VIDEO | नागपुरात पुन्हा लसींचा तुटवडा, लसीकरण बंद असल्याने नागरिक त्रस्त

लसीकरण केंद्राच्या गेटवर ‘आज लसीकरण बंद आहे’ हा बोर्ड वाचायचा. त्यानंतर निराश होऊन परत जायचं, असा अनुभव सध्या हजारो नागपूरकर घेत आहेत

VIDEO | नागपुरात पुन्हा लसींचा तुटवडा, लसीकरण बंद असल्याने नागरिक त्रस्त
Nagpur Vaccination


नागपूर : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत आहे. तर दुसरीकडे कोरोना लसीकरण मोहिम जोरदार सुरु आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी कोरोना लसींचा तुटवडा जाणवत आहे. नागपुरातही पुन्हा लसींचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप पाहायला मिळत आहे. (Nagpur Corona Vaccine shortage Most vaccination centers closed)

नागपुरात लसींचा तुटवडा

नागपुरातील अनेक कोरोना लसीकरण केंद्रांवर कोव्हिशिल्ड लसींचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे नागपूर महापालिकेने अनेक लसीकरण केंद्र बंद ठेवली आहे. गेल्या पाच दिवसांपासून नागपुरातील बहुतांश लसीकरण केंद्र बंद आहे. त्यामुळे त्या ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

लसीकरण केंद्रावर येऊन नागरिक माघारी

एकतर स्वत:चे सर्व कामं सोडून लसीकरण केंद्रांवर यायचं आणि लसीकरण केंद्राच्या गेटवर ‘आज लसीकरण बंद आहे’ हा बोर्ड वाचायचा. त्यानंतर निराश होऊन परत जायचं, असा अनुभव सध्या हजारो नागपूरकर घेत आहेत. गेल्या पाच दिवसांपासून नागपुरात लसीकरण बंद होतं. शनिवारी (3 जुलै) कोरोना लसीकरण सुरु झालं आहे. मात्र आता ते पुन्हा बंद असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे अनेक लोक हे लसीकरण केंद्रावर येऊन पुन्हा माघारी परतत आहेत.

पाहा व्हिडीओ : 

(Nagpur Corona Vaccine shortage Most vaccination centers closed)

संबंधित बातम्या : 

नागपुरात तिसऱ्या लाटेचे संकेत, 12 दिवसांच्या बाळाचा कोरोनामुळे मृत्यू

नागपूर ZP आणि पंचायत समितीसाठी काँग्रेसची मोर्चेबंधणी, इच्छूक उमेदवारांची यादी तयार

तिसऱ्या लाटेत राज्यात रक्ताचा तुटवडा भासू नये, ‘डॉक्टर्स डे’निमित्त 1 लाख लोकांच्या रक्तदानाचा महायज्ञ

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI