AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वाधिक व्याजासहित कर सवलतीचा ही फायदा, या योजनेत करा गुंतवणूक

टपाल खात्याच्या अल्प गुंतवणूक योजनेत जसे की सुकन्या समृद्धी योजनेचा बोलबाला आहे. मुलीच्या सुरक्षित भविष्यासाठी आणि तिच्या पुढील शिक्षणासाठी अनेक पालकांनी या योजनेला प्राधान्य आणि पसंती दिली आहे. जाणून घेऊयात या योजनेचे फायदे

सर्वाधिक व्याजासहित कर सवलतीचा ही फायदा, या योजनेत करा गुंतवणूक
महागाई भत्त्यात वाढ होणारImage Credit source: twitter
| Edited By: | Updated on: Mar 07, 2022 | 8:37 AM
Share

सुरक्षित परतावा देणाऱ्या गुंतवणूक योजनेचा विचार करत असाल तर टपाल खात्यातील विविध गुंतवणूक योजना फायदेशीर ठरेल. या योजनांमध्ये तुम्हाला चांगला परतावा मिळतो. त्याचबरोबर यात गुंतवलेला (Investment)पैसाही पूर्णपणे सुरक्षित आहे. बँक दिवाळखोरीत (Bank Default)गेली तर फक्त पाच लाख रुपये परत मिळतात. पण पोस्ट ऑफिसचं (Post Office) तसं नाही टपाल खात्याची सरकारने हमी घेतली आहे. याशिवाय पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक अगदी कमी रकमेत सुरू करता येते. पोस्ट ऑफिसच्या अल्पबचत योजनांमध्ये सुकन्या समृद्धी योजना सर्वाधिक लोकप्रिय आहे. मुलीच्या सुरक्षित भविष्यासाठी आणि तिच्या पुढील शिक्षणासाठी अनेक पालकांनी या योजनेला प्राधान्य आणि पसंती दिली आहे. सुकन्या समृद्धी योजनेत सध्या वार्षिक 7.6 टक्के व्याजदर आहे.एका आर्थिक वर्षात या अल्पबचत योजनेत किमान २५० रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपयांची गुंतवणूक करता येईल. या योजनेविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

  1. व्याज दर पोस्ट ऑफिसच्या सुकन्या समृद्धी योजनेत सध्या वार्षिक 7.6 टक्के व्याजदर आहे. हा व्याजदर 1 एप्रिल 2020 पासून लागू करण्यात आला आहे. व्याज वार्षिक आधारावर मोजले जाते. वार्षिक आधारावर चक्रवाढ व्याज देण्यात येते.
  2. दीड लाखांपर्यंत गुंतवणूक एका आर्थिक वर्षात या अल्पबचत योजनेत किमान 250 रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपयांची गुंतवणूक करता येईल. यानंतर त्या व्यक्तीला 50 रुपयांच्या पटीत गुंतवणूक करावी लागेल. एकरकमी या योजनेत ठेवी ठेवता येतात. एक महिना अथवा आर्थिक वर्षात ठेवींच्या संख्येवर कोणतीही मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही.
  3. खाते कोण उघडू शकेल? सुकन्या समृद्धी योजनेत पालक 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीच्या नावे खाते उघडू शकतात. या योजनेअंतर्गत भारतातील कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये किंवा कोणत्याही बँकेत मुलीच्या नावे एकच खातं उघडता येतं. हे खाते कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींसाठी उघडले जाऊ शकते. जुळ्या किंवा तीन मुलींच्या बाबतीत दोनपेक्षा जास्त खाती उघडता येतात.
  4. करसवलतीचे फायदे सुकन्या समृद्धी योजनेत जमा झालेल्या रकमेवर आयकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत वजावट मिळू शकते.
  5. योजनेचा कालावधी या अल्प गुंतवणूक योजनेत गुंतवणूक सुरू केल्याच्या तारखेपासून 21 वर्षांनी खातं बंद करता येतं. याशिवाय वयाच्या 18 वर्षानंतर मुलाच्या लग्नाच्या वेळीही अकाऊंट बंद करता येऊ शकतं. लग्नाच्या तारखेच्या एक महिना आधी किंवा योजनेनंतर तीन महिन्यांनी खाते बंद होऊ शकते.

संबंधित बातम्या : 

लोन हवंय चिंता करू नका; बँकेत सोने तारण ठेवून देखील तुम्हाला कर्ज मिळू शकते, जाणून घ्या नियम व अटी

येत्या वर्षात 25 हजार भारतीयांना नोकरी देणार डेन्मार्कची ‘ही’ कंपनी, महसुलाच्या दुप्पट वाढीचे लक्ष

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?