AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bank | अखेरचा हा तुला दंडवत.. ही शंभरी उलटलेली बँक कायमची बंद..

RBI Rupee Bank | रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकिंग परवाना रद्द केल्याने उद्या ही बँक बंद होणार आहे. शतकापासूनचे भावनिक नाते अखेर संपुष्टात येणार आहे.

Bank | अखेरचा हा तुला दंडवत.. ही शंभरी उलटलेली बँक कायमची बंद..
उद्यापासून कायमचे टाळेImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Sep 22, 2022 | 11:03 AM
Share

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) बँकिंग परवाना (Banking License) रद्द केल्याने ही बँक अखेर उद्या बंद होत आहे. महाराष्ट्रातील या बँकेला कायमस्वरुपी कुलूप लागणार आहे. या बँकेशी ग्राहकांचे भावनिक नाते जोडल्या गेल्या होते.आता ही बँक अनेक ग्राहकांच्या स्मृतीत उरणार आहे..

आरबीआय नेहमी बँकांसाठी नियम जाहीर करते. एखाद्या बँकेत अनियमितता आढळल्यास त्यांना दंड लावते. मात्र बँकेच्या ताळेबंदात (Balance Sheet) मोठा फरक आढळल्यास आणि अनियमितता जास्त असल्यास अशा बँकांना ग्राहकहितासाठी बंद करण्यात येते.

आरबीआयने यापूर्वी ही अनेक बँका, वित्तीय संस्थांचा बँकिंग परवाना रद्द केला आहे. आरबीआयने राज्यातील या बँकेचा परवाना रद्द करण्याचा निर्णय यापूर्वीच जाहीर केला होता. त्यानुसार, 22 सप्टेंबर रोजीपासून या बँकेला कायमस्वरुपी ताळे लागेल.

RBI ने ऑगस्ट महिन्यात पुणे येथील रुपी सहकारी बँक लिमिटेडचा (Rupee Co-operative Bank Limited) बँकिंग परवाना रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला होता.

केंद्रीय बँकेच्या निर्णयाप्रमाणे, 22 सप्टेंबरपासून या बँकेच्या सर्व सेवा कायमस्वरुपी बंद होणार आहेत. ग्राहकांना आता कुठलाही व्यवहार करता येणार नाही. गेल्या 100 वर्षांहून अधिक काळ या बँकेशी ग्राहकांचे आपुलकीचे नाते होते.

रुपी सहकारी बँकेकडे पुरेसे भांडवल नसून कमाईचे आवश्यक साधनंही नसल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.22 सप्टेंबरपासून या बँकेचे कामकाज बंद होईल. ग्राहकांना रक्कम काढता येणार नाही. कोणताही आर्थिक व्यवहार, धनादेश वा इतर सेवांचा लाभ घेता येणार नाही.

आता DICJC Act 1961 नुसार, गुंतवणूकदारांना 5 लाख रुपयांपर्यंत नुकसान भरपाई मिळेल. त्यासाठीची प्रक्रिया सुरु झालेली आहे. ग्राहकांना त्यासाठी संबंधित यंत्रणेकडे अर्ज दाखल करावा लागणार आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.