कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा रिअल इस्टेट मार्केटला फटका, घरांच्या विक्रीत 23 टक्क्यांनी घट

दिल्ली-एनसीआर, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बेंगलुरू, हैदराबाद आणि पुणे येथे निवासी मालमत्तांच्या विक्रीवर जेएलएल इंडिया देखरेख करते. मुंबई अंतर्गत मुंबई शहर, मुंबई उपनगरे, ठाणे आणि नवी मुंबई येते. (Corona's second wave plunges real estate, home sales fall 23 percent)

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा रिअल इस्टेट मार्केटला फटका, घरांच्या विक्रीत 23 टक्क्यांनी घट
रिअल इस्टेटला सुगीचे दिवस! स्टॅम्प ड्युटी सवलतींमुळे मालमत्तांचे रजिस्ट्रेशन दुप्पटीने वाढले

मुंबई : चालू वर्षाच्या एप्रिल ते जून या तिमाहीत देशातील सात प्रमुख शहरांमध्ये घरांच्या विक्रीत तिमाही-दर-तिमाहीच्या आधारे 23 टक्के घट झाली आहे. कोविड -19 महामारीच्या दुसर्‍या लाटेमुळे घरांची विक्री कमी झाली आहे. तथापि, वर्षाच्या आधारावर या तिमाहीत घर विक्री 83 टक्क्यांनी वाढली आहे. जेएलएल इंडियाच्या नविन अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. (Corona’s second wave plunges real estate, home sales fall 23 percent)

अहवालात म्हटले आहे की, एप्रिल ते जून या तिमाहीत निवासी मालमत्तांची विक्री 19,635 युनिट होती. जानेवारी ते मार्च या तिमाहीत ती 25,583 युनिट आणि गेल्या वर्षी एप्रिल ते जून या तिमाहीत 10,753 युनिटची विक्री झाली आहे. दिल्ली-एनसीआर, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बेंगलुरू, हैदराबाद आणि पुणे येथे निवासी मालमत्तांच्या विक्रीवर जेएलएल इंडिया देखरेख करते. मुंबई अंतर्गत मुंबई शहर, मुंबई उपनगरे, ठाणे आणि नवी मुंबई येते.

बेंगळुरूमध्येही तेजीची नोंद

मागील तिमाहीत बेंगळुरूमधील घर विक्री 47 टक्क्यांनी वाढून 3,500 युनिट झाली आहे, जी गेल्या तिमाहीत 2,382 युनिट होती. चेन्नईतील घर विक्री 81 टक्क्यांनी घसरून 3200 ते 600 युनिट पर्यंत घटली. दिल्ली-एनसीआरमध्येही घर विक्री 55 टक्क्यांनी घसरून 2,440 युनिटवर आली. जानेवारी ते मार्च या तिमाहीत ही आकडेवारी 5,448 युनिटची होती. हैदराबादमधील घर विक्री 3,709 युनिटवरुन 3,157 युनिवर आली. कोलकाता येथे निवासी युनिट्सची विक्री 56 टक्क्यांनी घट होऊन 1,320 युनिट्सच्या 578 युनिटवर आली.

मुंबईतील घरांच्या विक्रीत किरकोळ सुधारणा

मुंबईतील घर विक्रीत किरकोळ वाढ होऊन 5,779 युनिटवरुन 5,821 युनिटवर गेली. दुसरीकडे पुण्यातील घर विक्री 6 टक्के घट होऊन 3,539 युनिट झाली, जी मागील तिमाहीत 3,745 युनिट्स होती. आकडेवारीनुसार एप्रिल ते जून, 2020 दरम्यान बेंगळुरूमध्ये निवासी युनिटच्या विक्रीमध्ये 1,977 युनिट, चेन्नई 460 युनिट्स, दिल्ली-एनसीआर 2,250 युनिट, हैदराबादमध्ये 1,207 युनिट्स, कोलकातामध्ये 481 युनिट्स, मुंबईमध्ये 3,527 युनिट्स आणि पुण्यामध्ये 851 युनिट्सची विक्री झाली.

घर खरेदी करणे येत्या काही दिवसांत महागणार

आपण घर विकत घेण्याचा विचार करीत असाल तर हीच योग्य वेळ आहे. रिअल इस्टेट डेव्हलपर्सची सर्वोच्च संस्था क्रेडाई(Credai) म्हणाली की, स्टील आणि सिमेंटच्या किंमती वाढल्यामुळे आगामी काळात घराच्या किंमतीत वाढ होऊ शकते. क्रेडाई म्हणाले, सिमेंट आणि स्टीलच्या किंमतीमुळे बांधकाम खर्चात 10-20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या परिस्थितीमुळे, घरांच्या किंमती मध्यम ते दीर्घ मुदतीच्या कालावधीत वाढण्याची शक्यता आहे. (Corona’s second wave plunges real estate, home sales fall 23 percent)

इतर बातम्या

VIDEO | नागपुरात पुन्हा लसींचा तुटवडा, लसीकरण बंद असल्याने नागरिक त्रस्त

1500 रुपयांना एक, तीन किलो वजनाचा चविष्ट आंबा, नूरजहां आंब्याची सोशल मीडियावर चर्चा

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI