Pan card वापरुन भलत्याच कुणीतर कर्ज काढलं? अनेकांसोबत असं घडलंय, तुम्हीही वेळीच खात्री करुन घ्या!

Pan Card Fraud : तारण न घेता म्हणजेच कोलॅटरलशिवाय पर्सनल लोन देणाऱ्या या कंपनीतून अनेकांनी कर्ज काढलं खरं. पण कर्ज काढणारे भामटे कुणीतरी दुसरेच होते. म्हणजे प्रत्यक्षात कर्ज काढणारा व्यक्त खऱ्या व्यक्तीपेक्षा वेगळाच होता.

Pan card वापरुन भलत्याच कुणीतर कर्ज काढलं? अनेकांसोबत असं घडलंय, तुम्हीही वेळीच खात्री करुन घ्या!
Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 27, 2022 | 12:59 PM

मुंबई : भारतात डिजीटल व्यवहार (Digital Transaction in India) मोठ्या प्रमाणात केले जात आहेत. अनेकजण सध्या पैसे हे मोबाईलमध्ये घेऊन फिरत आहेत. एखाद वेळी पाकिटात एक रुपयाही नसेल, तर अख्खी कमाई मोबाईलमध्ये आहे, असं म्हटलं तर वावगं ठरायला नको. वाढत्या मोबाईलचा (Mobile Use) आर्थिक वापर आणि वाढते डिजीटल फसवणुकीचे प्रकार यांचे धोके वेळीच ओळखणं गरजेचं आहे. त्यामुळे अनेकांनी डिजीटल व्यवहार करताना खबरदारी बाळगायला हवी, असं आवाहन वेळोवेळी केलं जातं. दरम्यान, आपल्या सगळ्या व्यवहारांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेन्ट ठरतं ते म्हणजे पॅनकार्ड (Pan card). डेबिड कार्ड आणि क्रेडिट कार्डचा गैरवापर झाल्याचे प्रकार तुम्ही याआधी अनेकदा ऐकले असतील. पण आता तर चक्क पॅन कार्डचाही गैरवापर तुमच्या नकळत कुणाकडून केला जाऊ शकतो. याचा धोका वेळीच लक्षात घेतला नाही, तर गंभीर परिणामांना सामोरं जावं लागू शकतं. काही दिवसांपूर्वीच एक कंपनी या पॅनकार्डच्या गैरवापराच्या प्रकारामुळे चर्चेत आली होती.

तारण न घेता म्हणजेच कोलॅटरलशिवाय पर्सनल लोन देणाऱ्या या कंपनीतून अनेकांनी कर्ज काढलं खरं. पण कर्ज काढणारे भामटे कुणीतरी दुसरेच होते. म्हणजे प्रत्यक्षात कर्ज काढणारा व्यक्ती खऱ्या व्यक्तीपेक्षा वेगळाच होता. एखाद्याच्या पॅनकार्डचा गैरवापर करत कर्ज काढण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला होता. हे प्रकार गेल्या काही काळापासून वाढले आहेत. याप्रकारांना वेळीच रोखण्याची गरज व्यक्त केली जाते आहे.

कुठून कळतं की पॅन कार्डचा गैरवापर होतोय?

इंडियाबुल्सच्या धनी ऍपवरुन कर्ज दिलं जातं. विनातारण कर्ज देण्याची सुविधा या ऍपमध्ये देण्यात आली आहे. मात्र कर्ज काढण्याआधी आधार कार्ड, पॅन कार्ड यांसारखे बेसिक डिटेल्स द्यावे लागतात. दरम्यान, काही जणांनी या ऍपचा गैरवापर केला. भलत्याच कुणाचे तरी पॅन कार्ड वापरुन कर्ज काढण्यात आली. जेव्हा कर्जाचे हफ्ते भरले गेले नाहीत, तेव्हा हे सगळं प्रकरण उघडकीस आलं.

तुम्हाला का काळजी घ्यायला हवी?

परवानगी शिवायच तुमच्या पॅनकार्डचा गैरवापर केला गेला असेल, तर त्याबाबत तक्रार करता येते. तुमच्या परवानगीशिवाय कुणीतरी तुमच्या नावे कर्ज घेतलं असेल, तर त्याबाबत तुम्हाला वेळीच माहिती असायला हवी. कारण जर तुम्हाला याबाबत माहिती नसेल आणि या कर्जाचे हफ्ते जर भरले जात नसतील, तर तुमची चूक नसतानाही गंभीर परिणामांना सामोरं जावं लागू शकतं. भविष्यात खरोखर कर्ज घ्यायची वेळ येईल, तेव्हा तुमचा रेकॉर्ड तुमच्यासाठी अडचणीचा ठरु शकेल. म्हणूनच खबरदारी बाळगणं गरजेचं आहे.

अनेकांनी ट्वीटरवरुन याबाबत माहिती समोर आणल्यानंतर पॅन कार्डचा गैरवापर सुरु असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. हे प्रकार प्रामुख्यानं बिहार आणि उत्तर प्रदेशातून होत असल्याचं पाहण्यात आलं आहे. कर्ज परतफेड केलं गेलं नसल्यानं, हा धक्कादायक प्रकार समोर आला.

तुम्ही कुठून आणि कसं तपासाल?

तुमच्या नावे कर्ज आहे किंवा नाही, हे तपासण्यासाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहे. तुम्ही वेगवेगळ्या क्रेडीट ब्युरोमधून आपल्या पॅन कार्डचा रेकॉर्ड तपासू शकता. त्यातून तुम्ही नेमकं किती लोन काढलंय किंवा तुमचे आर्थिक व्यवहार नेमके कसे आहे, याची तपशीलवार माहिती आढळते. त्यासाठी सिबिल, ईक्वीफॅक्स, एक्सपेरीअन सारख्या क्रेडिट ब्युरोची मदत घेता येऊ शकेल.

यासोबत तुम्ही पेटीएम किंवा बँक बाझार या साईट्सवरुनही आपल्या पॅनचा रेकॉर्ज तपासू शकता. आपलं नाव, जन्म तारीख आणि पॅन कार्ड टाकून तुम्हाला कर्जाबाबतचे हे तपशील मिळू शकतील. दरम्यान, पॅन कार्डचा गैरवापर टाळायचे असेल, तर आपलं आधार कार्ड आणि पॅन कार्ड शक्यतो कुणाकडे देऊ नका. या दोन्ही डॉक्युमेन्ट्सचे नंबर आपल्याकडे सुरक्षित राहतील, याची खात्री बाळगा.

संबंधित बातम्या :

Gold-silver price: सोन्याच्या दरवाढीला अखेर ब्रेक, सोन्याचे भाव स्थिर; चांदीच्या दरात घसरण

घर खरेदी करायचंय? जाणून घ्या घर खरेदी करण्यापूर्वी काय काळजी घ्यावी

रेशन कार्ड-आधार लिंक करण्याची अंतिम तारीख 30 जूनपर्यंत वाढवली, या 7 टप्प्यात काम होणार पूर्ण; देशात कुठेही मिळणार रेशन

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.