एटीएममधून कॅश न निघताच खात्यातून पैसे कट झाल्याचा मेसेज आलाय का? चिंता करू नका, जाणून घ्या आरबीआयचे नियम

| Updated on: Jul 31, 2021 | 8:57 AM

एटीएममधून पैसे न येताच जर आपल्या बँक खात्यातून पैसे कट झाल्याचा मेसेज आला तर.. मुळीच चिंता करू नका. ग्राहकांनी सर्वात आधी बँकेच्या कस्टमर केअर सेंटरला कॉल करावा आणि अशा परिस्थितीत पैसे अडकल्याची संपूर्ण माहिती द्यावी.

एटीएममधून कॅश न निघताच खात्यातून पैसे कट झाल्याचा मेसेज आलाय का? चिंता करू नका, जाणून घ्या आरबीआयचे नियम
Cash Withdrawal
Follow us on

नवी दिल्ली : एटीएममधून पैसे काढताना ग्राहकांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक प्रकरणांमध्ये असे दिसून आले आहे की एटीएममधून रोख रक्कम निघत नाही. मात्र खात्यातून पैसे कापले जातात. त्याच्या खात्यातून पैसे कापले गेले, असा एसएमएसही ग्राहकाला येतो. आपल्या हाती पैसे आले नसतानाही ग्राहकाला रिकाम्या हाताने एटीएम सेंटरमधून बाहेर पडावे लागते. कुठल्यातरी तातडीच्या कामासाठी धावतपळत एटीएममध्ये गेलेल्या व्यक्तीला अशा प्रकारचा कटु अनुभव येताच मोठा धक्काच बसतो. अशा परिस्थितीत काय करावे आणि काय करू नये हेच ग्राहकांना समजत नाही. सध्या असे प्रकार वाढले आहेत. ग्राहकांना पुरेशी माहिती नसल्यामुळे ते प्रचंड चिंतेत सापडतात. (Know the RBI’s rule if money is deducted from an ATM without cash)

सर्वप्रथम बँकेच्या कस्टमर केअरला कॉल करा

एटीएममधून पैसे न येताच जर आपल्या बँक खात्यातून पैसे कट झाल्याचा मेसेज आला तर.. मुळीच चिंता करू नका. ग्राहकांनी सर्वात आधी बँकेच्या कस्टमर केअर सेंटरला कॉल करावा आणि अशा परिस्थितीत पैसे अडकल्याची संपूर्ण माहिती द्यावी. कस्टमर केअरला वेळीच माहिती दिल्यास संबंधित ग्राहकांना 24 तासांच्या आत पैसे परत केले जातात. या ‘टाइमलाइन’दरम्यान अर्थात या 24 तासांच्या अवधीतदेखील पैसे खात्यात परत जमा झाले नाहीत तरी घाबरून जाण्याची गरज नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेचे कठोर नियम ग्राहकांना पुरेपूर संरक्षण देणारे आहेत. बँकिंग व्यवहार अयशस्वी झाल्यास ग्राहकांना पैसे परत करणे ही बँकांचीच जबाबदारी आहे हे तुम्ही लक्षात घ्या आणि निश्चिंत राहा.

काय आहे आरबीआयचा नियम

तुमचा एटीएम सेंटरमधील पैसे काढण्याचा व्यवहार अयशस्वी झाल्यास आरबीआयच्या नियमांनुसार, संबंधित ग्राहकाच्या खात्यातून कापली गेलेली रक्कम ताबडतोब बँकेने ग्राहकाला परत करायची आहे. जर काही कारणास्तव असे झाले नाही तर बँक पुढील सात दिवसात ग्राहकाच्या खात्यात पैसे परत करेल. आरबीआयच्या नियमांनुसार, जर 7 दिवसांतही पैसे परत न मिळाल्यास अशा परिस्थितीत बँकेकडून पुढील दिवसाला 100 रुपयांचा दंड आकारण्यात येऊ शकतो.

30 दिवसाच्या आत तक्रार दाखल करावी लागेल

ग्राहकांना बँकेकडून नुकसान भरपाई मिळवण्यासाठी 30 दिवसांच्या आत तक्रार दाखल करावी लागते. या मुदतीनंतर तक्रार दाखल करण्यासाठी कोणतीही भरपाई दिली जाणार नाही. नुकसानीचा दावा करण्यासाठी, ग्राहकाला व्यवहाराची स्लिप किंवा बँक खात्याची स्टेटमेंट बँकेला सादर करावी लागते. या सर्व माहितीवरून तुमच्या हे लक्षात आलेच असेल की आपण एटीएम सेंटरमध्ये गेलोय आणि खात्यातून पैसे न निघताच आपल्या खात्यातून पैसे कट झाल्याचा मेसेज आला तर चिंतेचे कारण नाही. आरबीआयच्या कठोर नियमांमुळे बँक ग्राहकांचे नुकसान होणार नाही, याची पुरेपूर दक्षता घेण्यात आली आहे. (Know the RBI’s rule if money is deducted from an ATM without cash)

इतर बातम्या

Ganpatrao Deshmukh : राज्याच्या राजकारणातील एक पर्वाचा अस्त, गणपतराव देशमुखांच्या राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीचा आढावा

Raigad Flood : महाड आणि पोलादपूर तालुक्यात पंचनामे, मृतांच्या नातेवाईकांना मदत सुरु – जिल्हाधिकारी