कामाची बातमी! EPFO कडून पीएफचे पैसे काढण्यासाठी आता नवी गाइडलाईन्स, ‘त्या’ कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा
पीएफ क्लेम करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे. मात्र आता ईपीएफओकडून आधार कार्डशी संबंधित नियमामध्ये एक बदल करण्यात आला आहे.
पीएफ क्लेम करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे. मात्र आता ईपीएफओकडून आधार कार्डशी संबंधित नियमामध्ये एक बदल करण्यात आला आहे. नव्या नियमानुसार आता काही लोकांना आधार कार्ड नसताना देखील पैसे काढता येणार आहेत. नव्या नियमानुसार जर तुमचा आधार कार्ड क्रमांक तुमच्या यूएनआय नंबरला लिंक नसेल तरी देखील तुमचा पीएफ क्लेम मंजूर होणार आहे. तुम्हाला तुमचे पीएफचे पैसे मिळू शकतात. मात्र ही सुविधा फक्त काही लोकांसाठीच लागू करण्यात आली आहे. जाणून घेऊयात ईपीएफओची ही नवी गाईडलाईन्स नेमकी काय आहे?
या कर्मचाऱ्यांना मिळणार सूट
ईपीएफओच्या नियमानुसार कोणत्याही कर्मचाऱ्याला जर पीएफच्या पैशांवर क्लेम करायचा असेल, त्याला जर त्याच्या पीएफ खात्यातून पैसै काढायचे असतील तर सर्वात आधी त्याचं आधार कार्ड त्याच्या यूएनआय नंबर अर्थात यूनिव्हर्सल अकाउंट नंबरला लिंक केलेलं असणं गरजेचं आहे. तरच पैसे मिळू शकतात. मात्र आता नव्या गाईडलाईन्सनुसार यामध्ये काही कर्मचाऱ्यांसाठी विशेष सूट देण्यात आली आहे. अशा कर्मचाऱ्यांचं जर आधार कार्ड हे यूनिव्हर्सल अकाउंट नंबरला लिंक नसेल तरी देखील त्यांना पैसे मिळणार आहेत. त्याचा पीएफ क्लेम मान्य होणार आहे. त्यामुळे त्यांना आधार कार्ड नसताना देखील पैसे काढता येणार आहेत.
यामध्ये अशा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे ज्यांनी आपल्या पीएफ खात्याशी संबंधित सर्व असाईनमेंट पूर्ण केलेली आहे आणि ते परदेशात नोकीसाठी गेलेले आहेत किंवा स्थाईक झाले आहेत. जे भारतीय नागरिक कायमचे परदेशात स्थाईक झाले आहेत आणि त्यांनी तेथील नागरित्व घेतलं आहे. अशा लोकांना देखील यामधून सूट देण्यात आली आहे, अशा लोकांना देखील आधार कार्ड नसताना पीएफच्या पैशांवर क्लेम करता येणार आहे.
नेपाळ आणि भूटानच्या लोकांना देखील सूट
ईपीएफओने आपल्या नव्या नियमांची माहिती देताना म्हटलं आहे की, या योजनेमध्ये नेपाळ आणि भूटानच्या नागरिकांचा देखील समावेश करण्यात आला आहे. नेपाळ आणि भूटानचे असे नागरिक जे भारतीय कंपनीत काम करतात आणि त्या कंपनीत पीएफची सुविधा आहे. तर अशा कर्मचाऱ्यांना आधार आणि यूएनआय लिंक नसताना देखील त्यांच्या पीएफच्या पैशांवर क्लेम करता येणार आहे. मात्र त्यासाठी त्यांना नागरिकत्वाच्या प्रमाणपत्राची गरज असणार आहे.