Investment Schemes : मुलांचे लग्न ते शिक्षणाचा खर्च, दीर्घकालीन गुंतवणुकीचा ‘अर्थ’मार्ग, मॅच्युरिटीवेळी बंपर रिटर्न!

भारतात सर्वाधिक गुंतवणुकदारांची या योजनेला पसंती लाभली आहे. सर्वोत्तम परतावा आणि पैशांची सुरक्षितता यामुळे रिकरिंगकडे गुंतवणुकदारांचा वाढता कल आहे. तुम्ही भविष्यातील गुंतवणुकीचे नियोजन करुन या योजनेत पैसे गुंतवू शकतात.

Investment Schemes : मुलांचे लग्न ते शिक्षणाचा खर्च, दीर्घकालीन गुंतवणुकीचा ‘अर्थ’मार्ग, मॅच्युरिटीवेळी बंपर रिटर्न!
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jan 17, 2022 | 10:15 PM

प्रत्येकाला सुरक्षित भविष्याची चिंता असते. सर्वोत्तम आणि सुरक्षित परतावा देणाऱ्या गुंतवणूक योजनांना (INVESTMENT PLAN) सर्वोच्च प्राधान्य असते. योग्य नियोजन आणि पुरेसे आर्थिक ज्ञान नसल्यास कष्टाच्या पुंजीवर पाणी फेरण्याची देखील शक्यता असते. नेहमी गुंतवणूक करण्यापूर्वी संशोधनाला प्राधान्य द्या. तुम्ही किंवा तुमचे निकटवर्तीय गुंतवणुकीच्या विचारात असल्यास आम्ही तुम्हाला सर्वोत्तम गुंतवणूक पर्यायांची शिफारस करणार आहोत. विविध दीर्घकालीन योजनेत गुंतवणूक करुन बंपर रिटर्न प्राप्त करू शकतात. मॕच्युरिटीनंतर मिळणाऱ्या पैशातून मुलांची लग्ने, शिक्षणाचा खर्च किंवा अन्य बाबींसाठी वापरता येतील. तुम्ही तुमच्या भविष्यासाठी देखील पैशांची बचत करू शकतात. जाणून घेऊया मॕच्युरिटीवेळी बंपर रिटर्न (BUMPER RETURN) देणाऱ्या गुंतवणूक योजनांविषयी-

म्युच्युअल फंड एसआयपी (MUTUAL FUND SIP)

सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) हि म्युच्युअल फंड्स तर्फे गुंतवणूकदारांसाठी चालविण्यात येणारी गुंतवणूक योजना आहे. या योजनेनुसार गुंतवणूकदार एकरकमी ठेव ऐवजी ठराविक काळाने छोटी रक्कम गुंतविता येते. हि गुंतवणूक दर आठवड्याला, महिन्याला किंवा दर 3 महिन्याला करता येते. एसआयपी हि एक शिस्तबद्ध गुंतवणूक योजना मानली जाते. हि योजना लवचिक असते कारण यात गुंतवणूकदार कधीही गुंतवणूक करणे थांबवू शकतात किंवा गुंतवणुकीची रक्कम कमी किंवा अधिक करू शकतात.

पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (POST DEPOSIT RD)

भारतात सर्वाधिक गुंतवणुकदारांची या योजनेला पसंती लाभली आहे. पोस्ट ऑफिसच्या रिकरिंग डिपॉझिट स्कीममध्ये तुम्हाला नियमित स्वरुपात पैसे जमा करावे लागतात. तुम्ही कमीत कमी पैशापासून गुंतवणुकीस सुरुवात करू शकतात. रिकरिंग डिपॉझिट स्कीम साठी गुंतवणुकीची निश्चित स्वरुपात मर्यादा नाही. व्याजदराची गणना चक्रवाढ पद्धतीने केली जाते. तिमाही अखेर व्याज मुख्य रकमेत जमा केले जाते.

नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट (NSC)

भविष्यातील गुंतवणुकीसाठी (Future Savings) सुरक्षित आणि सर्वोत्तम परतावा देणाऱ्या योजनांच्या शोध सातत्याने घेतला जातो. भारतीय पोस्टाची (NSC )अर्थातच नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट योजना सर्वोत्तम ठरते. नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट (National Savings Certificate) हा भारत सरकारचा उपक्रम आहे. एनएससीचा मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षांचा आहे आणि सध्या वार्षिक 6.8 व्याजदर (Intrest rate) दिला जातो. जर तुम्ही 1.5 लाख गुंतवणूक करत असल्यास 5 वर्षांनंतर तुम्हाला मॅच्युरिटी नंतर 2,08,424 रक्कम मिळेल.

संबंधित बातम्या :

…अशी ही गंडवागंडवी! गुंतवणूक हजारात, रिटर्न लाखात; शेअर फसवणुकीचा ‘सोशल’ पॅटर्न!

Gold Price Today : चांदीला लकाकी, सोने वधारले: प्रमुख शहरातील भाव एका क्लिकवर

क्रेडिट कार्डवरील बचतच तुमची कमाई! कॅशबॅक, रिवॉर्डस्, डिस्काउंटच्या माध्यमातून बचत

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.