AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Loan : दिवाळीत खरेदीसाठी रक्कम अपुरी पडली, काळजी कशाला? आता करुन घ्या शॉपिंग, नंतर करा पेमेंट..

Loan : दिवाळीत खरेदीच अशी असते की, जमापुंजी झटपट संपते, अशावेळी ही योजना तुमच्या कामी येऊ शकते.

Loan : दिवाळीत खरेदीसाठी रक्कम अपुरी पडली, काळजी कशाला? आता करुन घ्या शॉपिंग, नंतर करा पेमेंट..
नंतर करा रक्कम अदा Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Oct 22, 2022 | 9:00 PM
Share

नवी दिल्ली : देशातील अनेक कंपन्या ‘बाय नाऊ पे लेटर’ (Buy Now Pay Later- BNPL) ही सुविधा देत आहेत. ही संकल्पना लोकप्रिय झालेली आहे. त्याचा फायदा या दिवाळसणात (Diwali) तुम्हाला घेता येईल. विशेष म्हणजे ही योजना व्याजमुक्त आहे. हे एक प्रकारे इंटरेस्ट फ्री लोन (Interest Free Loan) आहे.

दिवाळी सणात किती कमी खरेदी केली तरी खिशा खाली होतोच होतो आणि खात्यातील शिल्लक रक्कमही संपते. दिवाळी म्हणजे आनंदाचा सण असतो. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांचा हिरमोड करुन चालत नाही.

अशावेळी अशा झटपट कर्ज देणाऱ्या कंपन्या तुमच्या मदतीला धाऊन येतात. यामध्ये पेटीएम (Paytm) ची बाय नाऊ पे लेटर ही सुविधा उपयोगी ठरु शकते. जर या दिवाळीत तुम्ही या सुविधेद्वारे जोरदार शॉपिंग करु शकता.

पेटीएमने या सुविधेचे नाव पेटीएम पोस्टपेड (Paytm Postpaid) असे ठेवले आहे. पेटीएम पोस्टपेड क्रेडिट लिमिटसोबत तुम्हाला खरेदीचा आनंद लुटता येणार आहे. त्यासाठी तुम्हाला सध्या काहीच रक्कम जमा करावी लागणार नाही. पुढील महिन्यात तुम्हाला ही रक्कम अदा करावी लागेल.

Paytm Postpaid सुविधेचा वापर करुन तुम्ही घरा शेजारील, चौकातील किराणा दुकान अथवा छोट्या व्यापाऱ्याला रक्कम अदा करु शकाल आणि पुढील महिन्यात ती रक्कम तुम्हाला अदा करता येईल.

ही सुविधा तीन प्रकारात तुम्हाला घेता येईल. Lite, Delite आणि Elite असे हे तीन प्रकार आहेत. लाईट प्रकारात तुम्हाला 20,000 रुपयांपर्यंत खर्च करता येतो. तर एलिटमध्ये एक लाख रुपयांपर्यंतची खर्च मर्यादा देण्यात आली आहे.

पेटीएम अॅपच्या My Paytm Postpaid अंतर्गत ही सुविधा तुम्हाला मिळेल. या पर्यायामध्ये Paytm Postpaid वर तुम्हाला क्लिक करावे लागेल. त्यानंतर केवायसी पूर्ण करुन या सुविधेचा फायदा घेता येईल.

Follow Us
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?