भारतात सर्वात महाग आणि स्वस्त घरं कोणत्या शहरात?

अहमदाबादमध्ये जागांचे भाव सर्वाधिक कमी आहेत. 2010 पर्यंत रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीवर साधारण नफ्याचे गुणोत्तर 46 टक्के इतके होते. हे प्रमाण आता 24 टक्क्यांपर्यंत घसरले आहे. | Real estate

भारतात सर्वात महाग आणि स्वस्त घरं कोणत्या शहरात?
रिअल इस्टेट

मुंबई: कोरोनाच्या संकटामुळे रिअल इस्टेट क्षेत्राला (Real Estate) आलेली मरगळ आता काहीप्रमाणात दूर झाली आहे. त्यामुळे आता घरांचे भाव नेहमीप्रमाणे गगनाला भिडण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये मुंबईतील (Mumbai) जागांचे भाव नेहमीप्रमाणे चढे आहेत. तर देशात सर्वाधिक स्वस्त घरं अहमदाबादमध्ये मिळत आहेत. (Home and commercial property rates in Mumbai)

नाईट फ्रँक इंडियाच्या (Knight Frank India) या संस्थेकडून ‘एफोर्डेबिलटी इंडेक्स’ 2020 (Affordability Index 2020) प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार अहमदाबादमध्ये जागांचे भाव सर्वाधिक कमी आहेत. 2010 पर्यंत रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीवर साधारण नफ्याचे गुणोत्तर 46 टक्के इतके होते. हे प्रमाण आता 24 टक्क्यांपर्यंत घसरले आहे. पुणे आणि चेन्नई या शहरांमधील जागांमध्ये गुंतवणूक केल्यास सध्याच्या घडीला मिळणाऱ्या नफ्याचे गुणोत्तर साधारण 26 टक्के इतके आहे.

गेल्या दहा वर्षांमध्ये बांधकाम क्षेत्राने पूर्वीपेक्षा अधिक गती पकडली आहे. घरांच्या घटलेल्या किंमती आणि गृहकर्जाचे दर घटल्यामुळे घरे खरेदी करणे किफायतशीर झाल्याचे नाईट फ्रँक इंडियाच्या अहवालात म्हटले आहे.

मुंबईतील घरे सर्वात महाग

मुंबईत रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीवरील नफ्याचे गुणोत्तर जवळपास 61 टक्के आहे. त्यामुळे साहजिकच येथील जागांचे दरही चढे आहेत. तुलनेत अहमदाबाद, पुणे, चेन्नईमध्ये स्वस्तात गुंतवणूक करता येते. मात्र, गेल्या दशकाच्या तुलनेत या दशकात मुंबईतील जागांचे दर घटल्याचे दिसून आले आहे.

जगाच्या तुलनेत भारतात घरांच्या किंमती घसरल्या

जगाच्या तुलनेत भारतात घरांच्या किंमतीत (Indias Property Rate) घट झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. 2019 च्या तिसर्‍या तिमाहीच्या तुलनेत 2020 च्या तिसर्‍या तिमाहीत भारतातील सरासरी घरांची किंमत 2.4 टक्क्यांनी घसरली आहे. यानंतर, ग्लोबल होम प्राइस इंडेक्समध्ये भारताची 7 स्थानांची घसरण झाली आहे. यामुळे भारत 54 व्या स्थानावर आला आहे. भारत 2019 च्या तिसर्‍या तिमाहीत 47 व्या स्थानावर होता.

संबंधित बातम्या:

सिंगल विटांच्या भिंतींवर तीन मजली बांधकाम, म्हाडाच्या ठेकेदारांचा प्रताप

Indias Property Rate | घर खरेदीचा प्लॅन करताय ? मग बघा जगाच्या तुलनेत आपल्याकडे किती स्वस्त? किती महाग ?

चाळीशीत आहात, अशी गुंतवणूक करा, 2 कोटी कमवा

(Home and commercial property rates in Mumbai)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI