एलआयसीचा ‘जीवन लाभ’: 260 रुपयांची गुंतवणूक, 20 लाखांचा परतावा!

एलआयसीच्या वेबसाईटवर एलआयसी जीवन लाभ पॉलिसीची (LIC Jeevan Labh Policy ) आकडेमोड देण्यात आली आहे. प्रतिदिन 260 रुपयांच्या गुंतवणुकीवर मॅच्युरिटीवेळी 20 लाख रुपये मिळू शकतात. या योजनेअंतर्गत तुम्ही दोन लाखांच्या विमा रकमेसाठी गुंतवणूक करू शकतात. मात्र, गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही.

एलआयसीचा ‘जीवन लाभ’: 260 रुपयांची गुंतवणूक, 20 लाखांचा परतावा!
Insurance Policy
Follow us
| Updated on: Jan 08, 2022 | 9:02 PM

नवी दिल्ली : कोविडच्या वाढत्या प्रकोपामुळे अर्थ जगतावर अस्थिरतेचं सावट आहे. सामान्य गुंतवणूकदारांत अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सुरक्षित व सर्वोत्तम गुंतवणूक परतावा देणाऱ्या पर्यायाच्या शोधात गुंतवणूकदार आहेत. कमी हफ्त्यात अधिक परताव्याच्या शोधात असलेल्या गुंतवणूकदारांना आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) जीवन लाभ पॉलिसीचा पर्याय अधिक किफायतशीर ठरेल.

20 लाखांची मॅच्युरिटी

एलआयसीच्या वेबसाईटवर एलआयसी जीवन लाभ पॉलिसीची (LIC Jeevan Labh Policy ) आकडेमोड देण्यात आली आहे. प्रतिदिन 260 रुपयांच्या गुंतवणुकीवर मॅच्युरिटीवेळी 20 लाख रुपये मिळू शकतात. या योजनेअंतर्गत तुम्ही दोन लाखांच्या विमा रकमेसाठी गुंतवणूक करू शकतात. मात्र, गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. या योजनेतील गुंतवणुकीवर कर सवलत देखील प्राप्त होते.

पॉलिसी कालावधी

पॉलिसी तीन कालावधीसाठी उपलब्ध आहे. 16 वर्ष, 21 वर्ष आणि 25 वर्षाच्या मॅच्युरिटी कालावधीसह स्कीममध्ये गुंतवणूक करू शकतात. हफ्त्यांचा भरणा कालावधी 10 वर्ष, 15 वर्ष आणि 16 वर्ष इतका आहे. या स्कीमसाठी मासिक, तिमाही, सहामाही आणि वार्षिक हफ्त्यांच्या आधारावर गुंतवणूक केली जाऊ शकते.

गुंतवणुकीसाठी वयोमर्यादा

एलआयसी जीवन लाभ पॉलिसीमध्ये 08 ते 59 वयोगटातील कोणतीही व्यक्ती गुंतवणूक करू शकतो. तुम्ही मासिक स्वरुपात हफ्ता भरत असल्यास तुम्हाला 15 दिवसांचा अतिरिक्त कालावधी मिळेत आणि तुम्ही सहामाही, वार्षिक स्वरुपात हफ्ता भरत असल्यास 30 दिवसांचा अतिरिक्त कालावधी मिळेल. गुंतवणूकदाराच्या मृत्यूच्या स्थितीत विमा रक्कम नॉमिनी व्यक्तीला अदा केली जाते.

योजनेचे फायदे

1. जीवन लाभ पॉलिसीअंतर्गत जर तुम्ही सलग 3 वर्षे प्रीमियम भरल्यास तुम्हाला कर्जाची सुविधा मिळू शकते

2. कोणत्याही कारणास्तव जर तुम्हाला पॉलिसी बंद करायची असल्यास तुम्ही तीन वर्षानंतर ती बंद करु शकता.

3. या पॉलिसीद्वारे तुम्हाला आयकरात कलम 80 सी अंतर्गत सूटही दिली जाते.

4. एलआयसीच्या या पॉलिसीमध्ये तुम्हाला अपघाती कव्हर दिला जातो. त्याशिवाय यात तुम्हा अन्य काही फायदेही मिळतात.

संबंधित बातम्या 

‘क्रिप्टो’ फर्म ईडीच्या रडारवर: कर नियमांसाठी केंद्राकडे धाव, अर्थसंकल्पात स्पष्टीकरणाची मागणी!

‘अनप्लग्ड’ टाटा: चरित्रातून जीवनपट लवकरच जगासमोर, पुस्तकासाठी महागडा लेखन करार!

IPO पूर्वीच LIC च्या कमाई मध्ये मोठी घसरण, डिसेंबर महिन्यामध्ये नवीन योजना विक्रीमध्ये तब्बल 20 टक्‍क्‍यांची पीछेहाट!

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.