AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LPG eKYC: एलपीजी ग्राहकांसाठी अलर्ट! ई-केवायसी पूर्ण न केल्यास नाही मिळणार गॅस, इतकी सोपी आहे प्रक्रिया

LPG e-kyc: एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. या 16 ऑगस्टपर्यंत एलपीजी ग्राहकांना ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. केवायसी पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ही प्रक्रिया एकदम सोपी आहे. जाणून घ्या ऑनलाईन कशी पूर्ण करणार प्रक्रिया?

LPG eKYC: एलपीजी ग्राहकांसाठी अलर्ट! ई-केवायसी पूर्ण न केल्यास नाही मिळणार गॅस, इतकी सोपी आहे प्रक्रिया
एलपीजी ग्राहकांसाठी अलर्ट!
| Updated on: Aug 08, 2026 | 3:33 PM
Share

एलपीजीचा वापर करत असाल तर ही महत्त्वाची अपडेट जाणून घ्या. गॅस सिलेंडरच्या सुरळीत पुरवठ्यासाठी आणि सबसिडीसाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. येत्या 16 ऑगस्टपॅर्यंत एलपीजी ग्राहकांना ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक आहे. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास गॅस सिलेंडरचा पुरवठा थांबू शकतो. इतकेच नाही तर सबसिडी सुद्धा थांबू शकते. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे सोपे आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण करू शकता.

16 ऑगस्ट रोजी शेवटची संधी

देशभरातील LPG ग्राहकांचे रेकॉर्ड अपडेट करण्यासाठी आणि काळाबाजार थांबण्यासाठी ई-केवायसी मोहिम राबवली जात आहे. त्यासाठी गॅस एजन्सी ग्राहकांना फोन करुन, एसएमस आणि नोटीस द्वारे याविषयीची माहिती देत आहे. ग्राहकांची सेवा खंडित होऊ नये यासाठी ही प्रक्रिया राबवली जात आहे. 16 ऑगस्ट ही डेडलाईन आहे. जर या मुदतीत ई-केवायसी पूर्ण केली नाही तर फटका बसू शकतो.

अशी करा ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण

गॅस एजन्सीवर जाऊन पूर्ण करा प्रक्रिया

आधार कार्ड, गॅस कनेक्शन पासबुकसह गॅस एजन्सीवर जा

कर्मचारी आधार क्रमांकाआधारे तुमची माहिती घेईल

फिंगरप्रिट(बायोमॅट्रिक) स्कॅन करून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करेल. यामुळे तुमचा डेटा अपडेट होईल.

या प्रक्रियेसाठी फार मोठी कसरत करावी लागत नाही.

स्मार्टफोनआधारे घरपोच करा eKYC (Online)

गॅस एजन्सीवर जाऊन रांगेत उभे राहायचे नसेल तर घरबसल्या ही प्रक्रिया पूर्ण करा

सर्वात आधी इंडेन, भारत गॅस वा एचपी गॅसच्या अधिकृत साईटवर अथवा मोबाईल ॲपवर जा

तुमच्या खात्यात लॉग इन करा. ‘eKYC’ वा ‘KYC Update’ हा पर्याय निवडा

LPG ग्राहक क्रमांक, नोंदणीकृती मोबाईल क्रमांक, तुमचे आधार क्रमांकाची नोंदणी करा

यानंतर ओटीपी (OTP) व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण करा.

तुमच्या मोबाईलवर ओटीपी आला असेल तो नोंदवा

ही कागदपत्रे आवश्यक

आधार कार्ड

गॅस कनेक्शन पासबुक वा LPG ग्राहक क्रमांक

आधारसोबत लिंक असलेला मोबाईल क्रमांक (OTP साठी)

इतर ओळखपत्र आवश्यक आहे

Follow Us
मोदी-शिंदेंचा विठ्ठलाच्या मूर्तीसोबतच्या फोटोवर काँग्रेसची बोचरी टीका
Congress on Eknath Shinde- PM Modi | जोडे का नाही काढले?; मोदी-शिंदेंचा विठ्ठलाच्या मूर्तीसोबतच्या फोटोवर काँग्रेसची बोचरी टीका
सरसंघसंचालक मोहन भागवत यांच्या कार्यक्रमात ठाकरेंचा नेता...
सरसंघसंचालक मोहन भागवत यांच्या कार्यक्रमात ठाकरेंच्या बड्या नेत्याची हजेरी, थेट...
सुरेश धस यांनी शिव्या का दिल्या? अखेर कार्यालयाकडून मोठं स्पष्टीकरण
Suresh Dhas | सुरेश धस यांनी शिव्या का दिल्या? अखेर कार्यालयाकडून मोठं स्पष्टीकरण
फुटीर खासदारांसोबतच्या बैठकीनंतर आता एकनाथ शिंदे पुन्हा भाजपच्या...
फुटीर खासदारांसोबतच्या बैठकीनंतर आता एकनाथ शिंदे पुन्हा भाजपच्या वरिष्ठांना भेटणार, कारण...
सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना मोदींची गद्दारांशी भेट का?
Uddhav Thackeray | सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना मोदींची गद्दारांशी भेट का? उद्धव ठाकरे यांचा सवाल
राष्ट्रवादीत मोठा बदल होणार? सुनेत्रा पवार- प्रशांत किशोर भेटीबाबत...
राष्ट्रवादीत मोठा बदल होणार? सुनेत्रा पवार- प्रशांत किशोर भेटीबाबत बड्या नेत्याचं मोठं विधान
फेसबुकवरून सरकार चालत नाही म्हणायचे, आता इन्स्टाग्रामवरून देश चालवतात!
Uddhav Thackeray | फेसबुकवरून सरकार चालत नाही म्हणायचे, आता इन्स्टाग्रामवरून देश चालवतात!; उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल
ही वादळापूर्वीची शांतता, नंतर... उद्धव ठाकरे एका वाक्यातच म्हणाले
ही वादळापूर्वीची शांतता, नंतर... उद्धव ठाकरेंनी एका वाक्यातच दिली कोर्टातील सुनावणीबाबत मोठी प्रतिक्रिया
आयुष्यात कोणताही ठराविक कोर्स... PM मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र
PM Narendra Modi Live: आयुष्यात कोणताही ठराविक कोर्स... IIT दिल्लीत पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र
उमेश पाटलांच्या एका पोस्टने वाढवलं राष्ट्रवादीचं टेन्शन
Umesh Patil on NCP | दादांनी उभ्या केलेल्या पक्षाच्या फांदीवर कुऱ्हाड चालवण्यात...; उमेश पाटलांच्या एका पोस्टने वाढवलं राष्ट्रवादीचं टेन्शन