AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सेमीकंडक्टरचा तुटवडा, वाहन उद्योगाला ‘ब्रेक’; ठोक विक्रीत 8 टक्क्यांनी घट

वाहन निर्मितीसाठी मुलभूत मानल्या जाणाऱ्या सेमीकंडक्टरच्या (semiconductor) तुटवड्यामुळं वाहन पुरवठ्यात घट झाली आहे. वाहन निर्मिती कंपन्यांची संघटना ‘सियाम’ने जानेवारी महिन्यात वाहनांच्या पुरवठ्यात आठ टक्के घट झाल्याचं म्हटलं आहे.

सेमीकंडक्टरचा तुटवडा, वाहन उद्योगाला ‘ब्रेक’; ठोक विक्रीत 8 टक्क्यांनी घट
| Edited By: महादेव कांबळे | Updated on: Feb 12, 2022 | 12:00 AM
Share

नवी दिल्लीः कोविड प्रकोपामुळं भारतीय वाहन उद्योगाच्या वाढीला ब्रेक बसला होता. कोविड आलेख घसरल्यानंतर ट्रॅकवर येणारा वाहन उद्योगासमोर नवी समस्या उभी ठाकली आहे. वाहन निर्मितीसाठी मुलभूत मानल्या जाणाऱ्या सेमीकंडक्टरच्या (semiconductor) तुटवड्यामुळं वाहन पुरवठ्यात घट झाली आहे. वाहन निर्मिती कंपन्यांची संघटना ‘सियाम’ने जानेवारी महिन्यात वाहनांच्या पुरवठ्यात आठ टक्के घट झाल्याचं म्हटलं आहे. जानेवारी 2022 मध्ये एकूण वाहनांची ठोक विक्री 2,54,287 झाली. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात वाहन विक्रीचा आकडा 2,76,554 होता. वाहन निर्मिती कंपन्यांची संघटना सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सने (SIAM) आकडेवारी जाहीर केली आहे. गेल्या महिन्यांत 1,26,693 प्रवासी कारच्या (Passenger vehicle) पुरवठा करण्यात आला. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यांत पुरवठ्याचा आकडा 1,53,244 होता.

सेमीकंडक्टर तुटवडा आकड्यांत:

• यूटिलिटी वाहनांची विक्री जानेवारी 2021 मध्ये 1,11,494 होती. जानेवारी 2022मध्ये 1,16,962 वर आकडा पोहोचला. • दुचाकी वाहनांचा पुरवठा 21 टक्क्यांनी घसरुन 11,28,293 वर • तीन चाकी वाहनांची ठोक विक्री घटीसह 24,091 वर. • मारुति सुझुकी पुरवठ्यात दहा हजारांच्या घटीसह 1,28,924 वर. • हुंदाई मोटर इंडियाच्या पुरवठ्यात आठ हजारांच्या घटीसह 52,005 वर.

‘सेमी’तुटवड्याचा ‘लार्ज’ इफेक्ट:

सेमीकंडक्टरचा तुटवडा संपूर्ण जगाला भेडसावतो आहे. मोठमोठे प्रकल्प सेमीकंडक्टर वेळेवर मिळत नसल्याने थंडावले आहेत. विविध निर्मिती कंपन्यांची पानं सेमीकंडक्टर शिवाय हलत नाही. सेमीकंडक्टर उत्पादनासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. भारताला भविष्यातील सेमीकंडक्टर हब तयार करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. वेदांत ग्रुपचे प्रमुख अनिल अग्रवाल यांनी सेमीकंडक्टर समस्येवर उपाययोजना करण्यासाठी त्यांची कंपनी येत्या तीन वर्षांमध्ये 60 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली होती. या भरीव गुंतवणुकीमुळे देशातील सेमीकंडक्टर उत्पादन वाढणार तर आहेत. त्याचा जागतिक बाजाराला सुद्धा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

सेमीकंडक्टर हब:

देशाला इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे जागतिक महत्त्वाचे केंद्र बनविण्याच्या महत्त्वाकांक्षेसह केंद्रीय मंत्रिमंडळाने सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले उपकरणांशी संलग्न ७६,००० कोटींच्या प्रोत्साहन (पीएलआय) योजनेला मान्यता दिली होती. आगामी सहा वर्षांच्या काळात सेमी कंडक्टर निर्मिती कंपन्यांना टप्प्याटप्प्याने हा निधी देण्यात येणार आहे. यामुळे देशांतर्गत सेमीकंडक्टर निर्मितीला चालना मिळण्यासह, चीनवरील अवलंबित्व कमी होणार आहे.

संबंधित बातम्या

रेल्वेची ‘भट्टी’ पुन्हा पेटणार, सर्व गाड्यांत किचन सुरू; 14 तारखेपासून खानपान सेवा

नारळाची करवंटी फेकून देण्याचा मूर्खपणा करु नका! हे तर पैसे कमावण्याचं साधन आहे

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रः व्याजसह कर सवलतीचा ही फायदा गुंतवणूक तुमच्या फायद्याची..!

Follow Us
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
Lalbaugcha Raja Auction : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं तब्बल एवढ्या कोटींना विकलं! बाप्पाचा आशीर्वाद मानून भक्तानेच खरेदी केलं
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
Manoj Jarange ED : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू; तब्बल एवढ्या कोटींच्या व्यवहारांचा दावा
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने खळबळ; संजय राऊतांनी थेट...
ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग
LPG Price : ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग; ऑक्टोबरमधील हे मोठे बदल जाणून घ्या
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....
ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि...
Raj Thackeray : Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि संविधान.....
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?