AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Investment For Child : तुमच्या राजकुमारीसाठी या बेस्ट स्कीम! भविष्यासाठी आताच करा तरतूद

Investment For Child : तुमच्या लाडक्या लेकीसाठी या आहेत सर्वात चांगल्या योजना..

Investment For Child : तुमच्या राजकुमारीसाठी या बेस्ट स्कीम! भविष्यासाठी आताच करा तरतूद
| Updated on: Jan 28, 2023 | 6:22 PM
Share

नवी दिल्ली : तुमच्या लाडक्या लेकीचे भविष्य सुरक्षित करायचे असेल तर त्यासाठी चांगल्या गुंतवणूक योजनेत (Best Investment Scheme) पैसा अडकविणे आवश्यक आहे. ही गुंतवणूक मुलीच्या भविष्यासाठी उपयोगी पडेल. भारतात बँक आणि टपाल खात्यातील (Bank And Post office) गुंतवणूक योजनेत अनेक पर्याय आहेत. या बचत योजनेत गुंतवणूक केल्यास त्याचा फायदा होतो. आई-वडिलांनी या पर्यायांचा अभ्यास करावा आणि त्यातील मुलीच्या भविष्यासाठी योग्य त्या योजनेची निवड करावी. या योजनेत गुंतवणूक करुन मुलीच्या भविष्यासाठी मोठा निधी तयार करता येऊ शकतो.

सुकन्या समृद्धी योजनेत (SSY) 10 वर्षांपर्यंतच्या मुलीसाठी गुंतवणूक करता येते. आई-वडील या योजनेत मुलीच्या नावे गुंतवणूक करु शकतात. खाते उघडल्यानंतर पुढील 15 वर्षांसाठी मुलीच्या नावे दरमहा वा वार्षिक गुंतवणूक करता येते.  त्याआधारे मुलीसाठी दीर्घकालीन फायदा मिळविता येतो.

सध्या सुकन्या समृद्धी योजनेवर 7.6% व्याज मिळते. सुकन्या समृद्धी योजना नियम, 2018 नुसार, खाते उघडण्यासाठी किमान 1,000 रुपयांची अट मागे घेण्यात आली आहे. आता किमान 250 रुपयांची गुंतवणूक करुन खाते उघडता येते. एका वर्षात या योजनेत कमाल 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते.

द चिल्ड्रेन गिफ्ट म्युच्युअल फंड हा भारतातील मुलींसाठी एक जोरदार आणि योग्य योजना आहे. मुलींच्या भविष्यासाठी ही योजना चांगली आहे. इक्विटी बाजारात ही योजना चांगला परतावा देते. बाजारातील संभाव्य धोके आणि फायदे याची माहिती घेऊन गुंतवणूक करता येते.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) केंद्र सरकारची जोरदार योजना आहे. ही योजना देशातील कोणत्याही टपाल खात्यातून सुरु करता येते. मुलींच्या भविष्यासाठी ही योजना चांगली मानण्यात येते. अनेक तज्ज्ञ ही योजना गुंतवणूकीसाठी योग्य असल्याचा दावा करतात.

पोस्ट-ऑफिस टर्म डिपॉझिट (POTD) योजनाही गुंतवणूकीसाठी आहे. बँकेच्या मुदत ठेव योजनेशी पोस्टाच्या योजनेची तुलना करण्यात येते. पोस्ट खात्याची 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष आणि 5 वर्षांच्या योजनेसाठी व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. पूर्वी हा दर 5.5%, 5.7%, 5.8% आणि 6.7% होता. आता हा व्याजदर 6.6%, 6.8%, 6.9% और 7% करण्यात आला आहे.

गुंतवणुकीचा आणखी एक पर्याय आहे. युनिट लिंक विमा योजना, युलिप (ULIP) हा एक पर्याय आहे. या योजनेतही मुलीसाठी गुंतवणूक करता येऊ शकते. ही योजना चांगला परतावा देते. युनिट लिंक विमा योजनेत गुंतवणुकीपूर्वी  तुमच्या आर्थिक सल्लागाराची मदत आणि सल्ला नक्की घ्या.

Follow Us
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल