लोन हवंय चिंता करू नका; बँकेत सोने तारण ठेवून देखील तुम्हाला कर्ज मिळू शकते, जाणून घ्या नियम व अटी

तुम्हाला पैशांची खुपच गरज आहे, अशावेळी तुम्ही कर्जासाठी (Loan) बँकेत अर्ज करता. मात्र अनेकदा काही कागदपत्रांच्या अभावी किंवा इतर काही तात्रिंक कारणांमुळे तुमचा अर्ज मंजूर होत नाही. अर्ज मंजूर न झाल्याने तुम्हाला कर्ज मिळू शकत नाही. मात्र तुम्हाला तर पैशांची आवश्यकता आहे मग तुम्ही काय कराल? अशावेळी चिंता करण्याचे कारण नाही. कारण तुम्ही तुमच्या जवळ असलेले सोने तारण ठेवून देखील कर्ज घेऊ शकता.

लोन हवंय चिंता करू नका; बँकेत सोने तारण ठेवून देखील तुम्हाला कर्ज मिळू शकते, जाणून घ्या नियम व अटी
Follow us
| Updated on: Mar 06, 2022 | 11:35 PM

तुम्हाला पैशांची खुपच गरज आहे, अशावेळी तुम्ही कर्जासाठी (Loan) बँकेत अर्ज करता. मात्र अनेकदा काही कागदपत्रांच्या अभावी किंवा इतर काही तात्रिंक कारणांमुळे तुमचा अर्ज मंजूर होत नाही. अर्ज मंजूर न झाल्याने तुम्हाला कर्ज मिळू शकत नाही. मात्र तुम्हाला तर पैशांची आवश्यकता आहे मग तुम्ही काय कराल? अशावेळी चिंता करण्याचे कारण नाही. कारण तुम्ही तुमच्या जवळ असलेले सोने तारण ठेवून देखील कर्ज घेऊ शकता. त्यालाच गोल्ड लोन (Gold Loan) असे म्हणतात. गोल्ड लोन हे एक प्रकारचे सिक्योर्ड लोन असते. म्हणजे तुम्हाला जेव्हा कर्जाची गरज असते, तेव्हा तुम्ही संबंधित बँक अथवा संस्थेकडे तुमचे सोने तारण ठेवता. तुम्हाला त्या सोन्याच्या बदल्यात विशिष्ट रक्कम दिली जाते. गोल्ड लोनवर व्याज (Interest) देखील कमी असते. तसेच गोल्ड लोन घेण्यासाठी मोठ्याप्रमाणात कागदपत्रांची पुर्तता करण्याची देखील गरज नसते. तुम्हाला कोणतीही बँक अगदी माफक दरात गोल्ड लोन देते.

तुम्हाला गोल्ड लोन कुठे मिळते

तुम्हाला विविध बँकेत उदा: एसबीआय, आयसीआयसीआय, एचडीएफसी बँक यासारख्या बँकेत गोल्ड लोन मिळू शकते. या व्यतिरिक्त नॉन बँकिंग फायनाशियल कंपन्या देखील तुम्हाला सोने तारण कर्ज देतात. साधारणपणे तुम्ही बँकेकडे किती सोने तारण ठेवता यावरून तुम्हाला कर्ज किती मिळणार याची रक्कम ठरते. तसेच प्रत्येक बँकेची आपली मर्यादा देखील आहे. उदा: आयसीआयसीआय बँक तुम्हाला दहा हजार रुपयांपासून ते एक कोटी रुपयांपर्यंत गोल्ड लोन उपलब्ध करून देते. मात्र स्टेट बँक ऑफ इंडियाची गोल्ड लोन मर्यादा कमी आहे. एसबीआय तुम्हाला वीस हजार रुपयांपासून ते 20 लाखांपर्यंतचे गोल्ड लोन उपलब्ध करून देते. आरबीआयच्या नियमानुसार तुमचे सोने जेवढ्या किमतीचे असेल त्या किमतीच्या 90 टक्क्यांपर्यंत तुम्हाला कर्ज मिळू शकते.

गोल्ड लोन परत करण्याचा कालावधी

गोल्ड लोन परत करण्याचा कालावधी हा संबंधित बँकेवर व ज्याने कर्ज घेतले आहे त्या व्यक्तीवर अवलंबून असतो. म्हणजे तुम्ही जर एचडीएफसी बँकेकडून कर्ज घेतले असेल तर ही बँक तुम्हाला लोन परत करण्यासाठी जास्तीत जास्त दोन वर्षांचा कालावधी देते. तुम्ही जर एसबीआयकडून कर्ज घेतले तर तुम्ही तीन वर्षांच्या कालावधीत कर्जाची परतफेड करू शकता. गोल्ड लोनचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे गोल्ड लोन घेताना तुम्हाला जास्तीची कागदपत्र गोळा करण्याच्या त्रासापासून सुटका मिळते. गोल्ड लोन घेण्यासाठी तुम्हाला केवळ ओळख आणि पत्त्याशी संबंधित कागदपत्रे सादर करावी लागतात. ज्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मतदान कार्ड यांचा समावेश होतो.

संबंधित बातम्या

महागाई आणखी भडकणार! जीएसटीचा सर्वात कमी स्लॅब आठ टक्के करण्याचा विचार; ‘या’ वस्तू होऊ शकतात महाग

Russia-Ukraine war : भारतातून गव्हाची निर्यात वाढली, 70 लाख टन गहू निर्यातीचा अंदाज 

येत्या वर्षात 25 हजार भारतीयांना नोकरी देणार डेन्मार्कची ‘ही’ कंपनी, महसुलाच्या दुप्पट वाढीचे लक्ष

Non Stop LIVE Update
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.