Inflation : जूलै महिन्यात कांदा आणणार डोळ्यात पाणी; दर 50 ते 60 रुपये किलोवर जाण्याची शक्यता

गेल्या 15 दिवसांपासून नाफेड आणि व्यापाऱ्यांकडून स्वस्त कांद्याची मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू आहे. कांद्याची मागणी अचानक वाढल्याने पुढील काही दिवसांमध्ये कांद्याच्या दरात मोठी भाव वाढ पहायला मिळू शकते.

Inflation : जूलै महिन्यात कांदा आणणार डोळ्यात पाणी; दर 50 ते 60 रुपये किलोवर जाण्याची शक्यता
उन्हाळी कांद्याची आवक वाढल्याने सोलापुरात कांद्याला 1 रुपया किलो असा दर मिळला आहे.
Image Credit source: TV9 Marathi
अजय देशपांडे

|

May 02, 2022 | 8:04 AM

देशात महागाईचा (Inflation) भडका उडाला आहे. महागाईने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. इंधनाच्या दरापासून ते खाद्य तेलापर्यंत (Edible oil) सर्वच वस्तूंचे भाव वाढले आहेत. आता या स्पर्धेत भाजीपाला देखील मागे राहिला नाही. भाजीपाल्याचे दर देखील गगनाला भिडले आहेत. आता यात भर म्हणजे जुलैमध्ये कांदा (Onion) महागणार असल्याची बातमी समोर येत आहे. जुलैमध्ये कांद्याचे दर 50 ते 60 रुपयांवर जाऊ शकतात असे संकेत मिळत आहेत. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे नाफेडकडून मोठ्या प्रमाणात कांदा खरेदीला सुरुवात झाली आहे. नाफेडने कांदा खरेदी सुरू केल्याने आता व्यापारी देखील मागे नसून व्यापारी देखील मोठ्या प्रमाणात कांद खेरेदी करत आहेत. कांद्यांची अचानक मागणी वाढल्याने पुढील एक -दोन महिन्यात कांद्याच्या दरात मोठी भाव वाढ पहायला मिळू शकते असा अंदाज आहे.

नाफेडकडून कांद्याची खरेदी

मार्च महिन्यापासून कांद्याच्या दरात घसरण पहायला मिळत आहे. कोसळलेल्या कांद्याच्या दराचा फायदा घेऊन नॅशनल अ‍ॅग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया ‘नाफेडने’ मोठा प्रमाणात कांदा खरेदीला सुरुवात केली आहे. नाफेड प्रमाणेच व्यापारी देखील सध्या स्वस्तात मिळणारा कांदा खरेदी करत आहेत. नाशिक जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात कांद्याची खरेदी विक्री सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. सध्या मागणीपेक्षा पुरवठा जास्त असल्याने कांद्याचे दर स्वस्त आहेत. मात्र आता नाफेड आणि व्यापाऱ्यांनी कांदा खरेदीचा सपाटा लावल्याने लवकरच कांद्याचे दर 50 ते 60 रुपयांवर पोहोचू शकतात असा अंदाज आहे.

लिंबाचे दर वाढले

दुसरीकडे लिंबाचे वाढलेले दर देखील चर्चेचा विषय बनला आहे. लिंबाचे दर वाढल्याने लिंबू जवळपास जेवणातून गायबच झाले आहे. प्रति नग लिंबासाठी ग्राहकाला तब्बल दहा रुपये मोजावे लागत आहेत. तर लिंबाचे एक कॅरट पाचशे ते सहाशे रुपयांना मिळत आहे. लिंबाचे भाव वाढल्याने ऊस आणि लिंबू शरबताच्या दरात देखील दीड ते दोनपट वाढ झाली आहे. लिंबासह इतर भाजीपाल्याचे दर देखील वाढले असून, वाढत्या महागाईचा ग्राहकांना मोठा फटका बसत आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें