घरं आणि दुकानं स्वस्तात खरेदी करण्याची संधी; इंडियन ओव्हरसीज बँकेकडून मालमत्तांचा लिलाव

IOB Bank | E-Auction मध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला अर्नेस्ट मनी डिपॉझिट आणि केवायसी नजीकच्या शाखेत जमा करावी लागतील. तसेच लिलावत सहभागी होणाऱ्या व्यक्तीची डिजिटल सिग्नेचरही गरजेची आहे.

घरं आणि दुकानं स्वस्तात खरेदी करण्याची संधी; इंडियन ओव्हरसीज बँकेकडून मालमत्तांचा लिलाव
इंडियन ओव्हरसीज बँक

IOB Mega E-Auction: पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदाला मागे टाकत देशातील दुसऱ्या क्रमांकाची सरकारी बँक होण्याचा बहुमान मिळवणाऱ्या इंडियन ओवरसीज बँकेकडून (IOB) मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार आहे. या लिलावात घरं, दुकानं आणि प्लॉट स्वस्तात खरेदी करण्याची संधी चालून आली आहे. 23 जुलै, 17 ऑगस्ट आणि 15 डिसेंबर या तीन दिवशी IOB Mega E-Auction चे आयोजन करण्यात आले आहे. सर्व मालमत्तांचा तपशील iob.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

E-Auction मध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला अर्नेस्ट मनी डिपॉझिट आणि केवायसी नजीकच्या शाखेत जमा करावी लागतील. तसेच लिलावत सहभागी होणाऱ्या व्यक्तीची डिजिटल सिग्नेचरही गरजेची आहे. डिपॉझिट जमा केल्यानंतर संबंधित व्यक्तीला IOC कडून लिलावात सहभागी होण्यासाठी लॉगिन आयडी आणि पासवर्ड दिला जाईल.

कोणत्या संपत्तीचा लिलाव होणार?

इंडियन ओव्हरसीज बँकेच्या www.iob.in वेबसाईटवर ‘Properties Available for sale’या लिंकवर लिलाव करण्यात येणाऱ्या संपत्तीची माहिती आहे. या लिंकवरील पीडीएफ डाऊनलोड करुन तुम्ही कोणती संपत्ती किंवा घर खरेदी करायचं हे ठरवू शकता. लिलावात सहभागी होण्यापूर्वी बँकेच्या वेबसाईटवर जाऊन लिलाव होणाऱ्या संपत्तीची तुम्ही माहिती घेणं आवश्यक आहे. बँकेने मालमत्तांविषयी सर्व कागदपत्रांची पीडीएफ उपलब्ध करुन दिली आहेत. ती डाऊलनोड करुन तुम्ही पाहू शकता.

IOB बँकेच्या शेअरचा भाव वाढला

30 जून 2021 रोजी IOB च्या शेअरचा भाव 29 रुपये इतक्या चार वर्षांतील उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. गेल्यावर्षी IOB बँकेला 144 कोटींचा नफा झाला होता. तसेच बँकेच्या संपत्तीतमध्येही वाढ झाली आहे. याशिवाय, बँकेच्या खात्यातील बुडीत कर्जाची टक्केवारीही 3.58 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. इंडियन ओव्हरसीज बँकेने भांडवली बाजारात नुकताच 50000 कोटी रुपयांच्या मार्केट कॅपचा टप्पा ओलांडला होता.

संबंधित बातम्या:

शेअर बाजारात IOB चा भाव वधारला; PNB आणि बँक ऑफ बडोदाला टाकले मागे

Banks Privatization: सरकारी बँकांच्या खासगीकरणासाठी जोरदार हालचाली; केंद्र सरकारची उच्चस्तरीय बैठक

मोदी सरकारचं महत्वाचं पाऊल; ‘या’ सरकारी बँकेच्या खासगीकरण प्रक्रियेला सुरुवात

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI