Petrol Diesel Price : 17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पेट्रोल शंभरी पार, जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव?

यापूर्वी जून महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती तब्बल 16 दिवस वाढवण्यात आल्या होत्या. तर मे महिन्यातही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती 16 दिवस वाढवण्यात आल्या.

Petrol Diesel Price : 17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पेट्रोल शंभरी पार, जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव?
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Jul 09, 2021 | 7:40 AM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. नुकतंच तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जाहीर केल्या आहे. आज (09 जुलै) पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यापूर्वी गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सलग दोन दिवस वाढ करण्यात आली होती. त्यानंतर इंधनाचे दर हे नव्या विक्रमाच्या पातळीवर पोहोचले होते. (Petrol Diesel Price Fuel Rate Today 9 July 2021)

दिल्लीत पेट्रोल-डिझेलचा दर किती?

देशाची राजधानी नवी दिल्लीत गुरुवारी पेट्रोलच्या दरात 35 पैसे आणि डिझेलच्या दरात 09 पैशांनी वाढ झाली. तर बुधवारीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली होती. बुधवारी इंधन दरवाढीनंतर राजधानी दिल्ली आणि कोलकातामध्ये पेट्रोलची किंमत ही प्रतिलिटर 100 रुपयांच्या पुढे गेली होती. आज पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर असल्यानंतरही राजधानी दिल्लीत पेट्रोलची किरकोळ किंमत 100.56 रुपये इतकी पाहायला मिळत आहे. तर डिझेलचा दर हा 89.62 रुपये प्रतिलिटर इतका झाला आहे.

मुंबईत पेट्रोलची किंमत काय?

त्याशिवाय मुंबईत आज एक लीटर पेट्रोलची किंमत ही 106.59 रुपयांवर पोहोचली आहे. तर डिझेलची किंमत प्रतिलिटर 97.18 रुपयांवर पोहोचली आहे. कोलकातामध्ये आज प्रतिलीटर पेट्रोलची किंमत 100.62 रुपये आणि डिझेलची किंमत 92.65 रुपयांवर पोहोचली आहे. त्याचप्रमाणे चेन्नईमध्येही आज पेट्रोलची किंमत 101.06 रुपये प्रतिलीटर आणि डिझेलची किंमत 94.15 रुपये प्रतिलिटर इतकी झाली आहे.

जुलैमध्ये सलग पाचव्यांदा पेट्रोलच्या दरात वाढ

दरम्यान जुलै महिन्यात सलग पाचव्यांदा पेट्रोलच्या दरात वाढ झाली आहे. तर तिसऱ्यांदा डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. यापूर्वी जून महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती तब्बल 16 दिवस वाढवण्यात आल्या होत्या. तर मे महिन्यातही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती 16 दिवस वाढवण्यात आल्या. किरकोळ इंधन दरामधील ही दरवाढ 4 मे 2021 पासून सुरू झाली आहे. यापूर्वी 5 राज्यांमधील निवडणुकांच्या दरम्यान सलग 18 दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल झाला नव्हता.

शहर  पेट्रोल (रुपये/लीटर)  डीझेल (रुपये/लीटर)
नवी दिल्‍ली  100.56 89.62
मुंबई 106.59 97.18
कोलकाता 100.62 92.65
चेन्‍नई 101.37 94.15
नोएडा  97.78 90.09
बंगळूरु 103.93 94.99
हैदराबाद 104.50 97.68
पटना 102.79 95.14
जयपूर 107.37 98.74
लखनऊ 97.67 90.01
गुरुग्राम 98.22 90.22
चंदीगड 96.70 89.25

17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पेट्रोल शंभरी पार

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीनंतर जवळपास 17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पेट्रोलची किंमत ही 100 रुपये प्रतिलिटरपर्यंत गेली आहे. यात राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, लडाख, कर्नाटक, जम्मू-काश्मीर, ओडिशा, तामिळनाडू, बिहार, केरळ, पंजाब, सिक्कीम, दिल्ली, पुडुचेरी आणि पश्चिम बंगालचा समावेश आहे. यात सर्वप्रथम भोपाळमध्ये पेट्रोलची किंमत ही 100 रुपये प्रतिलिटरपर्यंत गेली होती, त्यापाठोपाठ जयपूरमध्येही पेट्रोलच्या किंमतीने शतक गाठलं होतं.

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकारे तपासा

एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता.

त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता.

(Petrol Diesel Price Fuel Rate Today 9 July 2021)

संबंधित बातम्या : 

आता फोनद्वारे अवघ्या दहा मिनिटात उघडा SBI बँकेत अकाऊंट, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

EPF की PPF यातच अडकलात! रिटायरमेंटसाठी ‘या’ योजनेत गुंतवा पैसे, 60 वर्षानंतर मिळतील 3.5 कोटी

विमा पॉलिसीमध्ये ‘बेनेफिशियल नॉमिनी’चा नवा नियम; याच व्यक्तींना मिळू शकतील नॉमिनीचे लाभ

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.