Reliance Power | एक डीलची बातमी आली काय नी अनिलभाऊच्या शेअरने तांडव केला काय..

Reliance Power | रिलायंस पॉवर लिमिटेड (RPL) आठवते का? आजही अनेक गुंतवणूकदारांचा पार तिळपापड होतो नाही का? कारण फसवणूकच तशी झाली आहे. पण या शेअरमध्ये अचानक तेजी आली आहे.

Reliance Power | एक डीलची बातमी आली काय नी अनिलभाऊच्या शेअरने तांडव केला काय..
एका बातमीने उघडले नशीबImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 05, 2022 | 6:07 PM

Reliance Power | रिलायन्स पॉवर लिमिटेड (RPL) आठवते का? आजही अनेक गुंतवणूकदारांचा पार तिळपापड होतो नाही का? कारण फसवणूकच तशी झाली आहे. पण या शेअरमध्ये अचानक तेजी आली आहे. एक बातमी काय आली अनिल अंबानी (Anil Ambani) यांच्या कंपनीच्या या शेअरने गुंतवणूकदारांच्या आशा पुन्हा पल्लवीत केल्या. निपचित पडलेला हा शेअर, बाजारात अचानक खाली-वर झाला. बाजाराच्या शेवटच्या सत्रात (Last Session) हा रिलायन्स पावरचा शेअर 9.91 टक्क्यांची वृद्धी नोंदवत 23.30 रुपयांवर बंद झाला. गेल्या महिनाभरात या शेअरने 75 टक्क्यांची वृद्धी नोंदवली आहे.

कंपनीचा फंडचा फंडा

रिलायन्स पावर लिमिटेड आणि तिची उपकंपनीने 1200 कोटी रुपयांचा निधी जमवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. कंपनी दीर्घकालीन निधी गुंतवणुकीसाठी काम करत आहे. जागतिकस्तरावर गुंतवणूक करणारी कंपनी वर्दे पार्टनर्स(Verde Partners) सोबत रिलायन्स पावरने नुकताच एक करार केला आहे.

कर्ज घेणार

रिलायन्स पावरने यासंबंधी एक अधिकृत माहिती दिली आहे. त्यानुसार, कंपनीने 4 सप्टेंबर 2022 रोजी बाजारातील त्यांच्या कर्जाची सेटलमेंट, कर्ज परतफेड आणि इतर कामासाठी वर्दे पार्टनर्ससोबत करार केला आहे. त्यामाध्यमातून कंपनीला 1,200 रुपयांचे कर्ज मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा

निधीचा वापर कुठे करणार

रिलायन्स पावर कंपनी हा मोठा निधी कर्ज परतफेडीसाठी वापरले. भविष्यातील काही प्रकल्पांसाठीही हा निधी वापरण्यात येणार आहे. कर्ज फेडण्यासठी सर्व नियम, कायदे आणि अधिनियमांचे पालन करण्यात येणार आहे.

परदेशी गुंतवणूकदारांची पसंती

या शेअरमध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी अचानक पसंती दाखवली आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी ज्या 32 शेअरमध्ये गुंतवणूक केली. त्यात रिलायन्स  पावरचाही समावेश आहे. विशेष म्हणजे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांच्या गुंतवणूक 3 टक्क्यांनी वाढली आहे.

गुंतवणूकदार अजूनही आशावादी

रिलायन्स पावर हा शेअर जोरदार धावले या आशेवर अनेक गुंतवणूकदारांनी त्यांचा मेहनतीचा पैसा यात गुंतवला. पण हा शेअर तुफान गडगडला. अनेक गुंतवणूकदारांनी त्याचा धसका घेतला. पण अजूनही या शेअरमध्ये धुकधुकी असल्याने गुंतवणूकदार अजूनही आशावादी आहेत.

Non Stop LIVE Update
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.