AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सेमीकंडक्टरमुळे दिरंगाईचा करंट ! नवीन वर्षात तुमच्या आवडत्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंची  डिलिव्हरी होणार लेट

सेमीकंडक्टरमुळे अवघे इलेक्ट्रॉनिक विश्व वेठीस धरल्या गेले आहे.  सेमिकंडक्टरचे महत्व तेव्हा अधोरेखित होते, जेव्हा तुमच्या कारमध्ये याच्या अभावी तुम्हाला अत्याधुनिक फिचर्सपासून वंचित रहावे लागेल. 

सेमीकंडक्टरमुळे दिरंगाईचा करंट ! नवीन वर्षात तुमच्या आवडत्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंची  डिलिव्हरी होणार लेट
| Edited By: | Updated on: Dec 14, 2021 | 7:44 AM
Share

नवी दिल्ली : इलेक्ट्रॉनिक वस्तुंमधील अत्यंत महत्वाचा भाग असलेला सेमीकंडक्टरचा (Semiconductor) जागतिक बाजारपेठेत (Markets) सध्या जाम तुटवडा आहे बरं का. त्यामुळे आपल्या दैनंदिनीचा अविभाज्य भाग झालेल्या स्मार्टफोन्सपासून तर इतर इलेक्ट्रॉन्सिक्स (Electronics) वस्तुंच्या उत्पादनावर थेट परिणाम झाला आहे. त्यातच ख्रिसमस आणि नवीन वर्ष, तसेच आगामी सणांमध्ये या वस्तुंची मागणी वाढणार आहे. अशावेळी उत्पादनाचा आणि डिलिव्हरीचा ताळमेळ बसविण्यात उशीर होणार आहे. त्यामुळे आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू उशीरा मिळण्याची शक्यता आहे.

अर्ध वर्ष वाट पाहण्यात जाणार 

सेमीकंडक्टरच्या उत्पादनावर कोविड-19 चा मोठा परिणाम झाला आहे. अनेक उत्पादनांवर त्याचा थेट परिणाम दिसून येत आहे. नवीन चारचाकी गाड्यांवर अगोदरच वेटिंग आहे. या नव्या संकटामुळे कारची डिलिव्हरी पण उशीरा मिळण्याची शक्यता आहे. कारप्रेमींना 6 ते 7 महिने वेटिंग करावे लागण्याची शक्यता आहे. जून 2022 पर्यंत ही समस्या राहण्याची शक्यता काही रिपोर्टसमध्ये वर्तविण्यात आली आहे. चिप आणि सेमीकंडक्टरचे उत्पादन घटल्याचा हा परिणाम आहे.

वाढत्या फिचर्समुळे कार वेटिंगवर

पूर्वी कारमध्ये अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर अत्यंत नगण्य होता. मात्र डिजिटल युगात कारची फिचर्सही बदलली आहेत. जीपीएस, ब्लूटूथ, व्ही2एक्स, एडिएएस ड्रायव्हिंग आणि इतर अनेक फिचर्ससाठी सेमीकंडक्टर आणि चीपची आवश्यकता असते. आता त्याचे उत्पादनच प्रभावित झाल्याने कारची डिलिव्हरी उशीरा मिळण्याची दाट शक्यता आहे.

घरगुती ब्रँडसवर ही परिणाम

कारसोबतच रोजच्या घरगुती इ्लेस्क्ट्रॉनिक्स ब्रँडवरही लेटमार्क पडला आहे. स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्ही आणि फ्रीज या वस्तुंमध्ये सेमिकंडक्टरचा वापर होतो. त्यांच्या डिलिव्हरीवर पण याचा परिणाम दिसून येईल. एका रिपोर्टनुसार, 2021 मध्ये या समस्येमुळे तब्बल 5 लाख कारच्या विक्रीत घट होईल आणि 5 अब्ज डॉलरचा फटका सहन करावा लागणार आहे.

जुलै 2022 पासून सुधारणा

कंपन्यांना आशा आहे की, या शॉर्टवेजवर येत्या सहा महिन्यांत तोडगा निघेल. कंपन्यांमधून सेमीकंडक्टर आणि चीपचे उत्पादन पूर्वपदावर येईल. जुलै 2022 पर्यंत ही समस्या संपेल.

तुमच्या खिशाला फटका

आज अशीा एकही इलेक्ट्रॉनिक वस्तू नाही की ज्यात सेमीकंडक्टर आणि चीपचा वापर होत नसेल. सेमीकंडक्टरमुळे इलेक्ट्रॉनिक वस्तुंमध्ये क्रांती आली आहे आणि आपलं जीवन सुखकर होत आहे. प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तूत याचा वापर होतो. पण सध्या तुटवड्यामुळे ऑटोमोबाईलसह इतर इलेक्ट्रॉनिक्स सेक्टरवर त्याचा थेट परिणाम दिसून येत आहे. एकीकडे सेमीकंडक्टरचा तुटवडा असतानाच, डिलिव्हरी तर उशीरा मिळणारच आहे, पण ग्राहकांनाही तुटवड्यामुळे महागाईचा फटका बसणार आहे.

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.