1500 रुपयांना एक, तीन किलो वजनाचा चविष्ट आंबा, नूरजहां आंब्याची सोशल मीडियावर चर्चा

मध्य प्रदेशचा काठिवाडा हा भाग नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखला जातो. काठिवाडा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर नूरजहां आंब्यासाठी चर्चेत आला होता.

1500 रुपयांना एक, तीन किलो वजनाचा चविष्ट आंबा, नूरजहां आंब्याची सोशल मीडियावर चर्चा
नूरजहां आंबा

नवी दिल्ली: मध्य प्रदेशचा काठिवाडा हा भाग नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखला जातो. काठिवाडा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर नूरजहां आंब्यासाठी चर्चेत आला होता. मोगलांच्या राणीच्या नावावर असणारा नूरजहां हा दुर्मिळ आंबा हा देशातील सर्वात मोठा आंबा मानला जातो. त्यांचे एका आंब्याचं वजन 3-3.5 किलो पर्यंत असते. तो एक फूट लांब असू शकतो. नूरजहां आंब्याच्या झाडाला जून महिन्यात फळ लागतात. हा आंबा शेकडो वर्षांपूर्वी अफगाणिस्तान ते गुजरातच्या माध्यमातून मध्य प्रदेशात पोहोचले असल्याचे येथील शेतकऱ्यांचं सागणं आहे. मध्य प्रदेशातील नूरजहां मँगो फार्मचे मालक शिवराजसिंह जाधव यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. (Noorjahan Mangoes Cost Upto Rs 1500 per Piece know all details about Mango)

1965 ला पहिल्यांदा आंब्याची लागवड

शिवराज सांगतात, “माझ्या वडिलांनी 1965 च्या सुमारास नूरजहां आंब्याचं कलम लावलं होतं. आज त्यांच्याकडे नूरजहां आंब्याची पाच झाडं आहेत. तर 16 एकराच्या बागेत 33 प्रकारच्या आंब्याची बाग आहे.

शिवराजसिंह जाधव यांनी बेटर इंडियाला दिलेल्या माहितीनुसार झाडाची उंची सुमारे 50 फूट उंचीपर्यंत वाढते आणि प्रत्येक झाडाला 100 पेक्षा कमी आंबे मिळतात. शिवराजसिंह जाधव म्हणतात 5 झाडांतून आम्हाला सुमारे 350 आंबे मिळतात. मात्र, आंबा मोठा असल्यानं 500 ते 1,500 रुपयांना एक आंबा विकला जातो. त्यामुळं त्यांना लाखो रुपये मिळतात.

बाग पाहण्यासाठी लोकांची गर्दी

शिवराजसिंह जाधव यांनी देशातील विविध भागातील उत्पादकांशी चर्चा केली होती त्यानुसार नूरजहां आंबा देशातील सर्वात मोठ्या आकाराचा असल्याचा दावा केला आहे. काठिवाडा मधील माती, पाऊस, हवामान आणि इतर भौगोलिक परिस्थितीमुळं आंबे मोठे होतात, असं जाधव यांनी केलं आहे. “नूरजहांचे आंबे नेहमी प्रसिद्ध आहेत, नूरजहां आंब्यासाठी शिवराजसिंह यांच्या वडिलांची दखल दूरदर्शनने देखील होती. दरवर्षी सुमारे 4 ते 5 हजार लोक आंब्याची बाग पाहण्यासाठी येतात, असं त्यांनी म्हटलं.

नूरजहां आंब्याची नागपूर येथील नर्सरी चालवणारे एस आर ठाकूर नूरजहां आंब्याचा आकार मोठा असल्यानं शेतकरी मोठ्या प्रमाणावर प्रभावित होतात. ठाकूर सांगतात नूरजहां आब्याची खरेदी मोठ्या प्रमाणावर खरेदीदार करतात. “खरेदीदारांना आंब्याचा आकार प्रभावी दिसतो. आंबे रसाळ असतात आणि केशरासारखे दिसतात. फळांची त्वचा पातळ आणि बीज लहान आहे.

शिवराज म्हणतात हापूस, बदामी, दशहरी, केसरी, रसपुरी, लंगडा, आम्रपाली इत्यादी आंबा वाण प्रसिद्ध आहेत, पण अलीकडेच दुर्मिळ नूरजहां आंब्याला बरीच लोकप्रियता मिळाल्याचा आनंद आहे.

इतर बातम्या:

Monsoon Session Live Updates | 31 जुलै 2021 पर्यंतच्या एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत मोठी घोषणा

महाविकास आघाडीचे नेते संकटात माझ्यापाठी उभे राहिले नाही, म्हणून ‘ते’ पत्रं लिहिलं; प्रताप सरनाईक यांचं मोठं विधान

अनिल देशमुख असेच मधात बोलले आता आत जात आहेत; मुनगंटीवारांच्या धमकीवरून सभागृहात गोंधळ

(Noorjahan Mangoes Cost Upto Rs 1500 per Piece know all details about Mango)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI