Gold Silver Price Today News | सोने 500 रुपयांनी वधरले तर चांदीतही दरवाढ, काय आहेत आजचे भाव ?

Gold Silver Price Today News | सोन्या-चांदीच्या दरात गुरुवारी पुन्हा वाढ झाली. पाहुयात आजचा भाव

Gold Silver Price Today News | सोने 500 रुपयांनी वधरले तर चांदीतही दरवाढ, काय आहेत आजचे भाव ?
सोने पुन्हा वधरले Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 25, 2022 | 2:38 PM

Gold Silver Price Today News | गुरुवारी, 25 ऑगस्ट रोजी सोने-चांदीचे भाव (Gold Silver Price Today News)वधरले. सोन्याच्या दरात एकूण 500 रुपयांची वाढ झाली. या आठवड्याच्या सुरुवातीला मंगळवारपर्यंत सोन्यात 800 रुपयांची तर चांदीत 400 रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर आता सोने-चांदीचे दर वधरले आहेत. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेने (American Federal Reserve) व्याजदरात वाढ केलेली आहे आणि पुढील महिन्यात त्यात पुन्हा वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनेही रेपो दरात (Repo Rate) वाढ केलेली असून महागाई अटोक्यात आणण्यासाठी केंद्रीय बँक पुन्हा दरवाढ करण्याच्या तयारीत आहे. त्याचा परिणाम सोने आणि चांदीच्या किंमतींवर दिसून येण्याची शक्यता आहे.

भावात वाढ

बुधवारनंतर गुरुवारी ही सोने 250 रुपयांनी वधरले. सोन्याचा दर आता 500 रुपयांनी वाढला आहे. गुरुवारी 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 47,500 रुपये झाला, बुधवारी हाच भाव 10 ग्रॅमसाठी 47,250 रुपये होता. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर बुधवारी 51,550 रुपये होता. गुरुवारी हाच भाव 51,820 रुपये झाला. मंगळवारी चांदीचा भाव 800 रुपयांनी घसरुन 54,900 रुपये किलो झाला.बुधवारी चांदीत 100 रुपयांची वाढ झाली. गुरुवारी चांदीच्या किंमतीत 400 रुपयांची वाढ होऊन प्रति किलो हा भाव 55,400 रुपये झाला.

राज्यातील चार शहरातील भाव

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47,500 रुपये आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 51,820 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,530 आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,850 रुपये आहे. नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,530 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,850 रुपये इतका आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 47,530 आहे तर प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 51,850 रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर 554 रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

हे सुद्धा वाचा

24, 22, 21, 18 आणि 14 कॅरेटमध्ये काय असतो फरक

24 कॅरेट सोन्याला शुद्ध सोने म्हणतात. त्यात इतर कोणत्याही प्रकारचा धातू मिसळत नाही. याला 99.9 टक्के शुद्धतेचे सोने म्हणतात. 22 कॅरेट सोन्यात 91.67 टक्के शुद्ध सोनं असतं. इतर 8.33 टक्क्यांमध्ये इतर धातू असतात. त्याचबरोबर 21 कॅरेट सोन्यात 87.5 टक्के शुद्ध सोनं असतं. 18 कॅरेटमध्ये 75 टक्के शुद्ध सोनं असतं आणि 14 कॅरेट सोन्यात 58.5 टक्के शुद्ध सोनं असतं.  सोन्याच्या प्रतीनुसार त्याच्या किंमतीतही फरक पडतो. तसेच स्थानिक कराचाही समावेश होऊन ग्राहकांना भावानुसार रक्कम द्यावी लागते.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.