सहा महिन्यांत रिअल इस्टेट क्षेत्रात तेजी येणार; जाणकारांचा अंदाज

Real Estate | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बांधकाम साहित्याचा पुरवठा ठप्प झाल्याने आणि अनेक मजूर गावी निघून गेल्याने या क्षेत्राला मोठा फटका बसला. नाईट फ्रँक-नारडेकोच्या रिअल इस्टेट सेंटिमेंट इंडेक्स या सर्वेक्षणातून ही माहिती पुढे आली.

सहा महिन्यांत रिअल इस्टेट क्षेत्रात तेजी येणार; जाणकारांचा अंदाज
रिअल इस्टेट
Follow us
| Updated on: Jul 26, 2021 | 7:51 AM

मुंबई: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर भारतीय अर्थव्यवस्था हळूहळू रुळावर येत आहे. अनेक क्षेत्रांमध्ये नवा उत्साह संचारताना दिसत आहे. यामध्ये कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या बांधकाम उद्योगातही धुगधुगी निर्माण झाली असून येत्या काही दिवसांमध्ये हा व्यवसाय पूर्ण गती पकडेल, असा अंदाज नाईट फ्रँक, फिक्की आणि नारडेको यासारख्या संस्थांनी वर्तविला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बांधकाम साहित्याचा पुरवठा ठप्प झाल्याने आणि अनेक मजूर गावी निघून गेल्याने या क्षेत्राला मोठा फटका बसला. नाईट फ्रँक-नारडेकोच्या रिअल इस्टेट सेंटिमेंट इंडेक्स या सर्वेक्षणातून ही माहिती पुढे आली. या सर्वेक्षणानुसार, जानेवारी-मार्च तिमाहीच्या तुलनेत एप्रिल-जून तिमाहीत सेंटिमेंट स्कोर 57 टक्क्यांवरून 35 टक्क्यांवर आला. गेल्यावर्षी एप्रिल-जून तिमाहीत तर हा सेंटिमेंट स्कोर 22 टक्के इतका होता. त्या तुलनेत आताची परिस्थिती बरीच चांगली आहे. मात्र, आगामी काळात हे चित्र वेगाने बदलेल. लोक पुन्हा घर खरेदीला सुरुवात करतील, असा जाणकारांचा अंदाज आहे.

मुंबईत मे महिन्यात 11 हजार कोटींची मालमत्ता विक्री

लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असताना आणि अर्थव्यवस्था आक्रसलेली असताना मुंबईत मात्र नव्या मालमत्तांची खरेदी जोरात सुरु असल्याचे दिसून आले होते. कारण, मे महिन्यात मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्रात (MMRA) तब्बल 11 हजार कोटींची मालमत्ता विक्री व्यवहार झाल्याचे समोर आले होते.

30 मे 2021 रोजी सीआरई मॅट्रिक्स प्रॉपर्टी ट्रॅकर आणि आयजीआर महाराष्ट्र कडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) मे 2021 मध्ये मालमत्ता विक्री व्यवहारांची नोंद रु. 10979 कोटी इतकी तर एप्रिल 2021 मध्ये रु. 22,507 कोटी इतकी झाली. मार्च 2021, फेब्रुवारी 2021 आणि जानेवारी 2021 मध्ये एमएमआर मध्ये नोंदणीकृत मालमत्ता विक्रीचे व्यवहार अनुक्रमे रू. 44167 कोटी, रु. 21696 कोटी आणि रु. 21484 कोटी इतके झाले.

30 मे 2021 पर्यंत मुंबईत मालमत्ता विक्री व्यवहारांची नोंद मे 2021 मध्ये रु. 7246 कोटी तर एप्रिल 2021 मध्ये रु. 16250 कोटी इतकी झाली. मार्च 2021, फेब्रुवारी 2021 आणि जानेवारी 2021 मध्ये मुंबईत मालमत्ता विक्रीचे व्यवहार अनुक्रमे रु. 28961 कोटी, रु. 12989 कोटी आणि रु. 12890 कोटी इतके झाले.

संबंधित बातम्या:

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा रिअल इस्टेट मार्केटला फटका, घरांच्या विक्रीत 23 टक्क्यांनी घट

भारतात सर्वात महाग आणि स्वस्त घरं कोणत्या शहरात?

लॉकडाऊन काळात कच्च्या मालाच्या किमतीत भरमसाठ वाढ, बांधकाम क्षेत्राला जबर फटका

(Real estate sector will recover soon ficci nardeco survey sentiment score)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.