AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंडसइंड बँकेची ‘इंडस इझी क्रेडिट’ योजना; घरबसल्या करा सगळी प्रक्रिया

या प्लॅटफॉर्ममुळे इंडसइंड बँकेचे सध्याचे ग्राहक तसेच जे ग्राहक नाहीत, ते नागरिकसुद्धा कागदीविरहित, स्वतः हजेरी न लावता आणि कॅशलेस पद्धतीने वैयक्तिक कर्ज तसेच क्रेडिट कार्डसाठी अर्ज करू शकतात. (IndusInd Bank's 'Indus Easy Credit' scheme; Do the whole process at home)

इंडसइंड बँकेची ‘इंडस इझी क्रेडिट’ योजना; घरबसल्या करा सगळी प्रक्रिया
इंडसइंड बँकेची ‘इंडस इझी क्रेडिट’ योजना
| Edited By: | Updated on: Jul 03, 2021 | 7:25 AM
Share

नवी दिल्ली : आपल्या ग्राहकांसाठी बँकिंगचा चांगला अनुभव देण्यासाठी इंडसइंड बँकेने आपल्या डिजिटल फर्स्टच्या दृष्टीकोनातून सर्वप्रथम ‘इंडस इझी क्रेडिट’ असे सर्वसमावेशक डिजिटल कर्ज देण्याचे प्लॅटफॉर्म सादर केले आहे. सध्या ग्राहक या सुविधेचा लाभ बँकेच्या संकेतस्थळाच्या मदतीने घेत आहेत. इंडसइंड बँक ही खासगी क्षेत्रातील आघाडीच्या बँकांपैकी एक बँक असून ती भारतात ठिकठिकाणी कार्यरत आहे. या बँकेची स्थापना 1994 मध्ये झाली व बँकेचे मुख्यालय पुण्यात आहे. (IndusInd Bank’s ‘Indus Easy Credit’ scheme; Do the whole process at home)

व्हिडिओद्वारे केवायसी प्रक्रिया

हे प्लॅटफॉर्म संपूर्णपणे ‘डिजिटल एंड-टू-एंड-प्रोसेस’ प्रदान करते. या प्लॅटफॉर्ममुळे इंडसइंड बँकेचे सध्याचे ग्राहक तसेच जे ग्राहक नाहीत, ते नागरिकसुद्धा कागदीविरहित, स्वतः हजेरी न लावता आणि कॅशलेस पद्धतीने वैयक्तिक कर्ज तसेच क्रेडिट कार्डसाठी अर्ज करू शकतात.

बँकेचे मुख्य डिजिटल अधिकारी आणि व्यवसाय रणनीती विभागाचे प्रमुख चारू माथूर यांनी नव्या प्लॅटफॉर्मबाबत विस्ताराने माहिती दिली. ते म्हणाले, गेल्या काही महिन्यांपासून आमची बँक ग्राहकांना घरांच्या सुखसोयीपासून सुरक्षित आणि सोयीस्कर पद्धतीने सुविधा पुरविण्याच्या दिशेने सतत काम करत होती. इंडस इझी क्रेडिट हे त्याच प्रयत्नांचे एक यश आहे. या प्लॅटफॉर्ममुळे ग्राहकांना एकाच व्यासपीठावर वैयक्तिक कर्ज किंवा क्रेडिट कर्जाची सुविधा मिळू शकेल.

केवायसी प्रक्रिया जी केवळ इंडसइंड बँक नसलेल्या ग्राहकांसाठीच लागू आहे, ती व्हिडिओद्वारे देखील केली जाते. संपूर्ण प्रक्रिया सोपी, त्रास-मुक्त आणि घरबसल्या पूर्ण केली जाऊ शकते. सध्या ग्राहक ‘इंडस इझी क्रेडिट’ सुविधेसाठी बँकेच्या वेबसाइटवर अर्ज करू शकतात. हे लवकरच बँकेचे मोबाईल बँकिंग अँप्लिकेशन ‘इंडसमोबाईल’वरही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

ग्राहकांसाठी त्वरित वैयक्तिक कर्ज प्रक्रिया

– ई-केवायसी पूर्ण करा आणि पात्रता तपासण्यासाठी आवश्यक तपशील प्रदान करा (केवळ इंडसइंड बँक नसलेल्या ग्राहकांसाठी). – आवश्यकतेनुसार पूर्व-मंजूर कर्ज ऑफरमधून रक्कम निवडा. – स्वयंचलित लोकप्रिय व्याज दर, प्रक्रिया शुल्क आणि ईएमआयची रक्कम स्वीकारा. – पूर्ण व्हिडिओ केवायसी (केवळ नॉन-इंडसइंड बँक ग्राहकांसाठी) – डिजिटली करारावर स्वाक्षरी केल्यानंतर, त्यांच्या खात्यावर त्वरित क्रेडिट जमा करण्यासाठी विनंती करा. – ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ग्राहकांच्या खात्यात ताबडतोब पैसे वर्ग केले जातात.

ग्राहकांसाठी क्रेडिट कार्ड

– ई-केवायसी पूर्ण करा आणि पात्रता तपासण्यासाठी आवश्यक तपशील प्रदान करा (केवळ नॉन-इंडसइंड बँक ग्राहकांसाठी लागू). – ग्राहकांना पूर्वमंजूर ( प्री-अँप्रुव्हड) ऑफर मिळतील. – तुम्हाला हवे असलेले इंडसइंड बँक क्रेडिट कार्ड उत्पादन निवडा. – पूर्ण व्हिडिओ केवायसी (केवळ इंडसइंड नसलेल्या ग्राहकांसाठी लागू) – व्हिडीओ केवायसी पूर्ण झाल्यावर हे कार्ड ग्राहकाकडे पाठवले जाते. (IndusInd Bank’s ‘Indus Easy Credit’ scheme; Do the whole process at home)

इतर बातम्या

ठाणे महापालिकेची धडक कारवाई सुरुच, दिवा भागात अनधिकृत बांधकामांवर हातोडा

आपल्या सॅलरी अकाऊंटवर मिळतो लाखो रुपयांचा फायदा, जाणून घ्या यामध्ये कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत ते

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.