Petrol Price : …तर पेट्रोल आणि डिझेल 5 रुपयांनी स्वस्त होणार?

Petrol Price | येत्या काही दिवसांमध्ये खनिज तेलाचे उत्पादन वाढवण्याचे संकेत ओपेक या तेल उत्पादक देशांच्या संघटनेकडून देण्यात आले आहेत. तसे घडल्यास आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे दर कमी होऊन त्याचा थेट फायदा भारताला मिळेल.

Petrol Price : ...तर पेट्रोल आणि डिझेल 5 रुपयांनी स्वस्त होणार?
पेट्रोल आणि डिझेल
Follow us
| Updated on: Aug 18, 2021 | 4:18 PM

नवी दिल्ली: इंधनाच्या दरांनी सार्वकालिक उच्चांक गाठल्यामुळे देशातील महागाईत भर पडली आहे. त्यामुळे सामान्य नागरीक हैराण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय पातळीवरील काही घडामोडी भारतासाठी दिलासादायक ठरु शकतात. येत्या काही दिवसांमध्ये खनिज तेलाचे उत्पादन वाढवण्याचे संकेत ओपेक या तेल उत्पादक देशांच्या संघटनेकडून देण्यात आले आहेत. तसे घडल्यास आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे दर कमी होऊन त्याचा थेट फायदा भारताला मिळेल. परिणामी आगामी दिवसांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर 5 रुपयांनी खाली येऊ शकतात.

IIFL सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांच्या माहितीनुसार, खनिज तेलाचे उत्पादन वाढल्यास प्रतिबॅरल भाव 65 रुपयांपर्यंत खाली येईल. त्यामुळे भारताला खनिज तेलाच्या आयातीसाठी कमी पैसे मोजावे लागतील. याचा थेट परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर दिसून येईल, असे अनुज गुप्ता यांनी म्हटले.

महाराष्ट्रातील शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचा आजचा दर

मुंबई: पेट्रोल- 107.83, डिझेल 97.45 पुणे: पेट्रोल- 107.39, डिझेल 95.71 नाशिक: पेट्रोल- 108.14, डिझेल 95.85 औरंगाबाद: पेट्रोल- 109.12, डिझेल 98.69 कोल्हापूर: पेट्रोल- 107.89, डिझेल 95.97

17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पेट्रोल शंभरी पार

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीनंतर जवळपास 17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पेट्रोलची किंमत ही 100 रुपये प्रतिलिटरपर्यंत गेली आहे. यात राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, लडाख, कर्नाटक, जम्मू-काश्मीर, ओडिशा, तामिळनाडू, बिहार, केरळ, पंजाब, सिक्कीम, दिल्ली, पुडुचेरी आणि पश्चिम बंगालचा समावेश आहे. यात सर्वप्रथम भोपाळमध्ये पेट्रोलची किंमत ही 100 रुपये प्रतिलिटरपर्यंत गेली होती, त्यापाठोपाठ जयपूरमध्येही पेट्रोलच्या किंमतीने शतक गाठलं होतं.

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलाचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

संबंधित बातम्या:

देशातील पेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्याकडे जाणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?

…म्हणून मोदी सरकार इंधनावरील कर कमी करण्यासाठी अनुत्सुक?

पेट्रोल-डिझेल पाठोपाठ आता सीएनजीच्या किंमतीही भडकल्या, पाहा किलोमागे किती रुपयांची वाढ…

Non Stop LIVE Update
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.