AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एअर इंडियाच्या प्रमुखांचं अल-कायदा कनेक्शन? गृह मंत्रालयाची चौकशी, एल्कर आयसी वादात

मूळचे इस्तांबूलचे असणाऱ्या आयसींचे कथित दहशतवादी संघटना अल-कायदाशी धागेदोरे असल्याच्या बातम्या सध्या चर्चेत आहे. गृह मंत्रालयानं गुप्तहेर संस्थांच्या मदतीने आयसी यांची सखोल माहिती घेण्यास सुरुवात केल्याचं वृत्त आहे.

एअर इंडियाच्या प्रमुखांचं अल-कायदा कनेक्शन? गृह मंत्रालयाची चौकशी, एल्कर आयसी वादात
AIR INDIA CEO
| Edited By: | Updated on: Feb 23, 2022 | 7:39 PM
Share

नवी दिल्लीः एयर इंडियांची (Air India) सूत्रं टाटा समूहाच्या (Tata) हाती एकवटली आहेत. एअर इंडियाला पुन्हा उभारी देण्यासाठी टाटा ग्रूपने धोरणात्मक पावलं उचलली आहेत. कार्यपद्धतीत अमुलाग्र बदल करत तुर्की एअरलाइनचे (Turkish airlines) माजी अध्यक्ष इल्कर आयसी यांच्याकडे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ (CEO) पदाची जबाबदारी दिली आहे. मात्र, सूत्रे हाती घेण्यापूर्वीच आयसी वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयानं (Ministry of Home Affairs) आयसींच्या पार्श्वभूमीची पडताळणी सुरू केली आहे. मूळचे इस्तांबूलचे असणाऱ्या आयसींचे कथित दहशतवादी संघटना अल-कायदाशी धागेदोरे असल्याच्या बातम्या सध्या चर्चेत आहे. गृह मंत्रालयानं गुप्तहेर संस्थांच्या मदतीने आयसी यांची सखोल माहिती घेण्यास सुरुवात केल्याचं वृत्त आहे. त्यामुळे आयसी सूत्रे स्विकारणार की गच्छंती होणार याकडं अर्थजगताचं लक्ष लागलं आहे.

चौकशी नियमित भाग:

भारतीय सार्वजनिक संस्थेत विदेशी व्यक्तीची वर्णी लागण्याची पहिलीच वेळ नाही. यापूर्वी अनेक विदेशी व्यक्तींनी याप्रकारची पदे स्विकारली आहेत. मात्र, नियुक्तीनंतर विदेशी व्यक्तीच्या पार्श्वभूमीची पडताळणी केली जाते. गृह मंत्रालय किंवा गृह मंत्रालयाच्या अखत्यारितील गुप्तहेर संस्था याप्रकारच्या पडताळणीचे काम पूर्ण करतात. गुप्तहेर संस्थांकडून गोपनीय अहवाल गृह मंत्रालयाला सादर केला जातो.

जगातील सर्वोत्तम एअरलाईन्स:

एअर इंडियाचा कारभार आयसी 1 एप्रिल 2022 पासून स्विकारणार आहेत. आपल्या नावाच्या घोषणेनंतर इल्कर आयशी यांनी आनंद व्यक्त केला होता. एअर इंडिया ही एक प्रतिष्ठित विमान कंपनी आहे. एअर इंडियाचा प्रमुख म्हणून टाटा समूहाशी निगडीत असल्याचा सन्मान वाटत असल्याचं म्हटलं होतं. एअर इंडियाला जगातील सर्वोत्तम एअरलाईन्स बनविण्याचा विश्वासही आयसी यांनी व्यक्त केला होता.

कोण आहेत आयशी?

तुर्कीचे व्यापारी असणारे 51 वर्षीय एल्कर आयशी पेशानं व्यापारी आहेत. वर्ष 2015 मध्ये त्यांनी तुर्की एअरलाइन्सच्या अध्यक्षपदी सूत्रं स्विकारली होती. 26 जानेवारी 2022 रोजी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. सध्या त्यांची एअर इंडियाच्या सीईओपदी वर्णी लागली आहे. आयसी यांनी 1994 मध्ये बिल्केंट युनिव्हर्सिटी ऑफ पॉलिटिकल सायन्स अँड पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन विभागातून शिक्षण पूर्ण केले. यूके विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले.

संबंधित बातम्या

Raphael Fighter Jets : बलशाली भारत! फ्रान्समधून आली आणखी तीन राफेल लढाऊ विमाने

‘माजी ED अधिकाऱ्याला भाजपचं UPमध्ये तिकीट’ रोहित पवारांच्या वक्तव्यामागचा ‘तो’ BJP उमेदवार हाच!

उणे 30 अंश तापमानात ITBP Commandantचे न थकता पुशअप्स, पाहा Viral video

संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर.
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर.
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर.
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार.
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला.
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला.
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा.
नादच खुळा...निकालाआधी कोल्हापुरात विजयाचे बॅनर, कागलमध्ये कुणाची चर्चा
नादच खुळा...निकालाआधी कोल्हापुरात विजयाचे बॅनर, कागलमध्ये कुणाची चर्चा.
शेतकऱ्यांवर किडनी विकण्याची वेळ, आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश
शेतकऱ्यांवर किडनी विकण्याची वेळ, आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश.
धर्माबादमध्ये मतदाराना मंगल कार्यालयात डांबलं, पैसे वाटपापूर्वीच पळापळ
धर्माबादमध्ये मतदाराना मंगल कार्यालयात डांबलं, पैसे वाटपापूर्वीच पळापळ.