालमर्यादा निश्चित केली आहे. 2016 मध्ये याविषयीचा नियम तयार करण्यात आला आहे. त्यामुळे निर्धारीत वेळेनंतर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे. वेळेत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काहीच त्रास होणार नाही.

199 किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी एखाद्याने जनरल तिकीट खरेदी केले, तर त्याला पुढील तीन तासात हे अंतर कापावे लागेल. जी ट्रेन येईल, त्यात त्याला प्रवास करावा लागेल. तीन तास उलटल्यानंतर त्याने प्रवास केला, तर तो विना तिकीट प्रवास करत असल्याचे गृहीत धरण्यात येईल. त्याच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल.

नियमानुसार निर्धारीत वेळेत प्रवास केला नाही तर तुमचे जनरल तिकीट रद्द होत नाही. तसेच वेळेनंतर प्रवास करत असल्याने प्रवासासाठी हे तिकीट ग्राह्य ही धरण्यात येत नाही. उलट विना तिकीट प्रवास केल्यानं तुम्हाला भूर्दंड बसू शकतो.

अनारक्षित तिकीटावर दिवसभर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना धडा शिकवण्यासाठी रेल्वेने हे पाऊल टाकले आहे. यापूर्वी नियम नसल्याने जनरल तिकीटाचा प्रवासी दुरुपयोग करत असल्याचे आढळून आले होते. काहींनी तर याचा दुरुपयोग सुरु केला होता. अनेक जण प्रवासानंतर हे तिकीट दुसऱ्याला कमी भावात विक्री करत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे रेल्वेला आर्थिक फटका बसत होता.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?