टोलनाक्यांवरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, आता टोलचे पैसे कापण्यासाठी नवी यंत्रणा

Toll System | रस्तेबांधणीसाठी सिमेंट आणि स्टीलचा कमीतकमी वापर करण्याचा प्रयत्न करावा, असे गडकरी यांनी सांगितले. जेणेकरून रस्तेबांधणीच्या खर्चात मोठी बचत होईल. देशातील सिमेंट आणि स्टील उत्पादक कंपूशाही करत आहेत.

टोलनाक्यांवरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, आता टोलचे पैसे कापण्यासाठी नवी यंत्रणा
Toll Plaza
Follow us
| Updated on: Aug 12, 2021 | 11:44 AM

नवी दिल्ली: देशभरातील टोलनाक्यांसाठी केंद्र सरकार लवकरच एक नवे धोरण लागू करणार आहे. या धोरणानुसार आता टोलनाक्यांवर जीपीएसवर आधारित ट्रॅकिंग सिस्टम (Tracking System) असेल. केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी यासंदर्भातील माहिती दिली. सध्याच्या घडीला देशभरात ट्रॅकिंग टोल टेक्नॉलॉजी उपलब्ध नाही. सध्या भारताकडून हे तंत्रज्ञान विकसित केले जात आहे. या सुविधेमुळे देशभरात टोलनाके पूर्णपणे बंद होतील. केवळ जीपीएस टोल सिस्टीमच्या माध्यमातून वाहनचालकांकडून टोल आकारला जाईल.

तर दुसरीकडे नितीन गडकरी यांनी रस्तेबांधणीसंदर्भातही एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. रस्तेबांधणीसाठी सिमेंट आणि स्टीलचा कमीतकमी वापर करण्याचा प्रयत्न करावा, असे गडकरी यांनी सांगितले. जेणेकरून रस्तेबांधणीच्या खर्चात मोठी बचत होईल. देशातील सिमेंट आणि स्टील उत्पादक कंपूशाही करत आहेत. यावर आपल्याला काहीतरी तोडगा काढणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्र सरकारने तज्ज्ञ सल्लागार नेमून सिमेंट आणि स्टीलवरील खर्चात कशी बचत होईल, यावर उपाययोजना करण्याचे ठरवल्याची माहितीही नितीन गडकरी यांनी दिली.

जीपीएस तंत्रज्ञानाने टोल कापला जाणार

देशभरात जीपीएसवर आधारित ट्रॅकिंग सिस्टम अस्तित्वात आल्यानंतर टोलनाक्यांवर कर्मचाऱ्यांची गरज उरणार नाही. मुळात टोलनाकेच ठेवावे लागणार नाहीत. टोल ट्रँकिंगच्या रशियन तंत्रज्ञानामुळे तुमची गाडी कोणत्या हद्दीत आहे, हे समजेल. त्यानुसार जीपीएस इमेजिंगचा वापर करुन संबंधित वाहनचालकाच्या ई-वॉलेटमधून टोलची रक्कम कापली जाईल. सध्याच्या नवीन वाहनांमध्ये जीपीएस सिस्टीम असल्यामुळे हे काम सोपे होईल. तर जुन्या वाहनांमध्ये जीपीएस यंत्रणा बसवणे बंधनकारक केले जाईल.

सध्याची FastTag यंत्रणा कशी काम करते?

वाहनाच्या विंडो स्क्रीनला लावलेल्या स्टिकरला फास्टॅग म्हणतात. याचे डिव्हाईस रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजीद्वारा वापर करते. ते थेट टोल नाक्यावरील स्कॅनरला कनेक्ट असंत. त्यामुळे तुमच्या अकाऊंटमधील पैसे कापले जातात. अशा वेळी तुमच्या गाडीला फास्टॅग लावलेला असेल तर कोणत्याही विलंबाशिवाय तुम्ही टोलनाक्यावरून निघून जाऊ शकता. हे फास्टॅग तुम्ही तुमच्या वॉलेट, डेबिट किंवा क्रेडिट कार्डशी जोडू शकता. त्यामुळे जिथे टोल भरण्याची गरज आहे, त्या टोल नाक्यावर तुमच्या अकाऊंटमधून आपोआप पैसे कट होतात.

हे ही वाचा :

Fastag कोणकोणत्या वाहनांना गरजेचा, कसा बसवायचा आणि त्याची किंमत किती?, वाचा A To Z माहिती

टोलनाक्यांवर Fastag बंधनकारक, अन्यथा दुप्पट टोल, आता तुम्हीच ठरवा काय करायचं…!

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.