Gold Bond | सोन्यातील गुंतवणूक आपल्याकडे सर्वाधिक सुरक्षित आणि फायद्याची मानण्यात येते. चीननंतर भारतीय सोन्यात सर्वाधिक गुंतवणूक करतात. भारत सरकारनेही गुंतवणुकीसाठी खास ऑफर आणली आहे. आज तुम्हाला सरकारच्या सुवर्ण रोखे योजनेत गुंतवणूक करता येणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सार्वभौम सुवर्ण रोखे योजना (Sovereign gold bond scheme 2022-23)आणली आहे. गोल्ड बाँडच्या विक्रीचा हा दुसरा टप्पा आहे. आयएनआरच्या (INR) माहितीप्रमाणे आतापर्यंत सोन्यामध्ये गुंतवणूकदारांना दर वर्षाकाठी सुमारे 8 टक्क्यांचा परतावा मिळाला आहे. परिणामी सोन्यातील गुंतवणुकीला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. सोन्याच्या किंमतीत (Gold Rate) सातत्याने चढ उतार होत असते. या योजनेची दुसरी मालिका 22 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. 26 ऑगस्ट म्हणजे आज सोने खरेदी करता येणार आहे.