Gold Price Today : दिल्लीत सोन्याची घौडदोड, पन्नास हजारांचा टप्पा पार, महाराष्ट्रातील प्रमुख शहरात काय भाव ?

Gold Price Today : दिल्लीत सोन्याची घौडदोड, पन्नास हजारांचा टप्पा पार, महाराष्ट्रातील प्रमुख शहरात काय भाव ?
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबईत 24 कॅरेट सोन्याला प्रति तोळा 49160 रुपये भाव (MUBAI GOLD RATE) मिळाला तर 22 कॅरेट सोने प्रति तोळे 47160 रुपयांवर पोहोचले. मुंबईखालोखाल पुण्यातही सोन्याची भाववाढ नोंदविली गेली.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सिद्धेश सावंत

Jan 19, 2022 | 6:41 PM

नवी दिल्ली : सलग दुसऱ्या दिवशी राजधानी दिल्लीत सोने-चांदीच्या भाव वाढीचा आलेख चढाच राहिला. दिल्लीत 24 कॅरेट सोन्याला (DELHI GOLD RATE) प्रति तोळा 51500 रुपये भाव मिळाला तर 22 कॅरेट सोने प्रति तोळे 47250 रुपयांवर पोहोचले. आर्थिक राजधानी मुंबईत 24 कॅरेट सोन्याला प्रति तोळा 49160 रुपये भाव (MUBAI GOLD RATE) मिळाला तर 22 कॅरेट सोने प्रति तोळे 47160 रुपयांवर पोहोचले. मुंबईखालोखाल पुण्यातही सोन्याची भाववाढ नोंदविली गेली. उपराजधानी नागपूरमध्ये (NAGPUR GOLD RATE) 24 कॅरेट सोने 49160 रुपयांवर पोहोचले. ‘ओमिक्रॉन’च्या वाढत्या सावटामुळे सोने 55 हजारांचा टप्पा पार करण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, सध्या सोने-चांदीच्या भावात चढ-उताराचे चित्र दिसून येत आहे.

देशातील प्रमुख शहरांसह महाराष्ट्रातील सोने-चांदीच्या वास्तविक वेळेतील भाव देणाऱ्या ‘गूडरिटर्न्स बेवसाईट’वरील आजचे ताजे भाव-

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील 24 कॅरेटचे दर :

• मुंबई- 49160 रुपये (70वाढ)
• पुणे- 48920 रुपये (80वाढ)
• नागपूर- 49160 रुपये (70वाढ)
• नाशिक- 48920 रुपये (80वाढ)

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील 22 कॅरेटचे दर:

• मुंबई- 47160 रुपये
• पुणे- 46400 रुपये
• नागपूर- 47160 रुपये
• नाशिक- 46400 रुपये

आर्थिक तज्ज्ञांचं भाकीत:

सोने गुंतवणूक सुरक्षिततेचा पर्याय मानला जातो. अर्थचक्रावरील ओमिक्रॉनच्या सावटामुळे सोने 55 हजारांचा टप्पा गाठणार असल्याचा अंदाज बाजार विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. मात्र, मुंबईत टास्क फोर्सच्या सदस्यांनी तिसऱ्या लाटेचा सर्वोच्च बिंदू मुंबईने ओलांडल्याचे अनुमान व्यक्त केल्याने आर्थिक तज्ज्ञांच्या मतानुसार सोने 55 हजारांचा टप्पा गाठण्याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे.

सोन्याचे भाव एका मिस्ड् कॉलवर:

तुम्ही घरबसल्या सोन्याचे भाव मिळवू शकतात. 8955664433 या क्रमांवर मिस्ड् कॉल देण्याद्वारे तुम्हाला मेसेज प्राप्त होतील. तुम्ही प्रमुख शहरातील सोन्याचे भाव तपासू शकतात.

सोन्याची शुद्धता ‘अ‍ॅप’ वर?

केंद्रीय ग्राहक आणि अन्न मंत्रालयाने BIS-केअर मोबाईल अ‍ॅप लाँच केलं आहे. या अ‍ॅपद्वारे सोनं खरंच किती शुद्ध आहे, याबाबतची माहिती मिळणार आहे. त्यामुळे सोन्यात इतर धातूंच मिश्रण करुन लुबाडणाऱ्यांना चांगलाचा धडा मिळणार आहे. सोनं कितपत शुद्ध आहे, याची खरंच योग्य माहिती दिली तर या अ‍ॅपला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे (BIS care app will tell how pure is gold).

संबंधित बातम्या :

शेअर बाजारात घसरणीचे सत्र: सेन्सेंक्समध्ये 656 अंकांची घसरण, निफ्टी 18 हजारांखाली

जुग जुग ‘जिओ’!, कालावधी आधीच रिलायन्स जिओने केला स्पेक्ट्रमचा भरणा; दुरसंचार खात्याकडे जमा केले 30,791 कोटी


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें