PMGKAY: देशातील गरीब कुटुंबांना नोव्हेंबर महिन्यानंतरही धान्य मोफत मिळणार का?

केंद्र सरकारचे अन्न आणि ग्राहक व्यवहार सचिव सुधांशू पांडे यांनी सांगितले की, या योजनेअंतर्गत मोफत रेशनचे वितरण नोव्हेंबरच्या पुढे वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. देशाची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत आहे. अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत असल्याने आणि आमची OMSS (ओपन मार्केट सेल स्कीम) देखील यावर्षी चांगली राहिली आहे.

PMGKAY: देशातील गरीब कुटुंबांना नोव्हेंबर महिन्यानंतरही धान्य मोफत मिळणार का?
पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना
Follow us
| Updated on: Nov 06, 2021 | 7:05 AM

नवी दिल्ली: पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना म्हणजेच PMGKAY अंतर्गत, गरिबांना नोव्हेंबर नंतर मोफत रेशन मिळणार नसल्याची माहिती समोर येत आहे. कोरोनाकाळातील देशव्यापी लॉकडाऊनवेळी ही योजना देशातील गरीबांसाठी मोठा आधार ठरली होती. मात्र, नोव्हेंबरमध्ये या योजनेचा कालावधी संपुष्टात येत असून त्यानंतर मोदी सरकार योजनेला मुदतवाढ देण्याच्या विचारात नसल्याचे समजते.

केंद्र सरकारचे अन्न आणि ग्राहक व्यवहार सचिव सुधांशू पांडे यांनी सांगितले की, या योजनेअंतर्गत मोफत रेशनचे वितरण नोव्हेंबरच्या पुढे वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. देशाची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत आहे. अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत असल्याने आणि आमची OMSS (ओपन मार्केट सेल स्कीम) देखील यावर्षी चांगली राहिली आहे. त्यामुळेच मोफत रेशन देण्याच्या योजनेच्या मुदतवाढीचा कोणताही प्रस्ताव नाही. त्यामुळे केंद्र सरकार ही योजना बंद होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

गेल्या वर्षभरापासून या योजनेंतर्गत गरीब कुटुंबांना केंद्र सरकारकडून मोफत रेशन दिले जात आहे. गेल्यावर्षी मार्चमध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना जाहीर करण्यात आली होती. सुरुवातीला ही योजना एप्रिल-जून 2020 या कालावधीसाठी सुरू करण्यात आली होती, परंतु नंतर योजनेला 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.

महिन्याला प्रत्येक कुटुंबाला मोफत धान्य

देशातील 80 कोटी नागरिकांना पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेतंर्गत मोफत अन्नधान्य मिळत होते. यामध्ये प्रत्येक महिन्याला 5 किलो गहू, 5 किलो तांदूळ आणि 1 किलो हरभरा डाळ मोफत दिली जात होती. अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येच्या अडीच पट जनतेला आपल्या सरकारकडून मोफत अन्नधान्य दिल्याचं मोदींनी सांगितले होते.

इतर बातम्या:

केंद्राने पेट्रोल डिझेल दरवाढ कमी केली, ठाकरे सरकार करणार का? शरद पवारांनी 5 शब्दात निकाल लावला!

…म्हणून भाजपला इंधानाचे दर कमी करावे लागले- पी चिदंबरम

केंद्राने इंधनाचे दर कमी केले; आता राज्य सरकारही दर कमी करणार की जनतेचा रोष पत्करणार?

VIDEO: पेट्रोल 50 रुपयांनी स्वस्त करायचं असेल तर भाजपला देशभर पराभूत करावे लागेल काय?; राऊतांचा सवाल

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.