AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवघ्या 63 रुपयांच्या शेअरची किंमत झाली 7786.45 रुपये; लखपतींना बनवले करोडपती

Share Market | गेल्या दहा वर्षांचा विचार करायचा झाल्यास बजाज फायनान्सच्या समभागाने गुंतवणूकदारांना 12260 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. दहा वर्षांपूर्वी बजाज फायनान्सच्या एका समभागाची किंमत अवघी 63 रुपये इतकी होती. हीच किंमत आता 7786.45 रुपये इतकी झाली आहे.

अवघ्या 63 रुपयांच्या शेअरची किंमत झाली 7786.45 रुपये; लखपतींना बनवले करोडपती
शेअर मार्केट
| Edited By: Rohit Dhamnaskar | Updated on: Sep 26, 2021 | 11:14 AM
Share

मुंबई: सध्या शेअर बाजाराच्या निर्देशंकांनी विक्रमी टप्प्याला गवसणी घातली आहे. त्यामुळे दीर्घकालीन कालावधीसाठी पैसे गुंतवणारे लोक अक्षरश: मालामाल झाले आहेत. गुंतवणूकदारांना असाच फायदा मिळवून देणारा एक जुना समभाग म्हणजे बजाज फायनान्स (Bajaj Finance). या समभागाने गेल्या वर्षभरात गुंतवणुकदारांना खूपच चांगला परतावा मिळवून दिला आहे.

गेल्या दहा वर्षांचा विचार करायचा झाल्यास बजाज फायनान्सच्या समभागाने गुंतवणूकदारांना 12260 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. दहा वर्षांपूर्वी बजाज फायनान्सच्या एका समभागाची किंमत अवघी 63 रुपये इतकी होती. हीच किंमत आता 7786.45 रुपये इतकी झाली आहे.

आठवडाभरात समभागाच्या किंमतीत मोठी उसळी

गेल्या आठवडाभरात बजाज फायनान्सच्या शेअर्सची किंमत 7386.60 रुपयांवरून 7786.45 रुपये इतकी झाली. म्हणजेच, फक्त 5 सत्रांमध्ये, या स्टॉकने 5.40%परतावा दिला आहे. जर आपण गेल्या 6 महिन्यांची आकडेवारी पाहिली तर बजाज फायनान्सच्या शेअरची किंमत 5122.20 रुपयांवरून 7786.45 रुपये झाली. या कालावधीत समभागाने त्याने 52%परतावा दिला. बजाज फायनान्सचा परतावा गेल्या वर्षभरात 150% होता आणि शेअर्सची किंमत 3138.95 रुपयांवरून 7786.45 रुपये इतकी झाली आहे.

याचा अर्थ एखाद्या गुंतवणूकदाराने दहा वर्षांपूर्वी बजाज फायनान्सच्या समभागांमध्ये एक लाख रुपये गुंतवले असतील तर आता त्याचे मूल्य जवळपास 1.23 कोटी रुपये इतके झाले आहे.

महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडच्या शेअर्सवर बंपर रिटर्न्स

सध्या शेअर बाजारात महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडच्या (MLL) समभागाची प्रचंड चर्चा आहे. गेल्या वर्षभरात या कंपनीच्या समभागांनी गुंतवणुकदारांना 192 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. 27 जुलै 2020 रोजी महिंद्रा लॉजिस्टिक्सच्या शेअरचा भाव 276.7 रुपये इतका होता. आता याच समभागाची किंमत 807.30 इतकी झाली आहे. याचा अर्थ वर्षभरापूर्वी एखाद्या गुंतवणुकदाराने महिंद्रा लॉजिस्टिक्सचे एक लाख रुपयांचे समभाग विकत घेतले असतील तर आता त्यांची किंमत साधारण 14.58 लाखांच्या घरात गेली आहे.

गुडलक इंडियाची वेगवान घोडदौड

यंदाच्या वर्षात शेअर बाजारात अनेक कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. यावेळी सर्वाधिक कमाई करून देणाऱ्या शेअर्समध्ये अनेक मिडकॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांचा समावेश आहे. गुडलक इंडिया (Goodluck India) हा देखील अशाच समभागांपैकी एक आहे. या इंजीनिअरिंग कंपनीच्या शेअर्सनी गेल्या वर्षभरात गुंतवणुकदारांना 400 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. या कंपनीच्या एका समभागाचा भाव 39.05 रुपयांवरून 194.90 रुपये इतका झाला आहे.

संबंधित बातम्या:

शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांनो 30 सप्टेंबरपर्यंत ‘हे’ काम आटपा, अन्यथा ट्रेडिंगला लागेल ब्रेक

फिक्स्ड डिपॉझिटपेक्षा जास्त रिटर्न्स मिळवून देणारे पर्याय, जाणून घ्या सर्वकाही

ओलाच्या ई-स्कूटरसाठी कर्ज सहज उपलब्ध होणार, ईएमआय 2999 पासून सुरू, कंपनीने देशातील सर्व बँकांशी केला करार

Follow Us
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण..
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण...
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...