क्रेडिट कार्डवरील बचतच तुमची कमाई! कॅशबॅक, रिवॉर्डस्, डिस्काउंटच्या माध्यमातून बचत

विविध बॅंकेची क्रेडिट कार्ड (Credit Card) ग्राहकाला  वेगवेगळे फायदे देतात.  एकाच कार्डवर आपल्याला खरेदी, रेस्टॉरंट फूड, मनोरंजन यांसह इतर अनेक प्रकारचे फायदे वसूल करता येतात. आपण खरेदीसह विविध प्रकारची बचत करू शकता.

क्रेडिट कार्डवरील बचतच तुमची कमाई! कॅशबॅक, रिवॉर्डस्, डिस्काउंटच्या माध्यमातून बचत
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jan 17, 2022 | 3:22 PM

अनेक कंपन्यांचे फोन तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी येऊन गेलेले असतील. क्रेडिट कार्ड ही फायदेशीर गोष्ट आहे की नाही, याबाबत मतमतांतरं असू शकतात. पण एकाच कार्डवर वेगवेगळ्या गोष्टी क्रेडिट कार्डच्या माध्यमातून करता येतात. अशावेळी क्रेडिट कार्ड नेमकं कुठचं घ्यावं आणि कुठचं घेऊ नये, याबाबत जाणून घेणं महत्त्वाचं आहे. विविध बॅंकेची क्रेडिट कार्ड (Credit Card) ग्राहकाला वेगवेगळे फायदे देतात. एकाच कार्डवर आपल्याला खरेदी, रेस्टॉरंट फूड, मनोरंजन यांसह इतर अनेक प्रकारचे फायदे वसूल करता येतात. आपण खरेदीसह विविध प्रकारची बचत करू शकता. बाजारात उपलब्ध  अनेक क्रेडिट कार्ड पर्यायांपैकी,  विविध श्रेणींचे फायदे देणारे क्रेडिट कार्डचा शोध घेणे ग्राहकांना हितकारक ठरते. अशा क्रेडिट कार्ड विषयी जाणून घेऊयात.

Axis Bank ACE  क्रेडिट कार्ड

या क्रेडिट कार्डमध्ये तुम्हाला गुगल पेच्या माध्यमातून युटिलिटी बिल पेमेंट करताना 5% कॅशबॅक मिळेल. हे स्विगी, झोमॅटो आणि ओलावर 4% कॅशबॅक ही देते. याशिवाय, इतर सर्व प्रकारच्या खर्चावर 2% फ्लॅट कॅशबॅकचा पर्याय ही ग्राहकांना मिळतो.  वर्षभरात खर्चावर कॅशबॅक मिळतोच, पण कार्डधारकांना भारतातील 400 हून अधिक भागीदार रेस्टॉरंट्समध्ये 4 वेळा विसाव्याचे क्षण अनुभवता येतात आणि 20% पर्यंत सूट मिळते. या क्रेडिट कार्डचे वार्षिक शुल्क 499 रुपये  आहे.

Standard Chartered Digi Smart क्रेडिट कार्ड

हे कार्ड झोमॅटो ग्रॉफर्स वर 10 टक्के आणि झोमॅटोवर  महिन्याला 5 व्यवहारांवर 10% सूट देते. मित्रां कार्डधारकाला खरेदीवर महिन्यातून एकदा 20% सूट, देशांतर्गत उड्डाण तिकिटे बुक करताना 20% सूट आणि तिमाहीत एकदा आंतरराष्ट्रीय उड्डाणे बुक करताना 10,000 रुपयांपर्यंतच्या तिकिटांवर 10% सूट मिळते. तसेच प्रवासादरम्यान देशांतर्गत हॉटेल बुकिंगवर एका तिमाहीत एका व्यवहारासाठी 4,000 रुपयांपर्यंत सूट आणि इतर लाभ ही दिले जातात. या क्रेडिट कार्डचे वार्षिक शुल्क 588 रुपये आहे.

HDFC Regalia क्रेडिट कार्ड

या क्रेडिट कार्डला विमा, युटिलीटी, शिक्षण आणि भाडे यावर 150 रुपयांच्या  सर्व किरकोळ व्यवहारांसाठी 4 रिवॉर्ड पॉईंट  मिळतील. हे उड्डाण तिकिटे, हॉटेल बुकिंग, व्हाउचर, भेटवस्तू आणि उत्पादने इत्यादींसाठी खर्च करता येईल. यात विमानतळ लाउंजमध्येही प्रवेश आहे. यापैकी 12 भारतातील तर  6 विदेशातील आहेत. या कार्डवर वार्षिक शुल्क 2,500 रुपये आहे.

HDFC Dinners Club  क्रेडिट कार्ड

या कार्डवर Amazon Prime, झोमॅटो प्रो, टाइम्स प्राइम, बिग बास्केट इत्यादींचे वार्षिक सदस्यत्व ही मिळते. हे मोठ्या स्पा, सलून, जिम आणि वेलनेस रिट्रीटवर विशेष सूट देखील देते. या कार्डवर वार्षिक शुल्क 2,500 रुपये आहे.

संबंधित बातम्या :

Credit Card : खरंच एकापेक्षा अधिक क्रेडिट कार्डचा फायदा होतो, खिशाला ओझे की फायदेशीर सौदा

आयसीआयसीआय बँकेकडून क्रेडिट कार्डशी संबंधित सर्व शुल्कांमध्ये वाढ, नवे दर दहा फेब्रुवारीपासून लागू

डेबिट कार्ड सुरक्षीत कसे ठेवाल?; ऑनलाईन फसवणुकीपासून वाचण्यासाठी जाणून घ्या ‘हे’ सोपे उपाय

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.