ITR : आयकर वेळेत भरा नुकसान टाळा; जाणून घ्या ‘बिलेटेड रिटर्न’चे तोटे

31 जुलैपर्यंत 5.80 कोटींहून अधिक जणांनी ITR दाखल केलाय. तरीही अनेक जण काही कारणांमुळे ITR भरू शकले नाहीत. अशा लोकांना 31 जुलैनंतरही रिटर्न दाखल करण्याची एक संधी आहे, याला बिलेटेड रिटर्न किंवा विलंबित रिटर्न असे म्हणतात.

ITR : आयकर वेळेत भरा नुकसान टाळा; जाणून घ्या 'बिलेटेड रिटर्न'चे तोटे
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 15, 2022 | 2:10 AM

2021-22 या आर्थिक वर्षातील इनकम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) भरण्याची अंतिम मुदत संपली आहे. 31 जुलैपर्यंत 5.80 कोटींहून अधिक जणांनी ITR दाखल केलाय. तरीही अनेक जण काही कारणांमुळे ITR भरू शकले नाहीत. अशा लोकांना 31 जुलैनंतरही रिटर्न दाखल करण्याची एक संधी आहे, याला बिलेटेड रिटर्न किंवा विलंबित रिटर्न असे म्हणतात. मात्र 31 जुलैनंतर रिटर्न फाईल केल्यास तुम्हाला विलंब शुल्कही (Late penalty) द्यावे लागणार आहे.आयकर (income tax) अधिनियम,1961 चे कलम 139 (4) अन्वये अंतिम मुदतीनंतर आयटीआर दाखल केल्यास त्याला विलंबित रिर्टन असे म्हणतात. सध्याचं निर्धारण वर्ष संपपर्यंत किंवा तीन महिने अगोदरपर्यंत विलंबित रिटर्न फाईल केला जाऊ शकतो. आर्थिक वर्ष 2021-22 किंवा निर्धारण वर्ष 2022-23 साठी 31 डिसेंबर 2022 पर्यंत विलंबित रिटर्न दाखल केला जाऊ शकतो.म्हणजेच आयटीआर दाखल करण्यासाठी आणखी पाच महिन्याचा अवधी आहे.

दंड किती भरावा लागतो?

कोणत्याही करदात्याला 31 जुलैपर्यंत रिर्टन दाखल न करता आल्यास त्याला विलंब शुल्कासह रिटर्न फाईल करता येतो. आयकर नियमानुसार पाच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास 5 हजार रुपयांचे विलंब शुल्क द्यावे लागते तर पाच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असल्यास एक हजार विलंब शुल्क भरावे लागते. करदात्यांनी इनकम टॅक्स रिटर्न वेळच्यावेळी भरावा. जर तुमचं कॅपिटल लॉस झाला असल्यास अंतिम मुदतीच्या अगोदर तुम्ही रिर्टन फाईल करून झालेलं नुकसान कॅरी फॉरवर्ड करू शकता त्यानंतर दुरूस्तीसह सुधारित रिटर्न दाखल करू शकता,अशी माहिती कर सल्लागार सत्येंद्र जैन यांनी दिलीये.

मुदतीत आयटीआर दाखल करण्याचे फायदे

अंतिम मुदतीनंतर रिटर्न दाखल केल्यास करदात्यांना विलंब शुल्क भरावे लागते. तसेच आयकर नियमान्वये मिळणाऱ्या फायद्यांवरसुद्धा पाणी सोडावं लागतं.एखादा करदाता अंतिम मुदतीपर्यंत आयटीआर दाखल न करू शकल्यास आणि विलंबित आयटीआर भरत असल्यास त्याला प्रॉपर्टीचं नुकसान वगळता इतर नुकसान पुढील वर्षांसाठी कॅरी फॉरवर्ड करण्याची परवानगी मिळत नाही. मुदतीत रिटर्न फाईल केल्यास नुकसान 8 वर्षांपर्यंत कॅरी फॉरवर्ड करता येते.मुदतीत आयटीआर दाखल केल्यास करदात्याला रिफंड रक्कमेवर 0.5 टक्के प्रति महिना दरानं व्याज मिळते. समजा एखाद्यानं 31 जुलैच्या अगोदर रिटर्न फाईल केल्यास रिफंड मिळेपर्यंत म्हणजेच एप्रिलपासून व्याज मिळते. विलंबित रिटर्न दाखल करत असताना करप्राप्त उत्पन्न असल्यास व्याजासहीत दंड भरावा लागतो. कर थकबाकी असेल तर कलम 234 A, 234 B आणि 234 C नुसार व्याजासहित दंड भरावा लागतो. 31 जुलैच्या अगोदर सेल्फ-असेसमेंट टॅक्स दाखल न केल्यास कलम 234A अंतर्गत दंड भरावा लागतो. तशाचप्रकारे 31 मार्चच्या अगोदर अ‍ॅडव्हांस टॅक्सची 90 टक्के रक्कम न भरल्यास कलम 234B अंतर्गत दंड भरावा लागतो. प्रत्येक महिन्याला दंडावर एक टक्के व्याज लागते.

हे सुद्धा वाचा

…तर रिफंड उशिरा मिळतो

उशिरा रिटर्न फाईल केल्यास रिफंड उशिरा मिळतो. रिटर्न भरल्यानंतर व्हेरिफाईड केल्यानंतरच टॅक्स रिफंड मिळतो. आयटीआर उशिरा दाखल केल्यानंतर व्हेरिफाय सुद्धा उशिराच होते त्यामुळे रिफंड सुद्धा उशिरा मिळतो. विलंबित रिटर्न फाईल केल्यास एखादी चूक आढल्यास करदाता विलंबित आयटीआरमध्ये सुधारणा करू शकतो. निर्धारण वर्ष 2022-23 साठी विलंबित आणि सुधारित रिटर्न दाखल करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबरपर्यंत आहे. अशात शेवटच्या क्षणी रिटर्न फाईल केल्यास विलंबित रिटर्नसाठी सुधारित रिटर्न फाईल करता येत नाही. तसेच विलंबित रिटर्न दाखल केल्यास नवीन कर प्रणाली निवडण्याचा पर्याय उपलब्ध नसतो.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.