AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Prices Today: पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जाहीर, जाणून घ्या आजचा भाव

Petrol and Diesel | सप्टेंबर महिन्यातील 17 दिवसांत पेट्रोलच्या दरात अवघ्या 30 पैशांची कपात झाली झाली आहे. त्यामुळे इंधन दरात कपात होऊन महागाईपासून दिलासा मिळेल, या सामान्यांच्या आशा तुर्तास धुळीला मिळाल्या आहेत.

Petrol Diesel Prices Today: पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जाहीर, जाणून घ्या आजचा भाव
पेट्रोल-डिझेल
| Edited By: Rohit Dhamnaskar | Updated on: Sep 17, 2021 | 7:05 AM
Share

मुंबई: देशभरात सलग 12 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर आहेत. पेट्रोलियम कंपन्यांकडून शुक्रवारी सकाळी नवे दर जाहीर करण्यात आले. त्यानुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 107.26 रुपये तर एका लीटर डिझेलसाठी 96.19 रुपये मोजावे लागत आहेत. तर दिल्लीत प्रतिलीटर पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 101.19 आणि 88.62 रुपये इतका आहे. हे दर आज दिवसभरासाठी लागू राहतील. यापूर्वी 5 सप्टेंबरला इंधनाच्या दरात शेवटची कपात पाहायला मिळाली होती. सप्टेंबर महिन्यातील 17 दिवसांत पेट्रोलच्या दरात अवघ्या 30 पैशांची कपात झाली झाली आहे. त्यामुळे इंधन दरात कपात होऊन महागाईपासून दिलासा मिळेल, या सामान्यांच्या आशा तुर्तास धुळीला मिळाल्या आहेत. (Petrol and Diesel price today)

गेल्या काही दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिज तेलाचे दर सातत्याने वाढत असल्याने भारतामध्येही त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे भारतीय पेट्रोलियम कंपन्या आणखी किती काळ इंधनाचे दर कमी ठेवणार, हे पाहावे लागेल. भारताने मुक्त बाजारपेठेचे धोरण स्वीकारल्यापासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठे आणि परदेशी एक्स्चेंजच्या दरांनुसार भारतात इंधनाचे दर निश्चित केले जातात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधनाच्या दरात वाढ झाल्यास भारतामध्येही त्याचा परिणाम होणे, क्रमप्राप्त आहे.

पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत येणार?

लखनऊमध्ये आज जीएसटी परिषदेची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत पेट्रोल आणि डिझेल जीएसटी अंतर्गत आणण्यासंदर्भात महत्त्वाची निर्णय होऊ शकतो. तसे झाल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती निम्म्याने कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, इंधन जीएसटीच्या कक्षेत आल्याने राज्यांना त्यावरील कराच्या माध्यमातून येणाऱ्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागेल. त्यामुळे राज्यांकडून या निर्णयाला विरोध होण्याची शक्यता आहे.

दररोज 6 वाजता बदलतात किमती

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.

असे तपासा पेट्रोल आणि डिझेलचे भाव

आपण एसएमएसच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता. पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. इंडियन ऑइलच्या वेबासाइटनुसार, RSP बरोबर आपल्या शहराचा कोड टाइप करून 9224992249 नंबरवर SMS पाठवावा लागणार आहे. या शहराचा कोड वेगवेगळा असतो. बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरवर मेसेज पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकतात.

इंधनाचे दर वाढल्याने मोदी सरकारची चांदी

देशभरात इंधन दरवाढीमुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. मात्र, हा काळ केंद्र सरकारसाठी सुगीचा ठरताना दिसत आहे. कारण पेट्रोल आणि डिझेलवरील करांच्या माध्यमातून केंद्र सरकारला मिळणाऱ्या महसूलात घसघशीत वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या चार महिन्यांमध्येच इंधनावरील अबकारी करातून (Excise Duty) मिळणाऱ्या महसूलात तब्बल 48 टक्के वाढ झाली आहे.

केंद्र सरकारला तेल रोख्यांचे पैसे अदा करण्यासाठी मोठ्याप्रमाणावर खर्च करावा लागत आहे. मात्र, यंदाच्या आर्थिक वर्षातील पहिल्या चार महिन्यांत कराच्या माध्यमातून मिळालेले उत्पन्न या देयकांच्या तीनपट इतके आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या माहितीनुसार, एप्रिल ते जुलै या काळात अबकारी कराच्या माध्यमातून सरकारला एक लाख कोटीहून अधिकचे उत्पन्न मिळाले आहे. गेल्यावर्षी हाच आकडा 67,895 कोटी रुपये इतका होता.

संबंधित बातम्या:

जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव पुन्हा कडाडले, भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी घेतला ‘हा’ निर्णय

पेट्रोल-डिझेल चढ्या दरात विकून इंडियन ऑईलने किती नफा कमावला?

Fuel Price Hike: केंद्र सरकारने वर्षभरात पेट्रोल-डिझेलवरील कर वाढवला नाही, मग 32 रुपयांची दरवाढ कशी झाली?

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...