AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIC पॉलिसी धारकानो सावधान! बँक खाते करा लवकर अपडेट, पॉलिसी क्लेम प्रक्रिया होईल खूपच सोपी!

जर तुम्ही भारतीय आयुर्विमा महामंडळा (LIC) चे पॉलिसीधारक असाल तर यापुढे तुमच्या एलआयसी पॉलिसी क्लेमची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे,अश्यावेळी तुम्हाला तुमच्या बँकेचे डिटेल्स LIC शी बरोबर जोडले गेले आहे की नाही हे लवकरच तपासणे गरजेचे आहे.

LIC पॉलिसी धारकानो सावधान! बँक खाते करा लवकर अपडेट, पॉलिसी क्लेम प्रक्रिया होईल खूपच सोपी!
एलआयसी आयपीओ
| Edited By: | Updated on: Feb 21, 2022 | 8:31 PM
Share

तुम्ही भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (LIC) पॉलिसीधारक असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. तुमची पॉलिसी मुदत जर संपत असेल तर क्लेम सेटलमेंटची (Claim Settlement) जी काही रक्कम आहे,ती यापुढे थेट तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे.पॉलिसी धारकांना(Policyholders) आपल्या बँकेचे डिटेल व्यवस्थित आहे की नाही हे तपासून घेणे गरजेचे ठरणार आहे. तुम्ही एलआयसीकडे जे बँकेचे डिटेल दिलेले आहे ते सुद्धा व्यवस्थित तपासून घ्यावे, जेणेकरून कोणतीही जर चूक झाल्यास तुम्हाला लवकर पैसे मिळणार नाही. एलआयसी ने आपली पेमेंटपद्धती मध्ये थोडा बदल केला आहे. NEFT (नेशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रांसफर) ला तुमच्या पॉलिसीचे पेमेंट करण्यासाठी बँकेचे डिटेल भविष्यात लागणार आहे. पॉलिसी धारकांनो एक गोष्ट लक्षात ठेवा कि, एलआयसीच्या पेमेंटसाठी तुम्हाला दुसऱ्या कोणत्याच प्रकारच्या पद्धतीचा वापर करता येणार नाही. जसे की, पेमेंटसाठी चेक पद्धत देखील तुम्ही वापरू शकणार नाही.

भारतीय आयुर्विमा महामंडळाद्वारे नुकतीच एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये असे सांगण्यात आले आहे की, जे एलआयसीचे पॉलिसीधारक आहेत. त्या एलआयसी पॉलिसी धारकांना क्लेम प्रक्रिया एकदम सोपी बनवण्यासाठी बँकेचे डिटेल्स अपडेट करायचे आहे.

पॉलिसीधारकानो या गोष्टींचे ठेवा ध्यान..

जाहिरातीमध्ये पुढील बाबी सांगण्यात आल्या आहेत.

1) जाहिरातीमध्ये असे सांगण्यात आले आहे की, कृपया मॅच्युरिटी तारीख किंवा सर्वायवल बेनिफिटची तारीख यासाठी पोलिसी डॉक्युमेंट नेहमी चेक करा.

2) योग्य ते डिटेल्सची माहिती घेऊन तुम्ही कोणत्याही ब्रांचशी संपर्क साधू शकता.

3) NEFT मेंडेटरी फॉर्म सर्व कार्यालयामध्ये उपलब्ध आहे. हा फॉर्म तुम्ही एलआयसीच्या वेबसाइटवरून सुद्धा डाऊनलोड करू शकता.

4) NEFT चे डिटेल्स तुम्ही ऑनलाइन पद्धतीने देखील डाउनलोड करू शकता.

5) क्लेम डिस्चार्ज फॉर्म्स आणि पॉलिसी डॉक्यूमेंट कार्यालयात जमा करा.

6) केवायसी कागदपत्र जमा करून तुमच्या घराचा पत्ता,फोन नंबर ,मोबाईल नंबर,ईमेल आईडी इत्यादी गोष्टी लवकर अपडेट करा.

LIC वेबसाइट नुसार NEFT करण्याचे फायदे पुढील प्रमाणे आहेत

1) तुमची बँक कोठे ही व कोणत्याही क्षेत्रामध्ये असू द्या, पॉलिसीधारकांना आपल्या खात्यामध्ये पेमेंटची रक्कम योग्य तारखेला अवश्य मिळेल.

2) NEFT हा प्रकार पेमेंट करण्याचा हा सर्वात जलद आणि सुरक्षित असा पर्याय आहे.

3) पॉलिसीधारकाकडून कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.

4) जेव्हा पॉलिसीधारकाला NEFT च्या माध्यमातून पॉलिसीचे पेमेंट केले जाईल,त्यावेळी एसएमएस आणि ई-मेल सुद्धा पाठवला जाईल.

5) प्रत्येक LIC NEFT पेमेंट वेळी एक यूनिक UTR (यूनिक ट्रांजेक्शन रेफरेंस) नंबर जनरेट होईल.

6) खात्यामध्ये पैसे क्रेडिट होताना काही समस्या आल्यास अश्यावेळी पॉलिसी धारक आपल्या बँकेशी त्वरित संपर्क साधू शकतो आणि या UTR नंबरचा वापर करून कन्फर्मेशन साठी सुद्धा सांगू शकतो.

सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास या ट्रांजेक्शनमुळे तुमचा व्यवहार अतिशय सोपा व जलद गतीने होणार आहे.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.